WhatsApp वर येतायेत नवे फीचर, टेक्स एडिट करण्यासोबतच मिळणार विविध फॉन्ट्स

WhatsApp updates: व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण, व्हॉट्सअ‍ॅपवर आता लवकरच नवे फिचर्स येणार आहेत. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

WhatsApp new features: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप आपल्या अनेक नवीन फिचर्सवर काम करत आहे. आयओएस युजर्ससाठी व्हॉट्सअ‍ॅप बीटासाठी आपल्या ड्रॉईंग टूलसाठी एक नवीन टेक्स्ट एडिटरवर काम करत आहे. रिपोर्ट्सनुसार, मेटा इन्स्टाग्राम-स्टाईल वन-क्लिक फॉन्ट चेंजरला सुद्धा व्हॉट्सअ‍ॅप प्लॅटफॉर्मवर आणणार आहे. हे नवीन फिचर्स आल्यावर केवळ एका टॅपने वेगवेगळे फॉन्ट्स मिळणार आहेत.

व्हॉट्सअ‍ॅपने आयओएससाठी वर्जन 2.23.5.72 सोबतच नवीन बीटा जारी केलं आहे. हे व्हॉट्सअ‍ॅपसाठी बिल्ट-इन ड्रॉईंग टूलमध्ये एक नवीन टेक्स्ट एडिटर फिचर जोडलं आहे. आधी फॉन्ट बदलणं शक्य होतं. आथा नवीन अपडेट युजर्ससाठी आणखी सुविधाजनक बनवलं जाणार आहे.

हे पण वाचा : सकाळी हे पदार्थ खाल्ल्यास दिवसभर मिळेल एनर्जी अन् उत्साह

जेव्हा तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमध्ये ड्रॉईंग टूल वर खेचाल तेव्हा तुम्हाला कीबोर्डवर एका क्लिकमध्ये फॉन्ट चेंज बटण दिसून येईल. हे इंटरफेस सारखं असेल जे आपल्याकडे आधीपासूनच इन्स्टाग्रामवर आहे. WABetaInfo नुसार, फिचर रोल आऊट झाल्यावर आपल्याला कॅलिस्टोगा, कुरिअर प्राईम, डॅमियन, एक्सो 2 आणि मॉर्निंग ब्रीज सारखे फॉन्ट्स मिळू शकतात.

हे पण वाचा : या सवयी बनवतात नपुंसक, तुम्हाला तर नाहीये ना?

बॅकग्राऊंड कलर चेंज

फिचर ट्रॅकर WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅप एका नव्या टेक्स्ट एडिटर फिचरवर काम करत आहे जे ड्रॉईंग टूलमध्ये नवीन फॉन्ट आणि टेक्स्ट फॉर्मेटिंग उपलब्ध करुन देईल. यामुळे कीबोर्डवर उपलब्ध असलेल्या ऑप्शनवर टॅप करुन फॉन्ट बदलणं सोपं होईल. याच्या व्यतिरिक्त युजर्स टेक्स्ट बॅकग्राऊंडचा रंगही बदलू शकतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी