Whatsapp New Features 2022 | नवी दिल्ली : आजच्या घडीला सोशल मीडियावर (Social Media) व्हॉट्सॲप सर्वाधिक प्रसिध्द असलेली ॲप बनली आहे. अशातच व्हॉट्सॲप देखील वेळोवेळी आपल्या युजर्ससाठी नवनवीन फिचर्स आणत असते, ज्यातून त्यांना चांगल्या पध्दतीने चॅटिंगचा अनुभव मिळू शकेल. नवीन वर्षातही व्हॉट्सअपमध्ये अनेक फिचर अपडेट्स येणार आहेत, परंतु त्या सर्वांमध्ये एक फिचर आहे जे त्यांच्या सर्वांच्या पुढील स्तरावरील आहे. लक्षणीय बाब म्हणजे हे फिचर युजर्संना अशी माहिती देईल, जी त्यांना आतापर्यंत चॅटिंग करताना मिळत नव्हती आणि यापूर्वी कोणत्याच ॲपने याबाबतीत कोणतेच फिचर आणले नव्हते. दरम्यान, चॅटिंगमध्ये संबधित युजर्सबद्दल कोण बोलतंय हे कळलं तर. समोरची व्यक्ती त्याच्याबद्दल दुसऱ्या व्यक्तीशी बोलत आहे हे जाणून घेण्यात मजा येईल. असे कोणतेही फिचर आजपर्यंत आलेले नसले तरी आता ही भूतकाळाची गोष्ट राहिली आहे कारण व्हॉट्सॲप लवकरच आपल्या युजर्संना एक मोठी भेट देणार आहे.(WhatsApp will bring an magic feature it will tell how long your friend is chatting with someone).
दरम्यान आता व्हॉट्सॲप युजर्संना चॅटिंग करताना आता एक मोठा अनुभव मिळणार आहे कारण लवकरच व्हॉट्सअपमध्ये एका नवीन फिचर्सचा समावेश होऊ शकतो. हे फिचर आत्तापर्यंत इतर कोणत्याही अॅपने ऑफर केलेल्यापेक्षा चांगले आणि अधिक मजेदार आहे. व्हॉट्सॲपच्या कंपनीने एक असे फिचर तयार केले आहे जे सांगेल की संबधित युजर्सचे मित्र, नातेवाईक त्याच्याशी बोलत आहेत की नाही. जेव्हा कोणत्याही व्यक्तीच्या फोनमधील संपर्क आपल्या फोनमध्ये सेव्ह असेल त्या दरम्यान तो आपल्या व्हॉट्सॲप वरून कोणाशी बोलत असेल तर त्याची त्वरित नोटिफिकेशन मिळेल. सोबतच हे देखील समजेल की कोण त्या संबधित युजर्सच्या बाबतीत बोलत आहे.
काही लोक याला गोपनीयतेचे उल्लंघन म्हणू शकतात, परंतु हे फिचर अगदी अद्वितीय म्हणजेच सर्वांपेक्षा वेगळे आहे. कंपनी कोणत्या दृष्टीकोनातून ते आणू शकते याबाबत अद्याप तरी कोणालाच कल्पना नाही. मात्र या क्षणी जर हे फिचर व्हॉट्सॲपमध्ये आले तर काही लोकांना चॅटिंगचा अधिक आनंद होईल, तर काही लोक त्यावर आक्षेपही घेऊ शकतात. लक्षणीय बाब म्हणजे एखादी व्यक्ती एखाद्या युजर्सबद्दल बोलत असेल तर त्याला एक नोटिफिकेशन मिळेल ज्यामध्ये त्या व्यक्तीचा फोटो असेल जेणेकरून त्याला समजेल की ही व्यक्ती त्या युजर्सशी बोलत आहे. दरम्यान आताच्या घडीला हे फिचर फक्त बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध आहे. मात्र हे फीचर लाँच होईल की नाही याबाबत अद्यापही संभ्रम वर्तवला जात आहे.