ATM मशीनमध्ये हिरव्या रंगाची लाईट का असते? याचा तुम्हाला फायदा काय? वाचा सविस्तर...

ATM Machine: एटीएम मशीनचा वापर करत असताना आपण पाहिलं असेल की, कार्ड स्लॉटच्या जवळ हिरव्या रंगाची लाईट पेटते. मात्र, हिरव्या रंगाची ही लाईट का? त्या लाईटची आवश्यकता काय? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या...

Representative Image
प्रातिनिधिक फोटो (Photo: iStock) 
थोडं पण कामाचं
  • ATM मशीनमध्ये कार्ड स्लॉटच्या जवळ ग्रीन लाईट
  • हिरव्या रंगाच्या लाईटचा नेमका उद्देश काय?

What is use of green light in ATM Machine: आपल्याकडे हातात रोख रक्कम किंवा खर्चासाठी रोख रक्कम आवश्यक असल्यास आपण बँकेऐवजी एटीएममधून पैसे काढण्याला प्राधान्य देतो. कारण, एटीएममधून तुम्ही कधीही आणि कुठल्याही बँकेच्या एटीएम मशीनमधून पैसे काढू शकता. जेव्हा तुम्ही कॅश काढण्यासाठी एटीएममध्ये जाता तेव्हा तुम्ही पाहिलं असेल की एटीएम मशीनच्या कार्ड स्लॉट किंवा कार्ड रीडर जवळ हिरव्या रंगाची लाईट असते. एटीएम कार्ड स्लॉट जवळ असलेली ही लाईट ट्रान्झॅक्शन करताना ब्लिंक होते. मात्र, या लाईटची आवश्यकता का? जाणून घ्या. (Why ATM machines have green light flashes what is the reason behind it read in marathi)

एटीएम मशीनमध्ये लावण्यात आलेल्या या हिरव्या रंगाच्या लाईटचे अनेक अर्थ आहेत. हिरव्या रंगाची लाईट दर्शवते की, तुम्ही एटीएम मशीनचा वापर करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. तुम्ही आपला व्यवहार सुरू करू शकता. तसेच तुमचे ट्रान्झॅक्शन, व्यवहार पूर्ण झाल्यावर हिरव्या रंगाची लाईट ब्लिंक होऊ लागते.

हे पण वाचा : ही पेय करतात तुमची किडनी डिटॉक्स

हिरव्या रंगाची ही लाईट तुम्हाला कार्ड स्लॉटमध्ये एटीएम कार्ड एन्टर करण्याची आणि व्यवहार पूर्ण झाल्यावर त्या स्लॉटमधून कार्ड काढण्याचे सुचवतो. तुमचा व्यवहार पूर्णपणे योग्य आणि सुरक्षित व्हावा यासाठी एटीएम मशीनमध्ये असलेली ही हिरव्या रंगाची लाईट लावण्यात आलेली असते.

हे पण वाचा : ही ओषधी वनस्पती केसांना लावा अन् जादू पाहा

एटीएममध्ये हिरव्या रंगाची लाईट ब्लिंक झाली नाही तर?...

एटीएम मशीनमध्ये कोणतेही ट्रान्झॅक्शन, व्यवहार सुरू करण्यापूर्वी कार्ड रीडरमधील हिरवी लाईट ब्लिंक होते. एटीएम मशीनवर कोणत्याही प्रकारचा व्यवहार होत नसेल आणि त्यावेळी कार्ड रीडरची लाईट ब्लिक होत नसेल तर अशा एटीएमचा वापर न करण्याचा सल्ला दिला जातो. एटीएम मशीनमधून पैसे काढताना पीन नंबर टाकण्याची आवश्यकता असते आणि तुमचा पीन नंबर की पॅडवर टाईप करताना इतर कुणालाही दिसू नये याची काळजी घ्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी