tech Knowledge : कॉम्प्युटरमुळे सर्व काही जलद आणि सोपे झाले आहे. संगणकामुळे आपली कामे जलद होतात. सुरुवातीच्या काळात संगणक आकाराने खूप मोठा आणि वजनाने जड होता, मात्र कालानुरूप त्याचे स्वरूप बदलत गेले. आता बॅगेत घेऊन जाता येतील इतके हलके लॅपटॉप आले आहेत. संगणकापासून ते लॅपटॉप पर्यंतच्या या प्रवासात एकमेव गोष्ट आहे जी स्थिर आहे. ती गोष्ट म्हणजे कीबोर्ड. कीबोर्ड ही एकमेव गोष्ट आहे जी त्याच्या स्थापनेपासून तशीच आहे. त्यात फारसा बदल दिसला नाही. जर तुम्ही कीबोर्ड नीट पाहिला असेल तर तुम्हाला हे दिसून आले असेल की संपूर्ण कीबोर्डमध्ये फक्त २ अक्षरे वेगळी जाणवली असतील. ती अक्षरे म्हणजे F आणि J. या दोन बटणावर रेष काढलेली दिसून येईल. पण या दोन्ही कीज वर ह्या रेषा का बनवल्या जातात.
हे पण वाचा : कॅम्पा कोला लॉन्च होताच कोका-कोलाने घटवली किमंत
आपल्यापैकी बरेच लोक याकडे लक्षही देत नसतील. मात्र ही बातमी वाचताना आपल्या लॅपटॉपच्या कीबोर्डचे नीट निरीक्षण जर केले तर त्याची प्रचिती येण्याची शक्यता आहे. मूळतः या छोट्या गोष्टीबद्दल लोकांना माहिती नसल्याकरणामुळे, ह्याच नेमका उपयोग काय हे जाणून घेण्याची गरज पडली नसेल. या दोन रेषा किबोर्डवर टाइप करणाऱ्याच्या सोयीसाठी बनवल्या गेल्या आहेत. यामुळे टायपिंग सोपे होते. जे कीबोर्ड न पाहता खूप वेगाने टाइप करतात त्यांच्यासाठी हे दोन बंप एक प्रकारे GPS नेव्हिगेशन म्हणून काम करतात.
हे पण वाचा : आता फेसबुक आणि इंस्टाग्रामवर ब्लू टिकसाठी द्यावा लागेल चार्ज
टायपिस्टच्या दोन्ही हातांची तर्जनी किंवा पहिली बोटे त्यांच्या लक्ष्यावर आदळल्यानंतर F आणि J वर परत येतात. बोटांनाही या रेषांच्या उंचवट्याच्या स्पर्शाने ते योग्य अक्षरावर आहेत हे समजते. जर ते योग्य ठिकाणी नसेल तर टायपिंग बरोबर होणे शक्य नसते.
किबोर्ड कडे न बघता टाईप करण्यासाठी असतात हे बंप
कीबोर्डवरील F आणि J या अक्षरांवर आढळणारे लहान उंचवटे किंवा बंप हे कीबोर्डकडे न पाहता टाईप करणाऱ्याला मदत करतात. त्यांचे डावे आणि उजवे हात योग्य बटणावर ठेवण्यास सहाय्य करतात.
किबोर्ड च्या मधल्या रॉ ला होम रॉ की पोझिशन म्हणतात. एकदा तुम्ही तुमची डावी आणि उजवी बोटे F आणि J की वर ठेवल्यानंतर, बाकी कीबोर्डवर तुम्ही लीलया बोटे फिरवू शकतात.