मुंबई: WhatsApp सतत आपल्या यूजर्संना नवीन फीचर्स देत आहे. आता यूजर्स त्यांच्या व्हॉट्सअॅपवरुन पैसे देखील ट्रान्सफर करू शकतात. व्हॉट्सअॅपला नुकतीच पेमेंट सेवेमध्ये प्रवेश करण्याची संधी मिळाली. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) फेसबुकच्या मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपला आपल्या २० दशलक्ष ग्राहकांना ही पेमेंट सर्व्हिस देण्यास सांगितले आहे. नंतर, हळूहळू सर्व यूजर्ससाठी ही सेवा उपलब्ध होईल. आता आपण या सेवेद्वारे कोठेही पैसे पाठवू शकता. जाणून घ्या ही सेवा आपण कशी सुरु करु शकता.
अशा प्रकारे आपण व्हॉट्सअॅपवरून पैसे ट्रान्सफर करू शकता
व्हॉट्सअॅपद्वारे पेमेंट करण्यापूर्वी आपल्याकडे बँक खाते आणि फोन नंबर असणे आवश्यक आहे. पेमेंट देण्यासाठी आपल्याला एक यूपीआय पासकोड देखील सेट करणे आवश्यक आहे. आपल्याकडे आधीपासून यूपीआय अॅपसह एक यूपीआय पासकोड असल्यास आपण तो कोड देखील वापरू शकता. हे लक्षात घ्या की व्हॉट्सअॅपवरचे व्यवहार फक्त भारतीय बँक खात्यांशी जोडल्या गेलेल्या भारतीय क्रमांकासाठीच करता येतात. ज्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रमांक आहेत ते व्हॉट्सअॅप पेमेंट करू शकत नाहीत.