Technology News: मच्छर आणि उंदरांच्या त्रासापासून होईल सुटका; घरी आणा हे स्वस्तातील डिव्हाइस 

टेक इट Easy
Updated May 27, 2022 | 13:55 IST | टाइम्स नाऊ मराठी

WRIGHTRACK Pest Repeller । घरातील सर्वच सदस्य मच्छर आणि उंदरांच्या त्रासामुळे त्रस्त झालेले असतात. त्यासाठी ते नाना प्रकारचे उपाय अवलंबून पाहतात तरीदेखील त्यांपासून सुटका होत नाही.

WRIGHTRACK Pest Repeller Machine will get rid of mosquitoes and rats
हे डिव्हाइस मच्छर आणि उंदरांच्या त्रासापासून करेल सुटका   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • घरातील सर्वच सदस्य मच्छर आणि उंदरांच्या त्रासामुळे त्रस्त झालेले असतात.
  • मच्छर आणि उंदरांना पळवून लावण्यासाठी तुम्हाला पेस्ट रिपेलर मशीनचा वापर करावा लागेल.
  • हे डिव्हाइस ८००- १,२०० चौरस फूट परिसरात प्रभाव टाकते.

WRIGHTRACK Pest Repeller । मुंबई : घरातील सर्वच सदस्य मच्छर आणि उंदरांच्या त्रासामुळे त्रस्त झालेले असतात. त्यासाठी ते नाना प्रकारचे उपाय अवलंबून पाहतात तरीदेखील त्यांपासून सुटका होत नाही. दरम्यान मच्छर आणि उंदरांना पळवण्यासाठी तुम्ही गॅझेटचाही वापर करता. असेच एक गॅझेट ई-कॉमर्स साइट ॲमेझॉनवर (Amazon) देखील उपलब्ध आहे. (WRIGHTRACK Pest Repeller Machine will get rid of mosquitoes and rats). 

अधिक वाचा : 'धाडसी' रमाई या एका चित्रपटामुळे आली जगासमोर

मच्छर आणि उंदरांना पळवून लावण्यासाठी तुम्हाला पेस्ट रिपेलर (Pest Repeller) मशीनचा वापर करावा लागेल. राइटट्रॅक पेस्ट रिपेलर (WRIGHTRACK Pest Repeller) मशीन ॲमेझॉनवर उपलब्ध आहे. त्याची किंमत आता ६६४ रुपये ठेवण्यात आली आहे. याबाबत कंपनीचा दावा आहे की, डास, उंदीर, झुरळे, कोळी आणि इतर कीटकांनाही या मशीनद्वारे दूर करता येते.

कंपनीने असेही म्हटले आहे की, WRIGHTRACK पेस्ट रिपेलरमध्ये कोणतेही रसायन वापरले जात नाही. त्यामुळे ते मुलांसाठी आणि इतर लोकांसाठी सुरक्षित आहे. याचा आवाज देखील येत नाही असे सांगण्यात आले आहे. 

मशीन असे करते काम

या मशीनची काम करण्याची पद्धत अगदी सोपी आहे. कंपनीने WRIGHTRACK Pest Repeller संदर्भात दिलेल्या माहितीनुसार, हे उपकरण अल्ट्रासोनिक फ्रिक्वेन्सी साउंड वेव्ह वापरते. यामुळे उंदीर आणि डास घरापासून दूर राहतात. तसेच याला वापरणे देखील खूप सोपे आहे. याबाबत कंपनीने सांगितले आहे की ते फ्लोरपासून ७-१६ इंच वर ठेवावे. त्याला कुठेही सेट करणे खूप सोपे आहे. तुम्हाला फक्त या डिव्हाइसला सॉकेटमध्ये लावायचे आहे. 

हे डिव्हाइस ८००- १,२०० चौरस फूट परिसरात प्रभाव टाकते. हे पूर्णपणे कार्य करण्यासाठी ३ ते ४ आठवडे लागू शकतात. तुम्ही तुमच्या रूमनुसार वेगवेगळी उपकरणे खरेदी करू शकता. वर माहिती दिल्याप्रमाणे Amazon वर त्याची किंमत ७७४ रुपये ठेवण्यात आली आहे. तुम्ही इतर ब्रँडमधून पेस्ट रिपेलर डिव्हाइस देखील खरेदी करू शकता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी