Xiaomi K20: रेडमी के20 चा टीझर समोर, जाणून घ्या फोनचे खास फीचर

टेक इट Easy
Updated Jun 28, 2019 | 19:30 IST

Redmi K20: शाओमीनं लॉन्चिंगच्या आधी रेडमी के20 स्मार्टफोनचा टीझर रिलीज केला आहे. या फोनमध्ये तुम्हाल स्नॅपड्रॅगन 730 प्रोसेसर मिळणार आहे. जाणून घ्या खास गोष्टी. 

Xiaomi K20
Xiaomi K20: रेडमी के20 चा टीझर समोर, जाणून घ्या फोनचे खास फीचर  |  फोटो सौजन्य: Twitter

शाओमीनं रेडमी के20 स्मार्टफोन भारतात टीज केला आहे. शाओमीनं ट्विटर अकाऊंटवर टीझर लॉन्च केला आहे. ज्यात स्नॅपड्रॅगन 730 प्रोसेसरचा परफॉर्मेन्स दाखवण्यात आला आहे. स्नॅपड्रॅगन 730 प्रोसेसरसोबत रेडमी के20 स्मार्टफोन गेल्या महिन्यात चीनमध्ये लॉन्च झाला. या फोनसोबत शाओमीनं चीनमध्ये रेडमी के20 प्रो स्मार्टफोन देखील लॉन्च केला. दोन्ही ही रेडमी 'के' सीरिज स्मार्टफोन, फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले आणि तीन रिअर कॅमेरा सेटअपसोबत येतात. 

रेडमीनं या स्मार्टफोनमध्ये 48 मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स 582 प्रायमरी सेंसर दिलं आहे. शाओमी इंडियाद्वारे जारी करण्यात आलेल्या टीझरमध्ये AnTuTu परफॉर्मेन्स स्कोर दाखवण्यात आलं आहे. त्यासोबतच स्नॅपड्रॅगन 730 प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 710 प्रोसेसरवरून 40 टक्के जास्त असल्याचा दावा देखील कंपनीकडून करण्यात आला आहे. यासोबतच शाओमीनं रियलमी 3 प्रो आणि नोकिया 8.1 दोन्ही स्मार्टफोनवर पिंच घेतली आहे. हे दोन्ही फोन या वर्षीच्या मे महिन्यात लॉन्च झाले. 

Redmi K20

गेल्या महिन्यात चीनमध्ये लॉन्च झालेले हे दोन्ही स्मार्टफोन लवकरच भारतात लॉन्च होतील. काही आठवड्यापूर्वी शाओमी इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर मनु कुमार जैन यांनी ट्विट करून ही माहिती दिली होती. जैन यांनी म्हटलं की, हे दोन्ही स्मार्टफोन काही आठवड्यातच भारतात लॉन्च होणार आहेत. 

भारतात रेडमी के20 ची अंदाजे किंमत 

भारतात या फोनची किंमत अद्याप स्पष्ट झाली नाही आहे. मात्र चीनमध्ये या फोनच्या किंमतीचा खुलासा झाला आहे. चीनमध्ये या स्मार्टफोनचे 6 जीबी रॅम 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 1,999 युआन (जवळपास 20,200 रूपये) मध्ये लॉन्च केलं. तर फोनचा 6 जीबी रॅम 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 2,099 युआन (जवळपास 21,200 रूपये ) आणि 8 जीबी रॅम 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 2,599 युआन (जवळपास 26,200 रूपये) मध्ये येते. 

रेडमी के20 स्मार्टफोनचे फीचर

रेडमी के20 स्मार्टफोन 6.39 इंचाच्या फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्लेसोबत येतो. ज्यात तुम्हाला त्यात इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर मिळेल. हा फोन स्नॅपड्रॅगन 730 प्रोसेसरवर काम करेल. ज्यात 8 जीबीपर्यंत रॅम आणि 256 जीबीपर्यंत स्टोरेज मिळेल. 

फोनमध्ये तीन रिअर कॅमेरा- 48 मेगापिक्सल सोनी आयएमएक्स 582 सेंसर, 13 मेगापिक्सल सेकंडरी सेंसर आणि एक 8 मेगापिक्सलचा सेंसर असेल. फ्रंटमध्ये शाओमीनं 20  मेगापिक्सलचा पॉप अप सेल्फी कॅमेरा दिला आहे. रेडमी के20 मध्ये शाओमीनं 4000 एमएएचची बॅटरी, फास्ट चार्जिंग, यूएसबी टाइप सी पोर्ट दिलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Xiaomi K20: रेडमी के20 चा टीझर समोर, जाणून घ्या फोनचे खास फीचर Description: Redmi K20: शाओमीनं लॉन्चिंगच्या आधी रेडमी के20 स्मार्टफोनचा टीझर रिलीज केला आहे. या फोनमध्ये तुम्हाल स्नॅपड्रॅगन 730 प्रोसेसर मिळणार आहे. जाणून घ्या खास गोष्टी. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola