7 सीटची Hyundai Creta SUV टेस्ट रन, पाहा कशी असणार ही कार 

ह्युंदाई क्रेटा हा कार आता आपल्याला 7-सीटर एसयूव्ही व्हर्जनमध्ये पाहायला मिळणार आहे. या कारचं ट्रायल रन देखील सुरु झालं आहे. या वर्षाच्या शेवटी ही कार भारतात लाँच होऊ शकते. 

7 seater hyundai creta suv
7 सीटची Hyundai Creta SUV टेस्ट रन  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई: ह्युंदाई क्रेटा एसयूवी कारचं 7-सीटर व्हर्जनची ट्रायल रन सुरु झाली आहे. पण कंपनीने आगामी एसयूवी कारच्या नावाबाबत अद्याप खुलासा केलेला नाही. पण अशी चर्चा आहे की, ह्युंदाई अलकजार (Hyundai Alcazar) असं या नव्या कारचं नाव ठेवलं जाणार आहे. दरम्यान, असंही म्हटलं जात आहे की, या वर्षाच्या अखेरीस ही कार भारतात लाँच होईल. 

आता नव्या 7 सीटर ह्युंदाई क्रेटाच्या फोटोवरुन असं दिसून येत आहे की, ही एसयूव्ही कार पूर्णपणे बदलण्यात आली आहे. यात ग्रील आणि नव्या ऑली चाकांसह रिवाइज्ड बम्पर समोर मिळणार आहे. याशिवाय, आगामी 7-सीटर एसयूवी ह्युंदाई क्रेटामध्ये झुकलेल्या छताऐवजी सरळ छत दिसून येत आहे. आगामी ह्युंदाई एसयूव्ही मध्ये स्पोर्ट रॅप-अराउंड टेल लाइट्ससह एक नवं बूट झाकण देखील असणार आहे. 

डायमेंशनमध्ये - Hyundai Alcazar ह्युंदाई क्रेटाच्या तुलनेत लांब आणि उंच असणार आहे. पण यांचा व्हीलबेस मात्र समान असणार आहे. खरं तर सीट आणि तीसरी लाइन वाढविण्यासाठी या कारमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.

Hyundai Creta 7 सीटर एसयूव्हीचं इंजन ऑप्शन 5-सीटर ह्युंदाई क्रेटासारखंच असेल. म्हणजेच 1.4-लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन, 1.5-लीटर पेट्रोल इंजिन आणि 1.5-लीटर डिझेल इंजिनप्रमाणेच इंजिन पर्यांयांसोबतच ही कार लाँच केली जाईल. मर्यादित व्हेरिएंटच्या आधारावर ट्रांसमिशन पर्यांयांच्या लिस्टमध्ये 7 स्पीड डीसीटी, सहा स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स आणि सर्व सहा स्पीड ऑटोमेटिक यांचा समावेश असणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी