अलर्ट! २ दिवसांत कार-बाईकवर ही खास नंबर प्लेट नाही लावली तर, होईल ५,५०० रुपयांचा दंड...परंतु

भ्रूममभ्रूमम
Updated Apr 13, 2021 | 21:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

ही खास नंबर प्लेट तुमच्या वाहनाला अधिक सुरक्षित बनवते. एचएसआरपी (HSRP)ला स्नॅप-ऑन-लॉकद्वारे वाहनावर जॅम केले जाते.

Alert : HSRP compulsory 2 wheelers, 4 wheelers
अॅल्युमिनियमची खास एचएसआरपी प्लेट 

थोडं पण कामाचं

  • हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP)
  • ही नंबर प्लेट लावणे वाहनांसाठी बंधनकारक
  • या प्लेटद्वारे तुमचे वाहन होईल ट्रॅक

नवी दिल्ली : तुम्ही जर आपल्या गाडीवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP)लावली नसेल तर यासाठी तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अॅंड हायवेज (MoRTH)ने सर्व वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावणे बंधनकारक केले आहे. काही राज्यांमध्ये यासाठीची अंतिम तारीखदेखील दिली आहे. तर काही राज्यांमध्ये मात्र अद्याप अंतिम तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. 

जर तुमच्या वाहनावर ही खास नंबर प्लेट दिसली नाही तर तुम्हाला ५,५०० रुपयांचा दंड आकारला जाईल. तुमच्या मनात या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP)बद्दल अनेक प्रश्न असतील. यासंदर्भात अधिक जाणून घेऊया.

१५ एप्रिल अंतिम तारीख


HSRP म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ही अॅल्युमिनियमपासून बनलेली असते. या प्लेटवर तुमच्या गाडीचा नोंदणी क्रमांक लिहून याला नॉन युजेबल लॉकद्वारे तुमच्या वाहनावर लावले जाते. याला काढता येत नाही. काही राज्यांमध्ये १५ एप्रिलपासून ही नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आली आहे. जर तुम्ही ही नंबर प्लेट लावली नाही तर तुम्हाला दंड भरावा लागेल.

कशी दिसते ही नंबर प्लेट


हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटवर डाव्या बाजूला वरच्या बाजूस अशोक चक्राचे क्रोमियम आधारित निळ्या रंगाचा हॉट स्टॅम्प हॉलोग्राम चस्पा असतो. प्लेटच्या खालच्या भागात डाव्या बाजूला दहा अंकी लेजर इंग्रेव्ड पिन कोरलेला असतो. तो तुमचा कायमस्वरुपी पत्ता असतो. याशिवाय या नंबर प्लेटचे कोन राऊंड शेपमध्ये असतील.

काय आहे याची खासियत


ही नंबर प्लेट तुमच्या वाहनाला अधिक सुरक्षित बनवते. एचएसआरपीला स्नॅप-ऑन-लॉक द्वारे वाहनावर जॅम केले जाते. यामुळे तुमची नंबर प्लेट काढली जाऊ शकत नाही. जर तुमच्या गाडीची चोरी झाली तर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटद्वारे तुमच्या वाहनाला ट्रॅक केले जाऊ शकते.

सर्वसाधारणपणे गाडीची चोरी झाल्यावर त्याची नंबर प्लेट बदलली जाते. एचएसआरपी लावल्यामुळे असे होऊ शकणार नाही. जर वाहनाची चोरी झाली तर त्याला ट्रॅक करण्यासाठी १० अंकांचा पिन, जो तुमच्या वाहनाच्या नंबर प्लेटवर लावलेला असेल तर त्याला बदलता येणार नाही. त्याच्या आधारे तुमचे वाहन ट्रॅक केले जाऊ शकते.

या नंबर प्लेटची किंमती किती


एचएसआरपीची किंमत प्रत्येक राज्यात वेगवेगळी असू शकते. दुचाकी वाहनांसाठी एचएसआरपीची किंमत ४०० रुपये आणि चारचाकी वाहनांसाठी जवळपास १,१०० रुपये इतकी असू शकते. दिल्ली आणि उत्तर प्रदेशात एचएसआरपीला बंधनकारक करण्यात आले आहे.

वाहनांची सुरक्षितता आणि बेकायदेशीर व्यवहारांवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलेले आहे. देशात कोट्यवधी दुचाकी आणि चारचाकी वाहने आहेत. या वाहनांच्या योग्य नियमनासाठी विविध उपाययोजनांची आवश्यकता असतेे. त्यासाठीच सरकारने विविध पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. त्यासाठी सरकार नवीन नियम आणि यंत्रणादेखील आणते आहेत. यामुळे भविष्यात रस्त्यांवरील वाहनांचे योग्य नियमन करणे शक्य होणार आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी