अॅमो इलेक्ट्रिक बाइक्सच्या विक्रीसाठी आक्रमक मार्केटिंग

अॅमो (एएमओ) इलेक्ट्रिक बाईक्स या सणासुदीच्या हंगामात ३५० टक्क्यांपेक्षा जास्त विक्रीसाठी आक्रमक मार्केटिंग करत आहे. 

AMO ELECTRIC BIKES targets 350 percent growth in sales of its flagship products this festive season
अॅमो इलेक्ट्रिक बाइक्सच्या विक्रीसाठी आक्रमक मार्केटिंग 

थोडं पण कामाचं

  • अॅमो इलेक्ट्रिक बाइक्सच्या विक्रीसाठी आक्रमक मार्केटिंग
  • सणासुदीच्या हंगामात ३५० टक्क्यांपेक्षा जास्त विक्रीसाठी आक्रमक मार्केटिंग
  • गेल्या वर्षीपेक्षा जास्त विक्री करण्याचे प्रयत्न

मुंबईः भारतात विश्वासार्ह, टिकाऊ आणि परवडणारे ई-मोबिलिटी सोल्यूशन्स तयार करणारा ब्रँड अॅमो (एएमओ) इलेक्ट्रिक बाईक्स या सणासुदीच्या हंगामात ३५० टक्क्यांपेक्षा जास्त विक्रीसाठी आक्रमक मार्केटिंग करत आहे. AMO ELECTRIC BIKES targets 350 percent growth in sales of its flagship products this festive season

गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीला आपल्या ई-बाइक्स जँटी आणि इन्स्पायरच्या विक्रीत अनुक्रमे २०० टक्के आणि १००-१५० टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे. ३-४ वेगवेगळ्या प्रकारांमध्ये उपलब्ध असलेले, जँटी हे १८ ते ४५ वर्षांच्या दरम्यान ग्राहकांना सेवा पुरवणारे कुटुंबाभिमुख उत्पादन आहे. ई-बाईक कमी आणि जादा वेग क्रमवारीत उपलब्ध आहे. दुसरीकडे, इन्स्पायर ही एक कमी वेगाची बाईक आहे जी १४ ते ४५ वर्षे वयोगटातील सर्वांसाठी डिझाइन केलेली आहे. हे वाहन शालेय विद्यार्थी, किशोरवयीन मुले, किरकोळ साखळी स्टोअर, दैनंदिन संकलन एजंट आदींसाठी डिझाइन केले आहे. सरकारी नियमांनुसार हे वाहन चालवण्यासाठी कोणत्याही नोंदणी आणि परवान्याची आवश्यकता नाही.

भारतभरातील १०० हून अधिक शहरांमध्ये या ब्रँडची सहज उपस्थिती आहे आणि उत्तर, पूर्व, पश्चिम आणि मध्य भारतातील १४-१५ राज्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. सध्या १२० पेक्षा जास्त चॅनेल भागीदार असलेल्या या ब्रँडमध्ये पुढील ६-८ महिन्यांत १०० टक्के वाढ होण्याची चिन्हं आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी