किआ कार्निवल भारतात लॉन्च, 9 सीट असलेल्या कारची किंमत जाणून घ्या 

Kia Carnival Price: किआ मोटर्सनं भारतात आपली दुसरी कार लॉन्च केली आहे. ऑटो एक्सपोमध्ये कंपनीनं किआ कार्निवल सादर केली. ज्यात 7 ते 9 सीटरचा पर्याय आहे. जाणून घ्या त्याची किंमत.

Kia carnival
किआ कार्निवल भारतात लॉन्च, 9 सीट असलेल्या कारची किंमत जाणून घ्या   |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबईः  किआ मोटर्सनं भारतीय बाजारात आपल्या दुसऱ्या कारच्या किंमतीवरून पडदा हटवला आहे. ऑटो एक्सपो 2020 मध्ये किआनं आपली एमपीवी कार्निव्हलच्या किंमतीची घोषणा केली आहे. किआ कार्निवलची सुरूवातीची किंमत 24.95 लाख रूपये आहे आणि याची टॉप व्हेरिएंटची किंमत 33.95 लाख रूपये एक्स शोरूम आहे. कंपनीनं ही कार केवळ डीझल ऑटोमेटिक व्हेरिएंटमध्ये लॉन्च केली. ही कार तीन सीट अरेंजमेंट आणि तीन ट्रिमसोबत येते. 

एंट्री लेव्हल प्रीमियम व्हेरिएंटमध्ये कार 7 आणि 8 सीट अरेंजमेंटमध्ये उपलब्ध आहे. तर मिड स्पेक असलेला प्रेस्टीज व्हेरिएंट 7 ते 9 सीट अरेंजमेंटमध्ये येतो. टॉप व्हेरिएंटमध्ये तुम्हांला केवळ 7 सीटचा पर्यायच मिळतो. 7 सीटर प्रीमियम किआ कार्निवलची किंमत 24.95 लाख रूपये आहे. 8 सीटर प्रीमियम व्हेरिएंट 25.15 लाख रूपये, प्रेस्टीजचा 7 सीटर व्हेरिएंट 28.95 लाख रूपये, प्रेस्टीज 9 सीटर 29.95 लाख रूपये आणि Limousine 7 सीटर व्हेरिएंट 33.95 लाख रूपयांच्या किंमतीला येतो. 

या कारचा भारतीय बाजारात टोयोटा इनोव्हा क्रिस्टाशी स्पर्धा होणार आहे. दोन्ही कारच्या किंमतीत बराच फरक आहे. इनोव्हा क्रिस्टाचा डिझेल ऑटोमेटिक व्हेरिएंट 18.22 पासून 23.02 लाख रूपये एक्स शोरूम दिल्ली किंमत येतो. कार्निवलचा इनोव्हाशी थेट स्पर्धा नाही आहे. मात्र बाजाराच्या आधारावर या दोन्ही कारची टक्कर जरूर होईल. 

स्टॅंडर्ड सेफ्टी फिचर असलेली कार्निवलमध्ये ड्युअल एअरबॅग, एबीएस ईबीडी, चाइल्ड सीट माऊंट, पार्किंग सेंसर आणि रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे. कारमध्ये प्रोजेक्टर हेडलॅम्प, 18 इंचाच एलॉय व्हिल, पावर स्लाइड डोर, ऑटोमेटिक क्लायमेट कंट्रोल, 8.0 इंचाच टचस्क्रिन अॅन्ड्रॉईड ऑटो आणि अॅप्पल कार प्लेसोबत, क्रूज कंट्रोल, कीलेस एंट्री गो, टिल्ट आणि टेलीस्कोबिक स्टीयरिंग आणि पावर एडज्स्टेबल विंग मिरर दिला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी