ऑटो एक्‍सपो 2020: Maruti च्या नव्या Ignis वरून उठला पडदा, जाणून घ्या वैशिष्ट्ये 

यूपीतील ग्रेटर नोएडामध्ये आयोजित ऑटो एक्स्पोमध्ये मारुती सुझुकीची नवीन इग्निस  वरून पडदा उठला आहे. 

auto expo 2020 maruti suzuki ignis mg gloster price unveiled features auto news in marathi tuto 1
ऑटो एक्‍सपो 2020: Maruti च्या नव्या Ignis वरून उठला पडदा, जाणून घ्या वैशिष्ट्ये   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • नवीन Ignis मध्ये BS6 कम्प्लायंट 1.2 लीटरचे K12 पेट्रोल इंजिन आहे. 
  • इंजिन 82 bhp ची पॉवर आहे. तर 1​13 Nm टॉर्क जनरेट करतो 

ग्रेटर नोएडा : उत्तर प्रदेशचे ग्रेटर नोएडामध्ये आयोजित ऑटो एक्स्पो २०२० च्या तिसऱ्या दिवशी शुक्रवारी मारुती सुझुकीची नवी Ignis वरून पडदा उठला आहे. पेट्रोल इंजिनचे कॉम्पॅक्ट स्पोर्ट्स यूटिलिटी व्हीकल (एसयूवी) Ignis ची बुकिंग पण सुरू झाली आहे. 

मारुती सुझुकीची एमडी केनीची आयुकावा यांनी सांगितले की, मारुती सुझुकीच्या नेक्सा पोर्टफोलियामध्ये कॉम्पैक्ट स्पोर्ट्स यूटिलिटी व्हीकल (एसयूवी) Ignis चे खास स्थान आहे. यात कायम चालविण्याची सहजता आणि जागेची उपलब्धता याबाबत स्तुती होत आहे. लोकांना एसयूव्ही प्रमाणे उंच सीट आणि रस्त्यावर दिसणारे फिचर असलेले समृद्ध वाहन आवडते. आम्हांला आशा आहे की एसयूव्ही प्रमाणे डिझाइन आणि आत असलेल्या भरपूर स्पेसमुळे लोकांना नवी Ignis खूप आवडणार आहे. 

नव्या Ignis मध्ये BS6 कम्प्लायंट 1.2-लीटर K12 पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 82 bhp ची पावर आणि 113 Nm टॉर्क जनरेट करते.  तर 5-स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गियरबॉक्सचे ऑप्शन उपलब्ध आहे. या कारमध्ये 17.78 सेंटीमीटरचा स्मार्टप्ले स्टूडियो, क्लाउडशी जोडले जाण्यास सक्षम इंफोटेनमेंट सिस्‍टम, ट्रॅफिकची ताजी माहिती, आवाज ओळखण्याची सिस्टीम, चालकाला सुरक्षाच्या दृष्टीने सतर्क करण्याचे इतर फिचर्सही देण्यात आले आहे. 


जर कलरच्या बाबतीत बोलायचे तर Ignis मध्ये दोन ऑप्शन (ल्यूसेंट ऑरेंज आणि फिरोजा ब्लू) आणि तीन नवे ड्यूल-टोन कलर ऑप्शन (ब्लॅकसह नेक्सा ब्लू, ब्लॅक सह ल्यूसेंट ऑरेंज आणि सिल्वर सह नेक्सा ब्लू) देण्यात आले आहे. या कारची बुकिंग आज (7 फेब्रुवारी) पासून सुरू होणार आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी