New Car Buyer Tips: नवीन कार घेताना लक्षात घ्या या गोष्टी, होईल मोठा फायदा

Car Tips : कार विकत घेण्याची (Car Buying) अनेकांना इतकी घाई असते की कारविषयी फारसे समजून न घेता किंवा कारच्या वैशिष्ट्यांविषयी फारशी माहिती न घेताच कार विकत घेतली जाते. वाहन खरेदी करताना टेस्ट ड्राईव्ह घेणे (Test Drive) आवश्यक आहे. टेस्ट ड्राईव्हद्वारे आपण वाहनाचा प्रत्यक्ष अनुभव घेतो. ही एक चांगली संधी असते. कार विकत घेताना कोणत्या गोष्टींचे भान ठेवायचे हे समजून घ्या.

Car buying tips
कार विकत घेतानाच्या टिप्स  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • नवीन कार घेताना काही गोष्टींचे भान ठेवा
  • कार विकत घेताना टेस्ट ड्राइव्हमध्ये काय करावे
  • कार विकत घेतानाच्या टिप्स

Car Tips :नवी दिल्ली : कार खरेदी करताना प्रत्येकजण उत्साहात असतो. मग टेस्ट ड्राइव्हदेखील घेतली जाते. कार विकत घेण्याची (Car Buying) अनेकांना इतकी घाई असते की कारविषयी फारसे समजून न घेता किंवा कारच्या वैशिष्ट्यांविषयी फारशी माहिती न घेताच कार विकत घेतली जाते. वाहन खरेदी करताना टेस्ट ड्राईव्ह घेणे (Test Drive) आवश्यक आहे. टेस्ट ड्राईव्हद्वारे आपण वाहनाचा प्रत्यक्ष अनुभव घेतो. ही एक चांगली संधी असते. त्यामुळे ती वाया घालवता कामा नये. दुर्दैवाने अनेक लोक कार विकत घेण्यापूर्वी टेस्ट ड्राईव्ह घेताना काही चुका करतात किंवा मोकळेपणाने टेस्ट ड्राइव्ह घेत नाहीत. परिणामी नंतर ग्राहकाचे मोठे नुकसान होते. टेस्ट ड्राईव्ह घेताना आणि नवीन कार विकत घेताना नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत ते पाहूया. (Avoid these mistakes during car buying and test drive)

अधिक वाचा  : Multibagger stock : या एका शेअरवर मिळणार मोफत 9 शेअर्स, शिवाय शेअर स्प्लिट होत होणार 10 शेअर्स...गुंतवणुकदारांच्या शेअरवर उड्या

चाचणी ड्राइव्ह घेताना घाई नको

टेस्ट ड्राइव्ह ही काही घाईघाईने उरकण्याची गोष्ट नाही. मात्र अनेकांना नवीन कार खरेदीची एवढी घाई झालेली असते की ते घाईघाईत टेस्ट ड्राइव्ह घेतात. टेस्ट ड्राइव्ह पटकन पूर्ण करून कागदपत्रांची पूर्तता करून त्यांना गाडी लवकर विकत घेण्याची आणि कार घरी नेण्याची घाई असते. घाईघाईने चाचणी ड्राइव्ह करणे म्हणजे कारबद्दल योग्य माहिती न घेणे. पुढे वाहनाबद्दलचे दोष किंवा कमतरता आपल्या लक्षात यायला लागतात आणि ती कार विकत घेतल्याचा पश्चाताप होतो.  

अधिक वाचा  : Hair Care Tips: सुंदर आणि चमकदार केस हवे आहेत? मग लावा हे घरगुती हेअर मास्क

कारची वैशिष्ट्ये समजून घ्या

आपल्याला जी कार विकत घ्यायची आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे असते. कारमध्ये बसून, तुम्ही शोरूममध्ये उपस्थित असलेल्या एजंटकडून वाहनाच्या वैशिष्ट्यांची संपूर्ण माहिती घेतली पाहिजे. कार विकत घेण्याच्या आनंदात आपण पुढे ते वाहन वापरताना येणाऱ्या अडचणी किंवा इतर बाबींचा विचार करायचे विसरून जातो. महत्त्वाच्या गोष्टींकडे ग्राहकांचे दुर्लक्ष होते आणि आपल्या गरजेनुसार वाहन न खरेदी करता चुकीचे वाहन विकत घेतो. म्हणूनच नवीन कार विकत घेताना शांतपणे वाहनाची वैशिष्ट्ये आणि सुविधा बारकाईने जाणून घेतली पाहिजेत.

अधिक वाचा  : मेव्हण्याचं केलं अपहरण...खंडणी म्हणून मागितली वधू

गर्दीतील टेस्ट ड्राइव्ह महत्त्वाची

नवीन कार विकत घेताना टेस्ट ड्राइव्ह अतिशय महत्त्वाची असते. गर्दीच्या ठिकाणीदेखील ती घेतली पाहिजे. मात्र ती घेताना काळजीपूर्वक घेतली पाहिजे जेणेकरून अपघात होणार नाही.

पॅसेंजर सीटवर बसून करा टेस्ट ड्राइव्ह

फक्त कार चालवून म्हणजे ड्रायव्हिंग सीटवर बसूनच टेस्ट ड्राइव्ह घेऊ नये. ती पॅसेंजर सीटवर बसूनदेखील घ्यावी. म्हणजे तुम्हाला ती कार किंवा वाहन सर्वदृष्टीने समजून घेता येते. त्याच्या फायद्या तोट्यांची तुम्हाला माहिती होते.

कार विकत घेताना फक्त बाह्य बाबींवर निर्णय घेऊ नका. ती कार तुमच्या गरजेनुरुप आहे की नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी