उद्या लॉन्च होणार बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर, पाहा किंमत आणि फिचर्स

भ्रूममभ्रूमम
Updated Jan 13, 2020 | 16:13 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Bajaj Chetak: बजाज कंपनीची चेतक इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात लॉन्च होत आहे. जाणून घेवूयात या चेतक इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत आणि फिचर्स काय आहेत. 

bajaj chetak electric scooter launch date price specification features technology news marathi
उद्या लॉन्च होणार बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर, पाहा किंमत आणि फिचर्स 

बजाज ऑटो कंपनी आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात लॉन्च करत आहे. ही दूचाकी म्हणजे बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर (Bajaj Chetak Electric Scooter). उद्या म्हणजेच 14 फेब्रुवारी रोजी ही स्कूटर भारतीय बाजारपेठेत अधिकृतपणे लॉन्च करण्यात येणार आहे. गेल्यावर्षी म्हणजेच 16 ऑक्टोबर 2019 रोजी या स्कूटरची झलक पहायला मिळाली होती. बजाज स्कूटर इलेक्ट्रिकचा आकर्षक लूक सध्या दूचाकी वाहन सेगमेंटमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर बजाज कंपनी ही दुचाकी भारतीय बाजारात लॉन्च करत आहे.

जुन्या बजाज चेतकची काहीशी डिझाईन ही नव्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये पहायला मिळते. मात्र, नव्या स्कूटरचा लूक काही औरच आहे. नव्या चेतक स्कूटरमध्ये एलईडी हेडलाईट क्लस्टर, ब्रॉड फ्रंट अॅपरन, साईड पॅनल्स, एलईडी टेल लाईट्स, एलईडी ब्लिंकर्स आणि अॅलॉय व्हिल्स देण्यात आले आहेत. 

नव्या बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अत्याधुनिक टेक्नोलॉजीनुसार, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, रंगबेरंगी टीएफटी स्क्रीन देण्यात आले आहेत. ही स्कूटर मोबाइल अॅपला फुल्ली कनेक्टेड असणार आहे. कनेक्टिव्हिटीसाठी बजाज चेतक मोबाइल अॅप देखील देत आहे जे बॅटरी रेंज, राइड हिस्ट्री यासारखी इतर महत्वाची माहिती दर्शवेल.

New Bajaj Chetak

बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर सहा रंगांत उपलब्ध होणार आहे. या स्कूटरमध्ये हाय टेक लिथियम - आयर्न बॅटरी पॅक मिळणार आहे. कंपनीने दावा केला आहे की, फुल चार्जिंग केल्यास इको मोडमध्ये ही स्कूटर 95 किलोमीटर इतका प्रवास सहज गाठेल. तर स्पोर्ट मोडमध्ये ही स्कूटर 85 किलोमीटर इतका प्रवास करेल.

Bajaj Chetak - Instrument Panel

नवी बजाज चेतक स्कूटर इलेक्ट्रिक 5-15 अॅम्पिअर सॉकिटच्या सहाय्याने 3 ते 5 तासांत फूल चार्ज होईल. या स्कूटरमधील इलेक्ट्रिक बॅटरी काढता येणार नाहीये. म्हणजेच या स्कूटरची बॅटरी काढून तुम्ही इतर ठिकाणी चार्चिंगसाठी लावू शकत नाही.

नव्या बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1 लाख रुपये (एक्स शोरूम) इतकी असण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र स्कूटर लॉन्च झाल्यानंतरच तिची किंमत समोर येईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी