Super Mileage Bike : ही बाईक आहे मायलेजची चॅम्पियन...काश्मीरहून ते कन्याकुमारीचा पेट्रोल खर्च फक्त 3,900 रुपये

Best mileage bike : सर्वसाधारपणे मोटरसायकलच्या (Bike) बाबतीत मायलेजचा मुद्दा बाजारातील सर्वात लक्षवेधी मुद्दा असतो. बजाजच्या (Bajaj Auto) मोटरसायकल या उत्तम मायलेजसाठी (Mileage) प्रसिद्ध आहे. हिरोच्या मोटरसायकलदेखील (Hero) यासाठी प्रसिद्ध आहेत. बजाज ऑटोच्या अनेक मोटरसायकल आहेत ज्या 70-90 किमी प्रति लिटरचा मायलेज देतात. बजाजची ही मोटरसायकल तर तुफान मायलेज देते.

Mileage Bike
तुफान मायलेज देणारी मोटरसायकल  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मोटरसायकलमध्ये मायलेज महत्त्वाचा
  • बजाजच्या मोटरसायकल मायलेजसाठी प्रसिद्ध
  • बजाजची ही मोटरसायकल देते बेस्ट मायलेज

Mileage king Bajaj bike :नवी दिल्ली : मोटरसायकल किंवा कोणतेही वाहन (Vehicle) म्हटले की त्याच्या ज्या वैशिष्ट्यांची सर्वाधिक चर्चा होते किंवा विचार होतो ते म्हणजे त्याचा मायलेज. हे वाहन किती इंधन खाते आणि किती अंतर कापते हा ग्राहकांच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा असतो. सर्वसाधारपणे मोटरसायकलच्या (Bike) बाबतीत तर हा मुद्दा बाजारातील सर्वात लक्षवेधी मुद्दा असतो. बजाजच्या (Bajaj Auto) मोटरसायकल या उत्तम मायलेजसाठी (Mileage) प्रसिद्ध आहे. हिरोच्या मोटरसायकलदेखील (Hero) यासाठी प्रसिद्ध आहेत. बजाज ऑटोच्या अनेक मोटरसायकल आहेत ज्या 70-90 किमी प्रति लिटरचा मायलेज देतात. ठराविक वेगाने टॉप गिअरमध्ये मोटरसायकल चालवली तर मायलेज आणखी वाढतो.  अशा मोटरसायकलमध्ये  बजाज सीटी 100(Bajaj CT100)ही मोटरसायकल इतर सर्व मोटारसायकलींपेक्षा वरचढ दिसते. सीटी100 चा मायलेज इतका जबरदस्त आहे की या मोटरसायकलवर तुम्ही काश्मीर ते कन्याकुमारी हे अंतर फक्त 3900 रुपयांच्या पेट्रोलमध्ये पार करू शकता. त्यातही जर दोघांनी प्रवास केला तर एकाच्या वाट्याला फक्त 1,950 रुपयांचा खर्च येईल.  (Bajaj CT100 gives super mileage of 90 km in 1 liter petrol)

अधिक वाचा - Diabetes Control : ही 5 हिरवी पाने मधुमेहाच्या रुग्णांसाठी आहेत वरदान...पाहा जबरदस्त फायदे

39 लिटर पेट्रोलमध्ये काश्मीर ते कन्याकुमारी ((Bajaj CT100)

बजाज ऑटोची सीटी100 ही एक जबरदस्त मायलेज देणारी मोटरसायकल (Best Mileage Bike) आहे. ही बाइक 1 लिटर पेट्रोलमध्ये 90Km मायलेज देते. आता याला जरा वेगळ्या पद्धतीने समजावून घेऊ. म्हणजे असे की काश्मीर ते कन्याकुमारी हे अंतर 3524 किमी आहे. याचाच अर्थ 3524 किमी अंतर चालवण्यासाठी या बाइकच्या मायलेजनुसार 39 लिटर पेट्रोल खर्च होईल. जर आपण 1 लिटर पेट्रोलची सरासरी किंमत 100 रुपये मानली तर 39 लिटर पेट्रोलची किंमत 3900 रुपये होते. म्हणजेच सीटी100 वापरून तुम्ही काश्मीर ते कन्याकुमारी एवढे प्रचंड अंतर फक्त 3900 रुपयांमध्ये कापू शकाल. त्यातही मोटरसायकलवर जर दोनजण बसले असतील तर हा खर्च निम्मा होईल. म्हणजे एकाच्या वाट्याला येणारा खर्च फक्त 1,950 रुपये इतका असेल. बजाजच्या या बाईकमध्ये 10 लिटरची पेट्रोल टाकी आहे. म्हणजेच एकदा पूर्ण टाकी भरल्यावर तुम्ही सलग 900 किमीपर्यतचा प्रवास करू शकता. आता एकूण अंतर पाहता काश्मीरहून कन्याकुमारीला जाताना तुम्हाला या बाईकमध्ये फक्त 4 वेळा टाकी भरावी लागणार आहे.

अधिक वाचा - PF Interest Update: ईपीएफओने जमा केली पीएफवरील व्याजाची रक्कम...पाहा तुमच्या खात्यात आली की नाही, लगेच अशी करा चेक

Bajaj CT100 ची खासियत 

>> बजाज CT100 मध्ये 99.27cc, 4-स्ट्रोक, सिंगल सिलेंडर नेचर एअर कूल्ड इंजिन आहे. ही बाइक सुमारे 8Hp पॉवर आणि 8.34Nm टॉर्क देते.
इंजिन 4 स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. या बाइकचा टॉप स्पीड 90 किमी प्रतितास इतका आहे. बाईकच्या पुढील बाजूस हायड्रॉलिक टेलिस्कोपिकसह 125mm चाके आणि मागील बाजूस SNS सस्पेंशनसह 100mm चाके आहेत. दोन्ही चाकांवर 110 ड्रम ब्रेक उपलब्ध आहेत. 

अधिक वाचा - Police saved life: चालत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पोलिसाने वाचवलं मृत्यूच्या दाढेतून, पाहा VIDEO

>> ही कम्युटर मोटरसायकल अतिशय साध्या आणि साध्या डिझाइनसह येते. ही बाइक ब्लू डेकल्ससह ग्लॉस इबोनी ब्लॅक, मॅट ऑलिव्ह ग्रीनसह पिवळे डेकल्स, ब्राइट रेड डेकल्ससह ग्लॉस फ्लेम, ग्लॉस इबोनी ब्लॅक, मॅट ऑलिव्ह ग्रीन आणि ग्लॉस फ्लेम रेडमध्ये बाजारात उपलब्ध आहे. 

बजाज CT100 ची किंमत

बजाजच्या या जबरदस्त मोटरसायकलची म्हणजे  CT100 ची एक्स-शोरूम किंमत 52,832 रुपये इतकी आहे. बाइकच्या टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 53,696 रुपये आहे. शिवाय ही मोटरसायकल बाईक 110cc आणि 125cc अशा दोन्ही इंजिन पर्यायांमध्येही बाजारात उपलब्ध आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी