बजाजची Pulsar 125 Neon, पाहा किंमत आणि फिचर्स...

Bajaj Pulsar 125 Neon: बजाज कंपनीने आपली नवी पल्सर 125 निऑन लॉन्च केली आहे. ही बाईक बजाज पल्सरच्या कॅटेगरितील सर्वात स्वस्त बाईक आहे. जाणून घ्या काय आहे काय बाईकची किंमत...

Bajaj Pulsar 125 Neon
बजाज पल्सर 125 Neon 

थोडं पण कामाचं

  • बजाजने पल्सर 125 निऑन केली लॉन्च
  • या बाईकची सुरुवाती किंमत 64 हजार रुपये (एक्स शोरूम दिल्ली) आहे
  • ड्रम ब्रेक आणि डिस्क ब्रेक अशा दोन व्हेरिएंटमध्ये बाईक उपलब्ध

मुंबई: बाईकप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, प्रसिद्द बाईक निर्माता कंपनी असलेल्या बजाज कंपनीने नवी पल्सर बाईक भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. या बाईकचं नाव बजाज पल्सर 125 निऑन असं आहे. बजाज कंपनीने पल्सरचं 125 cc व्हेरिएंट असलेली ही पल्सर निऑन लॉन्च केली आहे.  पल्सर 125 निऑन ही बाईक दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असणार आहे. या बाईकची सुरुवाती किंमत 64 हजार रुपये (एक्स शोरूम दिल्ली) इतकी आहे.

बाईकची किंमत 

बजाजने लॉन्च केलेली 125 निऑन (Bajaj Pulsar 125 Neon) ही बाईक दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये ड्रम ब्रेक व्हेरिएंट आणि डिस्क ब्रेक व्हेरिएंट यांचा समावेश आहे. ड्रम ब्रेक व्हेरिएंट बाईकची किंमत ही डिस्क ब्रेक बाईकच्या किमतीपेक्षा थोडी कमी आहे. दिल्लीतील एक्स शोरूममधील किमतीनुसार ड्रम ब्रेक बाईकची किंमत 64,000 रुपये आहे तर डिस्क ब्रेक बाईकची किंमत 66,618 रुपये इतकी आहे.

तीन रंगांत बाईक उपलब्ध

नव्या पल्सरची (पल्सर 125 निऑन) किंमत ही पल्सर 150 बाईकपेक्षा कमी आहे. कारण या बाईकची किंमत 68 हजार रुपयांपेक्षा (एक्स शोरूम दिल्ली) अधिक आहे. ही बाईक तीन रंगांत उपलब्ध होणार आहे. या तीन रंगांमध्ये निऑन ब्ल्यू, सोलर रेड आणि प्लॅटिनम सिल्वर या रंगांचा समावेश आहे.

बजाज ऑटोचे अध्यक्ष सारंग खांडे यांनी सांगितले की, 'आम्ही पल्सरच्या 125 cc व्हेरिएंट लॉन्च केल्यानंतर खूपच उत्साही आहोत. नवी पल्सर 125 निऑन ही बाईक अशा ग्राहकांसाठी एक चांगला पर्याय असणार आहे जे स्वस्तात एक स्पोर्टी बाईक खरेदी करु इच्छित होते. या बाईकमध्ये ग्राहकांना खूपच चांगला परफॉर्मन्स, स्टाईल आणि आकर्षक किंमतीत उपलब्ध होणार आहे'.

कशी आहे बाईक?

पल्सर 125 निऑन (Pulsar 125 Neon) या बाईकमध्ये 125 सीसीचं इंजिन देण्यात आलं आहे. हे एक डीटीएसआय इंजिन आहे जे 8500 आरपीएमवर 11.8 बीएचपीची ताकद आणि 6500 आरपीएमवर 11 एनएमचा टॉर्क जनरेट करतं. कंपनीच्या मते, हे इंजिन वेगवान स्पीडवर चांगला परफॉर्मन्स देत राहतंय पल्सर 125 निऑनमध्ये 5 स्पीड यूनिट असलेलं गिअरबॉक्स देण्यात आलं आहे जे रायडरला अगदी सहजपणे गिअर शिफ्ट करण्यास मदत करतं. पल्सर 125 निऑन या बाईकचं वजन 140 किलोग्रॅम इतकं आहे.

बाईक्सच्या वाढत्या किमती लक्षात घेत बजाज कंपनीने पल्सर 125 निऑन ही बाईक लॉन्च करण्याचा निर्णय घेतला. नवे सेफ्टी नॉर्म्स लागू झाल्यावर 125 सीसी आणि त्यापेक्षा अधिक सीसीच्या बाईक्समध्ये सीबीएस गरजेचं करण्यात आलं आहे. तर, 150 सीसी आणि त्यापेक्षा वरील बाईक्समध्ये एसबीएसचं फिचर आवश्यक आहे. 1 एप्रिल 2020 नंतर बीएस 6 नॉर्म्स लागू करण्यात आले आङेत त्यनंतर बाईक्सची किंमत आणखीन वाढली आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता बजाज कंपनीने नवी पल्सर 125 निऑन लॉन्च केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...