Electric Scooter : ही आहे नवीन इलेक्ट्रिक स्कूटर...देणार Ola, Hero, Okinawa ला टक्कर, रेंज 132Km, इतकी आहे किंमत...

BattRE Electric Scooter : इलेक्ट्रिक वाहनांचा आणि त्यातही इलेक्ट्रिक स्कूटरचा सध्या जमाना आला आहे. बाजारात इलेक्ट्रिक स्कूटर लोकप्रिय होत आहेत. आता बॅटरी (BattRE) ब्रँडने भारतीय बाजारपेठेत आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बॅटरी स्टोरी (BattRE Storie Electric Scooter)लॉन्च केली आहे. या कंपनीचे चार मॉडेल्स आधीच भारतीय बाजारात आलेले आहेत. अशा प्रकारे कंपनीने आपला पोर्टफोलिओ मजबूत केला आहे.

BattRE Storie Electric Scooter
बॅटरीची नवी इलेक्ट्रिक स्कूटर 
थोडं पण कामाचं
  • बॅटरीने लॉंच केली नवी इलेक्ट्रिक स्कूटर
  • सध्या भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांना वाढती मागणी
  • नवी इलेक्ट्रिक स्कूटरची थेट स्पर्धा ओला इलेक्ट्रिक, हिरो इलेक्ट्रिक, ओकिनावा, प्युअर ईव्ही या वाहनांशी

BattRE New Electric Scooter : नवी दिल्ली : इलेक्ट्रिक वाहनांचा आणि त्यातही इलेक्ट्रिक स्कूटरचा सध्या जमाना आला आहे. बाजारात इलेक्ट्रिक स्कूटर लोकप्रिय होत आहेत. आता बॅटरी (BattRE) ब्रँडने भारतीय बाजारपेठेत आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बॅटरी स्टोरी (BattRE Storie Electric Scooter)लॉन्च केली आहे. या कंपनीचे चार मॉडेल्स आधीच भारतीय बाजारात आलेले आहेत. अशा प्रकारे कंपनीने आपला पोर्टफोलिओ मजबूत केला आहे. नवीन बॅटरी स्टोरी इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) उत्कृष्ट लुक आणि शक्तिशाली वैशिष्ट्यांसह बाजारात लॉंच करण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की ते एका चार्जमध्ये 132Km ची रेंज देईल. त्याच वेळी, त्याची किंमत 90 हजार रुपये आहे. भारतीय बाजारपेठेत या नव्या इलेक्ट्रिक स्कूटरची थेट स्पर्धा ओला इलेक्ट्रिक, हिरो इलेक्ट्रिक, ओकिनावा, प्युअर ईव्ही या कंपन्यांशी होईल. (BattRE launches new electric scooter with 132 Km range)

अधिक वाचा : Free Ola Scooter : ओला स्कूटर मोफत मिळवण्याची संधी! भाविश अग्रवालने आणल्या आहेत जबरदस्त ऑफर्स, पाहा कशी

बॅटरी इलेक्ट्रिक स्कूटरचे वैशिष्ट्ये

ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, स्मार्ट स्पीडोमीटर मिळणार आहे. त्याच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे तर, यात स्मार्ट स्पीडोमीटरसह ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, टर्न बाय टर्न नेव्हिगेशन, कॉल अलर्ट, कनेक्टेड ड्राइव्ह वैशिष्ट्य, मोठे सीट आणि फूटबोर्ड, डायग्नोस्टिक सारांश यासह अनेक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. कंपनीने याला खास कॉम्युटर इलेक्ट्रिक स्कूटर म्हणून सादर केले आहे, जी दिसायलाही अतिशय आकर्षक आहे. सेफ्टी फीचर्स आणि आवश्यक त्या सर्व खबरदारीचीही काळजी घेण्यात आल्याचा दावा कंपनीने केला आहे. जेणेकरून त्यात आगीची दुर्घटना घडू नये.

अधिक वाचा : Tata Motors : टाटांच्या वाहनांवर मिळतेय 40,000 रुपयांपर्यंतची ऑफर, स्वस्तात गाडी खरेदी करण्याची मोठी संधी

बॅटरी इलेक्ट्रिक स्कूटरची क्षमता

एका चार्जवर 132Km ची रेंज उपलब्ध असेल. बॅटरी कंपनीने आतापर्यंत 30 हजारांहून अधिक इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या आहेत. कंपनीची ही नवीन स्टोरी इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच 300 शहरांमधील 400 डीलरशिपवर उपलब्ध होईल. यात लुकास टीव्हीएस मोटर आणि कंट्रोलर आहे. हे AIS 156 मंजूर 3.1kWh बॅटरी पॅकसह सुसज्ज आहे, ज्याची रेंज एका चार्जवर 132 किमी पर्यंत आहे. यात इको, स्पोर्ट सारखे काही ड्रायव्हिंग मोड देखील मिळतात. या स्कूटरवर फेम 2 योजनेअंतर्गत लोकांना सबसिडीही मिळणार आहे.

अधिक वाचा : World's Costliest Car : तब्बल 1100 कोटींना विकली गेली जगातील सर्वात महागडी कार, 'मर्सिडीज-बेंझ 300 SLR', 84 जणांचा घेतला होता जीव...

1 लाख किमी थर्मल चाचणी झाली

यापूर्वी इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हे लक्षात घेऊन कंपनीने ही स्कूटर लॉन्च करण्यापूर्वी 1 लाख किमीची थर्मल टेस्टिंग केली आहे. आगीच्या घटना टाळण्यासाठी त्याचा उद्देश होता. कंपनीचे म्हणणे आहे की या स्कूटरमुळे इलेक्ट्रिक टू-व्हीलर संदर्भात लोकांचा कल आणखी सकारात्मक होईल.

ओला इलेक्ट्रिकचे (Ola Electric)सह-संस्थापक भाविश अग्रवाल (Bhavish Aggarwal) आपल्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त ऑफर घेऊन आले आहेत. या ऑफरद्वारे तुम्ही मोफत ओला स्कूटर (Ola Electric Scooter)  घेऊ शकता. ओलाची केशरी रंगाची स्कूटर मोफत मिळवण्यासाठी दोन लोकांनी या ऑफरचा फायदा घेतला आहे. आता भाविशला इतर 10 ग्राहकांना मोफत ओला स्कूटर द्यायची आहे. यासाठी तुम्हाला एकच काम करावे लागेल. तुम्हाला तुमची स्कूटर एका चार्जमध्ये 200 किमी चालवावी लागेल. जर तुम्ही असे केले तर तुम्हाला ओला स्कूटर मोफत मिळू शकते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी