Best Cars : नवी दिल्ली : हॅचबॅक कार (Hatchback car)भारतात सर्वाधिक विकल्या जातात. या कारची किंमती किफायतशीर आहे तसेच लहान कुटुंबासाठी या कार योग्य पर्याय आहेत. जर तुम्हालाही नवीन कार घ्यायची असेल आणि बजेट थोडे कमी असेल तर आम्ही तुम्हाला 4 लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये उपलब्ध असलेल्या 3 कारबद्दल (Budget cars) सांगत आहोत. या कारचा मायलेजदेखील चांगला आहे. शिवाय त्या देशातील आघाडीच्या कार उत्पादक कंपन्यांच्या कार आहेत. (Best cars under price of Rs 4 lakh with mileage of 31 Km)
अधिक वाचा : Tyre Care Tips : पावसात टायर वारंवार पंक्चर होतात, त्याचे संरक्षण कसे करायचे? सुरक्षा टिप्स जाणून घ्या
हे वाहन दोन दशकांपासून भारतीय बाजारपेठेत आहे. कारची किंमत 3.39 लाख रुपयां (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. मारुती सुझुकी अल्टो 0.8-लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 47bhp आणि 69Nm टॉर्क जनरेट करते. हे CNG पर्यायामध्ये देखील येते. CNG सह कारचे मायलेज 31KM पेक्षा जास्त आहे. यात 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स, फ्रंट आणि रिअर बॉटल होल्डर, पॉवर विंडो, रिमोट कीलेस एंट्री आणि फ्रंट ड्युअल एअरबॅगसह दोन-टोन डॅशबोर्ड मिळतो.
कारची किंमत 3.99 लाख रुपयां (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. हे 1.0-लिटर 3-सिलेंडर पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे जे 67bhp/90Nm जनरेट करते. अल्टो प्रमाणे, हे CNG मध्ये देखील उपलब्ध आहे आणि 31KM पेक्षा जास्त मायलेज देते. वैशिष्ट्यांच्या यादीमध्ये सेंट्रली माउंटेड इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मारुती स्मार्ट प्ले स्टुडिओसह टचस्क्रीन सिस्टम, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, यूएसबी आणि 12-व्होल्ट स्विचेस, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स यांसारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
अधिक वाचा - Hyundai Small Electric Car : ह्युंडाईच्या छोट्या ई-कार लवकर भारतात लॉन्च, कंपनी पाहतेय एकाच गोष्टीची वाट
Datsun redi-GO हॅचबॅक किंमत 3.83 लाख रुपयां (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. यात 0.8 लीटर आणि 1 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे 22 kmpl पर्यंत मायलेज देते. यात LED DRLs, LED फ्रंट फॉग लॅम्प, डिजिटल टॅकोमीटर, नवीन ड्युअल-टोन 14-इंच व्हील कव्हर, अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेसह 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि कीलेस एंट्री यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.
कोरोना महामारीचा सर्वाधिक तडाखा ज्या क्षेत्रांना बसला त्यात ऑटोमोबाईल क्षेत्राचा समावेश आहे. मात्र आता अर्थव्यवस्था हळूहळू गती पकडत असताना आणि विविध आर्थिक घडामोडींनी गती आली असताना ऑटोमोबाईल क्षेत्रदेखील जोरदार वाटचाल करण्याच्या दिशेने कार्यरत झाले आहे. कोरोनानंतर भारतीय ऑटोमोबाईल उद्योग सुधारण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. सध्या वाहनांची मागणी जोरात आहे. यावेळी भारतीय बाजारपेठेत प्रचंड मागणी आहे, त्यामुळे कंपन्यांना दीर्घ प्रतीक्षा कालावधीचा सामना करावा लागत आहे. सध्या एसयूव्ही श्रेणीतील वाहने खूप लोकप्रिय होत आहेत.