'या' आहेत भारतातील सर्वात स्वस्त रोज वापरण्यासाठीच्या कार, १ लीटरमध्ये देतात जबरदस्त मायलेज

भ्रूममभ्रूमम
Updated Apr 30, 2021 | 20:05 IST | टाइम्स नाऊ मराठी

तुम्ही जर मोठ्या कार चालवू इच्छित नसाल आणि तुम्हाला स्वस्त आणि वापरण्यास सोपी कार घ्यायची असेल तर पुढील पर्याय तुमच्यासाठी योग्य आहेत. 

Cheapest & best mileage car
स्वस्त आणि बेस्ट मायलेज देणाऱ्या कार 

थोडं पण कामाचं

  • स्वस्त आणि बेस्ट मायलेजच्या कार
  • ट्रॅफिकमध्ये चालवण्यास सोप्या
  • किंमतसुद्धा तुमच्या आवाक्यातील

नवी दिल्ली : हल्ली रस्त्यांवर ट्रॅफिक वाढतच चालले आहे. त्यामुळे कार चालवणे हे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. जर तुमच्याकडे फुल साईज सेडान कार किंवा एसयुव्ही असेल तर ट्रॅफिकमध्ये या गाड्या चालवणे सोपे नसते. कारचा आकार जितका मोठा तितकी कार हाताळण्यास अवघड, अनेकवेळा त्यामुळे कारला डेंट, किंवा ओरखडे उमटतात. त्याउलट छोट्या आणि कमी वजनाच्या कार चालवणे ट्रॅफिकमध्ये सोपे असते. कारण त्यांना हाताळणे सोपे असते. तुम्ही जर मोठ्या कार चालवू इच्छित नसाल आणि तुम्हाला स्वस्त आणि वापरण्यास सोपी कार घ्यायची असेल तर पुढील पर्याय तुमच्यासाठी योग्य आहेत. 

Renault Kwid -

ही भारतात एक लोकप्रिय कार आहे. एसयुव्ही आणि सेडान कारच्या तुलनेत ही स्वस्त आहे. मात्र ही कार २१ ते २२ किमी प्रति लिटरचा मायलेज देते. क्विड ही वजनाला हलकी कार आहे. त्यामुळे तिला चालवणे देखील सोपे आहे. या कारमध्ये १.० लीटरचे ३ सिलिंडर, पेट्रोल इंजिन आहे. या इंजिनची क्षमता ६८ एचपी पॉवर आणि ९१ एनएमचा टॉर्क तयार करते. Renault Kwid BS6 ची एक्स शोरुम किंमत ३.१२ लाख रुपयांपासून सुरू होते.

Maruti Suzuki Alto -

या कारमध्ये ७९६ सीसीचे ३ सिलिंडरचे इंजिन देण्यात आले आहे. यात ६००० आरपीएमवर ४७.३ एचपीची पॉवर आणि ३५०० आरपीएमवर ६९ एनएमचा पीक टॉर्क देण्याची क्षमता आहे. ही कार ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह येते. अल्टोची एक्स शोरुम किंमत २,९४,८०० रुपये आहे. मारुती सुझुकी अल्टो अनेक वर्षांपासून भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारपैकी एक आहे.


Maruti S-Presso -

या कारचे उत्पादन हारटेक्ट प्लॅटफॉर्मवर केले जाते. त्यामुळे या कारचे वजन फार कमी असते. या कारमध्ये ९९८ सीसीचे ३ सिलिंडर के१०बी पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन ५५,००० आरपीएम वर ६७ बीएचपीची पॉवर आणि ३५०० आरपीएमवर ९० एनएमचा पीक टॉर्क देते. या कारमध्ये स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे पर्याय देण्यात आलेले आहे. मारुती एस-प्रेसो कार एक लीटर पेट्रोलमध्ये २१.४ किलोमीटरचा मायलेज देते. या कारची एक्स शोरुम किंमत ३.७० लाख रुपये आहे.

Datsun Redi-Go -

या कारमध्ये ७९९ सीसीचे ३ सिलिंडरचे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ५६०० आरपीएमवर ५४ एचपीची पॉवर आणि ४२५० आरपीएमवर ७२ एनएमचा पीक टॉर्क देते. या कारमधील दुसरे इंजिन १.० लीटरचे असून ते ५५५० आरपीएमवर ६७ एचपी पॉवर आणि ४२५० आरपीएमवर ९१ एनएमचा टॉर्क देते. भारतात डॅटसन रेडी-गोची किंमत २,९२,१२२ रुपयांपासून सुरू होते.

सध्या भारतात अनेक कंपन्यांचे मॉडेल बाजारात आल्याने सर्वसामान्यांना कारचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. स्वस्त कारपासून ते महागड्या आलिशान कारपर्यत सर्व पर्याय भारतीय बाजारपेठेत उपलब्ध आहेत. शिवाय ईएमआयसारख्या पर्यायांमुळे कार ही मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी