'या' आहेत भारतातील सर्वात स्वस्त फॅमिली कार, ७ जणांच्या कुटुंबासाठी परफेक्ट

भ्रूममभ्रूमम
Updated Apr 03, 2021 | 22:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

तुम्ही जर फॅमिली कार विकत घेण्याच्या विचारात असाल तर तुम्हाला मोठी रक्कम खर्च करावी लागू शकते. मात्र जर तुमचे बजेट मर्यादित असेल तर काही हरकत नाही. आम्ही तुमच्यासाठी देशातील सर्वात स्वस्त फॅमिली कारचे पर्याय

Best Family cars in country
तुमच्या बजेटमधील तुमच्या कुटुंबाची कार 

थोडं पण कामाचं

  • देशातील सर्वात स्वस्त फॅमिली कारचे पर्याय
  • मारुती सुझुकी इको, तुमच्या कौटुंबिक गरजांसाठी ही कार उत्तम पर्याय
  • डॅटसन गो प्लस, भरपूर स्पेस किंवा मोकळी जागा, हे एक वैशिष्ट्य

तुम्ही जर फॅमिली कार विकत घेण्याच्या विचारात असाल तर तुम्हाला मोठी रक्कम खर्च करावी लागू शकते. मात्र जर तुमचे बजेट मर्यादित असेल तर काही हरकत नाही. आम्ही तुमच्यासाठी देशातील सर्वात स्वस्त फॅमिली कारचे पर्याय देणार आहोत.

नवी दिल्ली : सध्या देशात कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे आणि सर्व्हिस कॉस्टमध्ये वाढ झाल्यामुळे कारच्या किंमतींमध्येसुद्धा वाढ झाली आहे. लहान असो कि मोठी कार, ग्राहकांना आधीपेक्षा जास्त रक्कम सध्या मोजावी लागते आहे. त्यामुळे फॅमिली कार विकत घ्यायची म्हटली तर चांगली रक्कम खिशात हवी. मात्र जरी तुमचे बजेट मर्यादित असेल तरी तुम्ही काळजी करण्याचे कारण नाही. आज आम्ही तुम्हाला भारतातील सर्वात स्वस्त असणाऱ्या फॅमिली कारचे पर्याय सांगणार आहोत. या कारचा वापर तुम्ही तुमच्या कौटुंबिक गरजांसाठी किंवा व्यावसायिक कामांसाठीदेखील करू शकता. तर बघूया कोणत्या आहेत या कार....

Strom R3: फक्त 10 हजार रुपयात बुक करा सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, 200Kmची रेंज देणार ही कार

सेकंड हँड दुचाकी घेण्याआधी जाणून घ्या या पाच गोष्टी, अन्यथा होऊ शकतो तोटा

मारुती सुझुकी इको :


मारुती सुझुकी इको (Maruti Suzuki Eeco): हा एक चांगला रिलायेबल पर्याय आहे. या कारमध्ये ११९६ सीसीचे ४ सिलिंडर असलेले पेट्रोल इंजिन आहे. हे मॉडेल बऱ्याचवेळा देशात अॅम्ब्युलन्स, स्कूल बस किंवा टॅक्सी या रुपात वापरले जाते. त्यातच तुमचा जर केटरिंगचा व्यवसाय असेल किंवा तुम्हाला टॅक्सी सेवा सुरू करावयाची असेल तर ही कार तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. शिवाय ही एक चांगली फॅमिली कार तर आहेच. त्यामुळे तुमच्या कौटुंबिक गरजांसाठी ही कार उत्तम पर्याय आहे. काही लोक आपल्या मोठ्या कुटुंबासह प्रवास करण्यास पसंती देतात. अशा हौशी लोकांकरितादेखील ही कार एक चांगला पर्याय आहे. ईकोची सुरूवात ३,९७,८०० रुपयांनी (दिल्ली एक्स शोरुम) होते. त्यामुळे ही कार तुमच्या बजेटमध्येदेखील आरामात फीट होईल.

डॅटसन गो प्लस :

डॅटसन गो प्लस (Datsun Go Plus) : डॅटसन गो प्लस या कारमध्ये कंपनीने ११९८ सीसीचे ३ सिलिंडरचे ईन लाईन ४ व्हाल्व डीओएचसी पेट्रोल इंजिन दिले आहे. भारतात अनेकजण डॅटसन गो प्लसला (Datsun Go Plus) एखाद्या टॅक्सीप्रमाणेदेखील वापरतात. त्याचबरोबर आपल्या वैयक्तिक किंवा कौटुंबिक गरजांसाठीदेखील ही कार अनेकांची पसंत आहे. त्याशिवाय या कारमध्ये असलेली भरपूर स्पेस किंवा मोकळी जागा हेदेखील ही कार अनेकांना आवडण्यामागचे कारण आहे. शिवाय सुरक्षेच्या दृष्टीने या कारमध्ये अॅंटी लॉक ब्रेकिंग, ड्युएल फ्रंट एअरबॅग इत्यादी सुविधासुद्धा पुरवण्यात आल्या आहेत. ही कार एक अत्यंत लोकप्रिय मल्टी पर्पज व्हेइकल आहे. मल्टी पर्पज व्हेइकल म्हणजे असे वाहन जे आपण आपल्या गरजा आणि सोयीनुसार विविध कामांसाठी उपयोगात आणतो. या कारची किंमत ४,२५,९२६ रुपयांपासून (एक्स-शोरुम) सुरू होते. त्यामुळे डॅटसन गो प्लस ही कारदेखील तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी