Tata Motors Offers : नवी दिल्ली : टाटा मोटर्सने (Tata Motors)जून महिन्यात त्यांच्या वाहनांवर सूट जाहीर केली आहे. नवीन आकडेवारीनुसार, टाटा मोटर्सच्या विक्रीच्या दृष्टीने सरलेला महिना खूप चांगला ठरला आहे. आता या महिन्यात सूट जाहीर झाल्याने या महिन्यातही विक्री चांगली होण्याची अपेक्षा आहे. जर तुम्ही या महिन्यात नवीन टाटा कार घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही त्यावर उपलब्ध असलेल्या डिस्काउंटची माहिती जाणून घ्या. टाटांच्या गाड्यांवर बंपर सूट (Tata Motors Offers) दिली जाते आहे. पाहूया टाटांच्या कोणत्या गाडीवर किती सूट मिळते आहे ते. (Big discount upto Rs 40,000 is available on Tata Cars, Check Offers)
टाटांची सर्वात किफायतशीर कार असलेल्या टिअॅगोवर (Tiago) 10,000 रुपयांची रोख सूट उपलब्ध आहे. ही ऑफर फक्त XZ ट्रिम आणि त्यावरील व्हेरियंटवर दिली जात आहे. याशिवाय, हॅचबॅकच्या सर्व प्रकारांवर 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देखील उपलब्ध आहे. मात्र त्याच्या i-CNG प्रकारावर कोणतीही ऑफर दिली जात नाही.
टाटा टिगोर (Tata Tigor) बद्दल बोलायचे झाले तर त्याच्या XZ आणि वरील मॉडेल्सवर 10,000 रुपयांची रोख सूट दिली जात आहे. यासोबतच या छोट्या सेडानच्या सर्व प्रकारांवर 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जातो आहे. कंपनी या वाहनावर 3000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देखील देते आहे. मात्र या ऑफर त्याच्या i-CNG प्रकारावर उपलब्ध नाहीत.
टाटा नेक्सॉन (Tata Nexon) ही सध्या भारतीय बाजारपेठेतील सर्वात लोकप्रिय एसयूव्ही (SUV) आहे. या कॉम्पॅक्ट क्रॉसओव्हरच्या पेट्रोल व्हेरियंटवर 3000 रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जाते आहे. तर डिझेल श्रेणीतील व्हेरियंटवर 5,000 रुपयांची सूट दिली जाते आहे.
या जूनमध्ये टाटा हॅरियरवर रोख सवलत नाही. पण कंपनी त्यावर 40,000 रुपयांचा प्रचंड एक्सचेंज बोनस देते आहे. यासोबतच 5000 रुपयांची कॉर्पोरेट सूटही दिली जात आहे. जर आपण लोकप्रिय सफारीवरील ऑफरबद्दल बोललो, तर कंपनी यावर 40,000 रुपयांचा मोठा एक्सचेंज बोनस देते आहे.
इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी लक्षात घेता, जगभरातील कार निर्मात्यांनी त्यांची ईव्ही वाहने तयार करणे आणि लॉन्च करणे सुरू केले आहे. दरम्यान, टाटा मोटर्स भारतातील सर्वात स्वस्त ईव्ही कार टाटा नॅनो इलेक्ट्रिक अवतारमध्ये लॉन्च करणार आहे. ही भारतातील सर्वात स्वस्त EV कार असेल. ही कार भारतीय बाजारपेठेत 2 ते 2.5 लाख रुपयांच्या कमी किंमतीत उपलब्ध असेल. कारमध्ये 72 व्होल्टचा लिथियम आयन बॅटरी पॅक असेल. जे 37.48 bhp च्या पॉवरच्या समतुल्य असेल. नॅनो इलेक्ट्रा चे वजन सुमारे 800 किलो असणार आहे.