BMW ने भारत लॉन्च केली X5M कॉम्पिटिशन SUV, किंमत पाहून तुम्हीही चक्रवाल 

BMW X5M Competition SUV :बीएमडब्ल्यूने भारतात एक्स 5 एम कॉम्पिटीशन एसयूव्ही लाँच केली आहे. ज्यांची किंमत तब्बल दीड कोटी इतकी आहे. 

BMW X5M Competition SUV
BMW ने भारत लॉन्च केली X5M कॉम्पिटिशन SUV  |  फोटो सौजन्य: Twitter

नवी दिल्ली: जर्मनीच्या लक्झरी कार उत्पादक बीएमडब्ल्यूने (BMW) गुरुवारी भारतात आपली नवीन बीएमडब्ल्यू एक्स 5 एम कॉम्पिटीशन एसयूव्ही (X5M Competition SUV) लाँच केली आहे. ज्याची किंमत 1.95 कोटी रुपये आहे. बीएमडब्ल्यू एक्स 5 एम कॉम्पीटिशन एसयूव्ही (BMW X5M Competition SUV) पूर्णपणे बिल्ट युनिट (सीबीयू) म्हणून आयात केली जात असून आता ती बीएमडब्ल्यू डीलरशिपमध्ये भारतात उपलब्ध असल्याचे कंपनीने निवेदनात म्हटले आहे.

याप्रसंगी बोलताना बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे अध्यक्ष विक्रम पाहा म्हणाले की, 'बीएमडब्ल्यू एम हे प्रमाणिक मोटर्सपोर्टच्या कार्यक्षमतेसह दररोज वापरण्यासाठी डिझाइन केले आहे.'

या कारमध्ये एक व्ही8 पेट्रोल इंजिन आहे, जो 600 हॉर्स पॉवर देतो आणि याद्वारे, शून्य ते 100 किलोमीटर प्रति तास वेग हा अवघ्या 3.8 सेकंदात गाठता येतो. 

BMW X1 ची sDrive20d M-Sport कार भारतात लाँच

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी बीएमडब्ल्यूने sDrive20d M-Sport ही कार लाँच केली होती. ज्याची किंमत 41.50 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. या  SUV च्या टॉप मॉडेल  X1 xDrive20d M Sport च्या खाली ठेवण्यात आली आहे. याची किंमत भारतीय बाजारात 44.50 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

या नव्या व्हेरिएंटमध्ये इंटीरियर आणि एक्सटीरियरमध्ये सेफ्टी किट आणि व्हिज्युअल रिप्रझेंटेशनच्या हिशोबाने टॉप व्हेरिएंटप्रमाणेच आहे. sDrive में  BMW मध्ये ऑल व्हील-ड्राइव्ह (AWD) सिस्टम देण्यात आलेलं नाही. जे xDrive20d M Sport देण्यात आलेलं आहे.

sDrive20d M Sport मध्ये 2.0-लीटर, 4-सिलेंडर डिझेल इंजन देण्यात आलं आहे. या इंजिनला 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रांसमिशन देण्यात आलं आहे. या नव्या व्हेरिएंटमध्ये XDriv मध्ये देण्यात आलेले 8.8-इंच युनिटच्या तुलनेत 6.5-इंच इंफोटेनमेंट स्क्रीन देण्यात आली आहे. यामध्ये हेड-अप डिस्प्ले सिस्टम देखील देण्यात आलेली नाही.

भारतीय बाजारात BMW X1 कारची स्पर्धा  Mercedes GLA (34.38 लाख रुपये- 38.64 लाख रुपये), Audi Q3 (34.73 लाख रुपये- 42.88 लाख रुपये) आणि नुकतीच लाँच झालेली  Volvo XC40 (39.90 लाख रुपये- 43.90 लाख रुपये) यांच्याशी असणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी