Strom R3: फक्त 10 हजार रुपयात बुक करा सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, 200Kmची रेंज देणार ही कार

भ्रूममभ्रूमम
Updated Feb 23, 2021 | 14:09 IST | टाइम्स नाऊ मराठी

भारतीय बाजारात इलेक्ट्रिक गाड्यांच्या क्षेत्रात एक नवा खेळाडू प्रवेश करत आहे. मुंबईची स्टार्टअप कंपनी स्ट्रॉम मोटर्सने आपली मिनी इलेक्ट्रिक कार Strom R3साठीची प्री-बुकिंग चालू केली आहे.

Strom R3
फक्त 10 हजार रुपयात बुक करा सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, 200Kmची रेंज देणार ही कार  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारसाठीचे प्री-बुकिंग चालू
  • मुंबईच्या स्टार्टअप कंपनीने तयार केलेली कार लवकरच बाजारात
  • जाणून घ्या काय आहे या कारचा आकार, किंमत आणि फीचर्स

Strom R3 Electric Car: भारतीय बाजारात (Indian market) इलेक्ट्रिक गाड्यांच्या (electric vehicles) क्षेत्रात एक नवा खेळाडू (new player) प्रवेश करत आहे. मुंबईची (Mumbai) स्टार्टअप कंपनी (startup company) स्ट्रॉम मोटर्सने (Strom Motors) आपली मिनी इलेक्ट्रिक कार (electric car) Strom R3साठीची प्री-बुकिंग (pre-booking) चालू केली आहे. ही कार बुक करण्यासाठी आपल्याला 10,000 रुपयांची रक्कम बुकिंग अमाऊंट म्हणून जमा करावी लागेल. असे सांगितले जात आहे की ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असणार आहे.

दोन दरवाजे आणि तीन चाकांची इलेक्ट्रिक कार

Strom R3 ही दोन दरवाजे आणि तीन चाके असलेली कार आहे. याच्या मागच्या भागात एक चाक आणि पुढील भागात दोन चाके देण्यात आली आहेत. ही कार खासकरून मुंबई, दिल्ली आणि बेंगळुरूसारखी शहरे नजरेसमोर ठेवून डिझाईन करण्यात आली आहे. कंपनीने या कारला एलईडी दिवे, ड्युएल टोन आणि सनरूफसह सजवले आहे.

आकार: या कारची लांबी 2,907mm, रुंदी 1,405mm, उंची 1,572mm आहे आणि यात 185mmचा ग्राऊंड क्लीअरंस देण्यात आला आहे. या कारचे एकूण वजन फक्त 550 किलोग्रॅम आहे आणि यात 13 इंचांचे स्टील व्हील वापरण्यात आले आहे.

बॅटरी आणि ड्रायव्हिंग रेंज: Strom R3मध्ये कंपनीने 13 kWची क्षमता असलेली हाय एफिशिएन्सी मोटर वापरली आहे जी 48 Nmचा टॉर्क जनरेट करते. सोबतच यात एक फास्ट चार्जरही देण्यात आला आहे ज्याद्वारे या कारची बॅटरी फक्त 2 तासात 80 टक्क्यापर्यंत चार्ज होईल. या कारला पूर्ण चार्ज होण्यासाठी साधारण 3 तासांचा वेळ लागेल. हिला सामान्य 14 अँपियरच्या घरगुती सॉकेटमध्येही चार्ज करता येणार आहे. एका चार्जिंमध्ये ती 200 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते असे कंपनीचे म्हणणे आहे. याचा खर्च फक्त 40 पैसे प्रति किलोमीटर आहे. ही कार 120 km, 160km आणि 200 km अशा तीन ड्राइविंग रेंजमध्ये आणि इलेक्ट्रिक ब्लू, नियॉन ब्लू, लाल आणि काळा अशा चार रंगांमध्ये मिळेल.

फीचर्स: ही कार दिसायला छोटी असली तरी कंपनीने यात 12-वे अॅडजस्टेबल ड्रायविंग सीट, 4.3चे डिजिटल इंस्ट्रूमेंट कंसोल, क्लायमेट कंट्रोल, रिमोट कीलेस एंट्री, 7 इंचांची वर्टिकल ट्चस्क्रिन इंफोटेंमेंट सिस्टिम, IOT एनेबल्ड कंटिन्युअस मॉनिटरिंग सिस्टिम, 4G कनेक्टिव्हिटी, व्हॉईस कंट्रोल अशी अनेक फीचर्स दिली आहेत. कंपनीच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार याची रायडिंग कॉस्टही खूप परवडणारी आहे. सामान्य कारच्या तुलनेत Strom R3 इलेक्ट्रिक कार 400% जास्त इफिशिएंसी देते. कंपनीचा दावा आहे की सामान्य कारच्या तुलनेत हिचा मेन्टेनन्स 80%पर्यंत कमी होतो. तीन वर्षे चालवल्यानंतर आपण या कारपासून साधारण तीन लाख रुपयांची बचत करू शकता.

काय असणार किंमत: ही कार लॉन्च होण्याआधीच तिच्या किंमतीबद्दल काही बोलणे योग्य होणार नाही. मात्र हाती आलेल्या बातम्यांनुसार हिची प्रारंभिक किंमत 4.5 लाख रुपये असू शकते. त्यामुळे ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार ठरेल. सध्या कंपनीने याची बुकिंग चालू केली आहे. लवकरच ही कार बाजारात उतरेल अशी अपेक्षा आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी