मुंबई: नवीन वर्ष आपल्यासाठी एक नवीन ऑफर घेऊन आला आहे. 2020 साली कोरोना साथीच्या आजारामुळे भारतीय अर्थव्यवस्था मोडकळीस आली होती. अनेक गोष्टींची मागणी कमी झाली होती. ज्याटा उत्पादनावर आणि पर्यायाने उद्योगधंद्यांवर वाईट परिणाम झाला होता. पण आता हळूहळू सुधारणा दिसू लागली आहे. भारतातील कार विक्रीला हळूहळू वेग आला आहे. कार निर्मात्या कंपन्यांनी विक्रीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये रेनोने (Renault) आपल्या कारवर ऑफर देण्यास सुरवात केली आहे. फ्रेंच वाहन निर्माता कंपनीने भारतात आपल्या सर्व कारवर म्हणजेच Renault Triber, Renault Kwid, आणि Renault Duster यांच्यावर ६५,००० रुपयांपर्यंत सवलत आणि लाभ देत आहे. ही ऑफर फक्त जानेवारीसाठी आहे. आता तपशील जाणून घेऊया.
कृपया लक्षात घ्या की वरील रेनो कारच्या ऑफर केवळ 31 जानेवारी 2021 पर्यंत लागू आहेत आणि ते देखील निवडक व्हेरिएंटवर. या ऑफर मिळविण्याच्या तरतुदी व शर्ती वेगवेगळ्या असू शकतात. अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या रेनॉल्ट डीलरशीपशी संपर्क साधा.