गाडीचे टायर पंक्चर झाले तर करा हा सोपा उपाय

टायर पंक्चरची चिंता सोडा कारण एक सोपा उपाय करणे शक्य आहे.

car buyer guide fix puncture car tyre by using these two useful gadgets
गाडीचे टायर पंक्चर झाले तर करा हा सोपा उपाय 

थोडं पण कामाचं

  • गाडीचे टायर पंक्चर झाले तर करा हा सोपा उपाय
  • गाडीत ठेवा पंक्चर रिपेअर किट
  • टायर पंक्चर झाल्यास वापरा पोर्टेबल एअर कॉम्प्रेसर 

मुंबईः सहलीला निघाल्यावर अथवा ग्रामीण भागातून प्रवास करताना काही वेळा एखाद्या खराब रस्त्यावर टोकेरी दगड, काच अथवा अन्य एखाद्या कारणाने टायर पंक्चर होते. चाकातील हवेचा दाब कमी होतो. टायरचे एअर प्रेशर कमी होताच गाडी चालवणे कठीण होते. अशा वेळी अनोळखी जागेवर पंक्चर काढून टायर दुरुस्त करुन घेणे ही एक मोठी गरज असते. गाडी नियमित चालवणाऱ्या आणि लाँग ड्राइव्हवर जाणाऱ्या अनेकांना अशा प्रसंगाला कधी ना कधी सामोरे जावे लागते. या समस्येवर एक सोपा उपाय सापडला आहे. (car buyer guide fix puncture car tyre by using these two useful gadgets)

प्रामुख्याने खडबडीत रस्त्यावर दगड, काच, खिळा अशी एखाद्या टोकेरी किंवा धार असलेल्या वस्तूचा संपर्क झाल्याने टायर पंक्चर होतो. टायर पंक्चर झाल्यास दुरुस्त करुन घेणे अथवा पंक्चर टायर बदलून त्या जागेवर गाडीतील राखीव टायर (स्टेपनी) लावणे आणि जवळच्या गॅरेजमध्ये जाऊन पंक्चर काढून घेणे हा उपाय आहे. पण यात वेळ जातो. प्रवासाच्या नियोजनावर प्रतिकूल परिणाम होतो. पंक्चरची समस्या लवकर सोडवणे आवश्यक असते. पण वेळ कसा वाचवावा हे समजत नाही. पण आता ही चिंता सोडा कारण एक सोपा उपाय करणे शक्य आहे.

गाडीत ठेवा पंक्चर रिपेअर किट

प्रवासाला निघताना गाडीत स्टेपनी ठेवतात त्याच पद्धतीत आधुनिक पंक्चर रिपेअर किट ठेवणे आवश्यक आहे. बाजारात हे किट वाजवी दरात उपलब्ध आहे. आकाराने लहान, वजनाने हलके असलेले हे पंक्चर रिपेअर किट वापरणे सोपे आहे. यामुळे झटपट पंक्चर काढणे शक्य आहे. टायर पंक्चर झाल्यास अवघ्या पाच मिनिटांत पंक्चर काढून प्रवास पुन्हा सुरू करणे शक्य आहे. यामुळे वेळ वाचेल आणि त्रास पण वाचेल. 

टायर पंक्चर झाल्यास वापरा पोर्टेबल एअर कॉम्प्रेसर 

प्रत्येकवेळी प्रवासाला निघताना गाडीत स्टेपनी आणि पंक्चर रिपेअर किट यांच्यासोबत एक पोर्टेबल एअर कॉम्प्रेसर ठेवा. प्रवास सुरू करण्याआधीच गाडीत पुरेसे इंधन असल्याची, सर्व टायरमध्ये हवेचा दाब व्यवस्थित असल्याची, गाडीची संपूर्ण यंत्रणा सुरळीत कार्यरत असल्याची खात्री करुन घ्या. स्टेपनी व्यवस्थित असल्याची तपासणी करुन घ्या. पंक्चर रिपेअर किट आणि पोर्टेबल एअर कॉम्प्रेसर सुरळीत असल्याचे तपासून घ्या. यानंतर प्रवास सुरू करा. यामुळे प्रवासात टायर पंक्चर झाले तरी जास्त वेळ वाया जाणार नाही. अवघ्या पाच मिनिटांत झटपट पंक्चर काढून प्रवास पुन्हा सुरू करता येईल.

पोर्टेबल एअर कॉम्प्रेसर बाजारात वाजवी दरात उपलब्ध आहे. आकाराने लहान, वजनाने हलके असलेले हे यंत्र टायरमध्ये वेगाने हवा भरण्यासाठी वापरतात. गाडीतील यूएसबी पोर्टला जोडून पोर्टेबल एअर कॉम्प्रेसर वापरता येतो.

कोणत्याही कारणाने टायर पंक्चर झाले तर आधी पंक्चर रिपेअर किट वापरा. पंक्चर दुरुस्त करा. नंतर गाडीतील यूएसबी पोर्टला जोडून पोर्टेबल एअर कॉम्प्रेसर वापरा. पंक्चर झालेल्या टायरमध्ये नव्याने वेगाने हवा भरा. सर्व टायरमध्ये हवेचा दाब व्यवस्थित असल्याची, गाडीची संपूर्ण यंत्रणा सुरळीत कार्यरत असल्याची खात्री करुन घ्या. लगेच प्रवास पुन्हा सुरू करा. 

पंक्चर रिपेअर किट आणि पोर्टेबल एअर कॉम्प्रेसर यांच्यामुळे स्टेपनी वापरण्याची गरज कमी झाली आहे. कोणत्याही कारणाने टायर पंक्चर झाले तर झटपट दुरुस्ती करता येते. पंक्चर काढून झाले की लगेच प्रवास सुरू करता येतो. पंक्चरची समस्या अवघ्या पाच मिनिटांत दूर करता येते. 

कमीत कमी शारीरिक आणि मानसिक त्रास होतो. काम लवकर पूर्ण होते. परंपरागत पंक्चर काढण्याच्या पद्धतीत जेवढा वेळ वाया जातो, त्या तुलनेत पंक्चर रिपेअर किट वापरण्याने वेळ वाचतो. पंक्चर काढण्याचे काम लवकर पूर्ण होते. गाडीतील यूएसबी पोर्टला जोडून पोर्टेबल एअर कॉम्प्रेसर वापरता येतो. पंक्चर झालेल्या टायरमध्ये नव्याने वेगाने हवा भरता येते. पंक्चरची समस्या लवकर सोडवून झटपट प्रवास पुन्हा सुरू करता येतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी