एकदाच चार्ज करा अन् 461 किलोमीटर गाडीला पळवा; 8 सेकंदात घेते ताशी 100 किमीचा वेग, ग्राहकांची SUV च्या खरेदीसाठी गर्दी

MG Motor India ने 2022 MG ZS EV ही अधिकृतपणे भारतात लॉन्च करण्यात आली असून ज्याची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 21.99 लाख रुपये आहे.  ही किंमत इलेक्ट्रिक (Electric) SUV च्या बेस एक्साईट व्हेरियंटसाठी (variant) आहे जी जुलै 2022 पासून ग्राहकांना उपलब्ध होईल, तर आतापासून उपलब्ध केलेल्या मॉडेलचे नाव एक्सक्लुझिव्ह आहे आणि त्याची एक्स-शोरूम किंमत 25.88 लाख रुपये आहे.

Charge once and drive MG ZS EV  461 kms
MG ZS EV 8 सेकंदात तासाभरात पोहोचेल 100 किमी अंतरावर   |  फोटो सौजन्य: Google Play
थोडं पण कामाचं
  • MG ZS EV जुलै 2022 पासून ग्राहकांना उपलब्ध होईल
  • MG ZS EV या इलेक्ट्रिक एसयूव्हीसाठी कंपनीने गेल्या महिन्यात 1,500 बुकिंग केल्या आहेत.
  • MG ZS EV याला पुन्हा डिझाईन केलेला फ्रंट देण्यात आला आहे.

नवी दिल्लीः MG Motor India ने 2022 MG ZS EV ही अधिकृतपणे भारतात लॉन्च करण्यात आली असून ज्याची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 21.99 लाख रुपये आहे.  ही किंमत इलेक्ट्रिक (Electric) SUV च्या बेस एक्साईट व्हेरियंटसाठी (variant) आहे जी जुलै 2022 पासून ग्राहकांना उपलब्ध होईल, तर आतापासून उपलब्ध केलेल्या मॉडेलचे नाव एक्सक्लुझिव्ह आहे आणि त्याची एक्स-शोरूम किंमत 25.88 लाख रुपये आहे. 7 मार्च रोजी लाँच झालेल्या या इलेक्ट्रिक एसयूव्हीसाठी कंपनीने गेल्या महिन्यात 1,500 बुकिंग केल्या आहेत. ही इलेक्ट्रिक कार भारतात प्रथमच 2019 मध्ये लॉन्च करण्यात आली होती, आता कंपनीने मोठ्या बदलांसह ती पुन्हा बाजारात आणण्यात आली आहे

सर्वत्र एलईडी दिवे 

2022 MG ZS EV याला पुन्हा डिझाईन केलेला फ्रंट देण्यात आला आहे, जो नवीन ग्रिलसह येतो, ज्यामुळे ही कार खूपच स्टाइलिश बनते. इलेक्ट्रिक एसयूव्हीला 17-इंचाचे टॉमाहॉक हब डिझाइन अलॉय व्हील देण्यात आले आहेत, याशिवाय कारमध्ये सर्वत्र एलईडी लाईट्स देण्यात आले आहेत.  
नवीन ZS EV च्या केबिनने जुन्या मॉडेलमधून सोयी आणि कनेक्टिव्हिटी वैशिष्ट्यांसह अनेक वैशिष्ट्ये घेण्यात आहेत. आधीच्या मॉडेलच्या तुलनेत इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या बाह्य आणि आतील भागात बरेच बदल करण्यात आले आहेत. 

2022 MG ZS EV मध्ये आहेत भरभरून आहेत फीचर्स 

यात प्रीमियम लेदर-कव्हर्ड डॅशबोर्ड, ड्युअल-पेन पॅनोरामिक स्काय रूफ, रिअर सेंटर हेडरेस्ट, कप होल्डर्ससह रिअर सेंटर आर्मरेस्ट आणि मागील एसी व्हेंट्स मिळतात. केबिनमध्ये 10.1-इंचाची एचडी इन्फोटेनमेंट सिस्टम आहे जी Apple CarPlay आणि Android Auto ला सपोर्ट करते. कंपनीने येथे 7-इंचाचा LCD ड्रायव्हर्स डिस्प्ले, 5 USB पोर्ट, वायरलेस फोन चार्जिंग, एअर फिल्टर, डिजिटल ब्लूटूथ की यांसारखे अनेक फीचर्स दिले आहेत. 

सिंगल चार्जमध्ये धावेल 461 KM

MG भारताने या इलेक्ट्रिक SUV ला 50.3 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे जो IP69 वॉटरप्रूफ रेटिंग आहे. SUV आता फक्त एका चार्जवर 461 KM प्रवास करु शकते आणि 176 PS पॉवर बनवते. 0-100 किमी/ताशी वेग घेण्यासाठी फक्त 8.5 सेकंदाचा वेळ लागतो. सुरक्षिततेच्या दृष्टीनेही ही इलेक्ट्रिक एसयूव्ही मजबूत असून ज्यामध्ये 6 एअरबॅग्ज, iSmart कनेक्टेड फीचर्स देण्यात आले आहेत.  तसेच लेन चेंज असिस्ट, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, रिअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट, 360-डिग्री कॅमेरा, हिल डिसेंट कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम या वैशिष्ट्यांचाही यात समावेश आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी