Komaki Electric Vehicles | नवी दिल्ली : इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी कोमाकी इलेक्ट्रिक व्हेइकल्स (Komati Electric Vehicles) या कंपनीने देशातील पहिली इलेक्ट्रिक क्रूझर बाइक लॉंच केली आहे. ही इलेक्ट्रिक बाइक २६ जानेवारीपासून कंपनीच्या सर्व डिलरशिपवर उपलब्ध करून दिली जाईल. या बाइकला गार्नेट रेड, डीप ब्लू आणि जेट ब्लॅक या तीन वेगवेगळ्या स्कीममध्ये सादर केले जाईल. या बाइकची किंमत एक्स-शोरूममध्ये १.६८ लाख रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. (Electric Bike Komaki came in market this bike Run 220 km in one charge).
अधिक वाचा : कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ
कोमाकी रेंजरमध्ये ग्रोसर व्हील आणि क्रोम एक्सटीरियर्स मिळतात, जे एका स्पेशल क्रूझर बाइकप्रमाणे असतात. बाइकला ग्लॉसी क्रोमने सजवलेले रेट्रो-थीम असलेले गोल एलईडी हेडलॅम्प्स बसवलेले पाहायला मिळतात. ज्यामध्ये ड्युअल क्रोमने सुसज्ज गोल आकाराचे दिवे दिले आहेत. हेडलँपच्या दोन्ही बाजूला रेट्रो-थीम असलेले साइड इंडिकेटर देखील दिले गेले आहेत. तर इतर डिझाइन घटकांमध्ये लेग गार्ड, फॉक्स एक्झॉस्ट, ब्लॅक अलॉय व्हील्स यांसारख्या फिचर्संचा समावेश आहे.
अधिक वाचा : युवराज सिंग बनला बाबा, घरी आला 'ज्युनिअर युवराज'
बाइकला बजाज ॲव्हेंजर सारखी सिंगल-पॉड इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, पेट्रोलच्या टाकीवर चमकदार क्रोम-ट्रीटेड डिस्प्ले सारखे विस्तृत हँडलबार मिळतात. मागील सीटच्या मागे बॅकरेस्ट देण्यात आला आहे. दोन्ही बाजूंच्या हार्ड पॅनियर्स याबाबतची कल्पना देतात की मोटरसायकल लांब पल्ल्याच्या राइडिंगसाठी डिझाइन केली गेली आहे. याशिवाय क्रूझर बाइक्ससारख्या साइड इंडिकेटरसह गोल आकाराचा टेललाइट देखील देण्यात आला आहे.
इलेक्ट्रिक क्रूझर बाइक कोमाकीमध्ये ४००० वॅटची मोटर आणि ४-kWh बॅटरी एवढी बॅटरी पॉवर मिळते. देशातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी दुचाकी आहे. रेंजर पूर्ण चार्ज केल्यावर एका वेळी १८० ते २२० किमी अंतर कापू शकते असा दावा कंपनीने केला आहे. यामुळे कोमाकी रेंजर (Komaki Ranger) ही भारतातील सर्वात लांब ड्रायव्हिंग रेंज असलेली इलेक्ट्रिक टू-व्हीलर असल्याचे स्पष्ट झाले आहे. ईव्ही ब्रँडने असा देखील दावा केला आहे की ही क्रूझर बाइक विविध प्रकारच्या भागातून तसेच सर्व प्रकारच्या हवामानाचा सामना करण्यास सक्षम आहे.
अधिक वाचा : हॉस्टेलचा दरवाजा तोडून विद्यार्थ्यांना पोलिसांकडून मारहाण