'ही' आहे भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, ऑटो एक्स्पो २०२०मध्ये लॉन्च

भ्रूममभ्रूमम
Updated Feb 06, 2020 | 15:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

ग्रेट वॉल मोटर्सने भारतात आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक हॅचबॅक सादर केली आहे. या कारचे नाव आर १ असे आहे. ही कार लवकरच भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असणार आहे.

Electric car unveiled in auto expo 2020 by great wall motors
'ही' आहे भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, ऑटो एक्स्पो २०२०मध्ये लॉन्च  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • ग्रेट वॉल मोटर्सने भारतात आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक हॅचबॅक सादर केली आहे.
  • कंपनीने ही कार ऑटो एक्स्पो २०२०मध्ये सादर केली आहे.
  • ग्रेट वॉल मोटर्सच्या या आर १ इलेक्ट्रिक हॅचबॅकला सध्या जगातील सर्वात स्वस्त कार असल्याचे मानले जात आहे.

नवी दिल्ली: ग्रेट वॉल मोटर्सने भारतात आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक हॅचबॅक सादर केली आहे. या कारचे नाव आर १ असे आहे. ही कार लवकरच भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असणार आहे. कंपनीने ही कार ऑटो एक्स्पो २०२०मध्ये सादर केली आहे. ग्रेट वॉल मोटर्सच्या या आर १ इलेक्ट्रिक हॅचबॅकला सध्या जगातील सर्वात स्वस्त कार असल्याचे मानले जात आहे.

ही इलेक्ट्रिक कार सध्या चीनमध्ये उपलब्ध आहे. या कारची चीनमधील किंमत भारतीय रूपयांत पाहिल्यास ती ७ ते ८ लाख एवढी आहे. जीडब्ल्यूएम आर १ इलेक्ट्रिक हॅचबॅक यावर्षी ऑटो एक्स्पो २०२०मध्ये चीनद्वारा सादर केलेल्या टॉप १० कारमध्ये समाविष्ट आहे.

या कारचा आकार पाहिला तर तो मारूती सुझुकी सेलेरियोपेक्षा कमी आहे. या कारला विशेषत: शहरातील ट्राफिकला लक्षात घेत बनवण्यात आले आहे. आर १ मध्ये सिंगल इलेक्ट्रिक मोटर दिलेली आहे. यातील लिथियम ऑयन बॅटरी ही ३३ किलोवॉटच्या पॅकसह आहे, जी ४७ बीएचपीची ताकद आणि १२५ एनएम टॉर्क जनरेट करते.

प्रत्येक राइडमध्ये ही कार एक आरामदायी प्रवास देते असे कंपनीचे म्हणणे आहे. या कारचा टॉप स्पीड १०० किलोमीटर प्रतितास एवढा आहे. जीडब्ल्यूएम आर १ स्टॅंडर्ड आणि फास्ट चार्जिंग या दोन्ही टेक्नॉलॉजीसह उपलब्ध आहे. ४० मिनिटांत यातील बॅटरी ८० टक्क्यांपर्यंत चार्ज होते. या कारची किंमत जरी कमी असली तरी कमी किमतीत उत्तम फीचर या कारमध्ये आहेत.

कंपनीने या कारमध्ये ९ इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, ईबीडीसोबत एबीएस, दोन एअरबॅग, इमरजेन्सी ब्रेकिंग आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम दिलेले आहे. ऑटो एक्स्पो २०२०मध्ये ग्रेट वॉल मोटर्स या कंपनीने अनेक नवीन कार लॉन्च केल्या आहेत. यातील अनेक गाड्या या येत्या काही दिवसांत भारतातील रस्त्यांवर पाहायला मिळतील. तेव्हा आता सर्वात स्वस्त असा दावा केलेली कार भारतात किती किमतीत लॉन्च होते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी