Humble One: जगातील पहिली सोलर एसयूव्ही बाजारात आली, एका चार्जिंगमध्ये ८०० किलोमीटर धावणार, जाणून घ्या किंमत

भ्रूममभ्रूमम
Updated Apr 01, 2021 | 14:16 IST | टाइम्स नाऊ मराठी

Humble One: कॅलिफोर्नियाच्या हंबल मोटर्स या स्टार्टअप कंपनीने आपली नवी सौरऊर्जेवर चालणारी विद्युत गाडी सादर केली आहे. डिझाईन आणि बॉडी टाईपवरून हे सौरऊर्जेवर चालणारे जगातील एसयूव्हीचे मॉडेल आहे.

Humble One SUV
जगातील पहिली सौरऊर्जेवर चालणारी विद्युत एसयूव्ही बाजारात आली, जाणून घ्या किंमत  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • छत आणि खिडक्यांवरील सोलार पॅनलद्वारे होणार चार्जिंग
  • उत्तम ड्रायव्हिंग रेंज देणारी हंबल वनची एसयूव्ही
  • जाणून घ्या किती असणार या गाडीची किंमत

Humble One Solar Powered Electric SUV: कॅलिफोर्नियाच्या (California) हंबल मोटर्स (Humble Motors) या स्टार्टअप कंपनीने (startup company) आपली नवी सौरऊर्जेवर (solar energy) चालणारी विद्युत गाडी (electric vehicle) सादर केली आहे. डिझाईन (design) आणि बॉडी टाईपवरून (body type) हे सौरऊर्जेवर चालणारे जगातील पहिलेच एसयूव्हीचे मॉडेल (first SUV model) असल्याचे सांगितले जात आहे. कंपनीचा असा दावा आहे की सूर्याच्या प्रकाशाद्वारे या गाडीची बॅटरी (battery) चार्ज (charge) होते आणि उत्तम ड्रायव्हिंग रेंज (driving range) देते.

छत आणि खिडक्यांवरील सोलार पॅनलद्वारे होणार चार्जिंग

या गाडीचे डिझाईन बऱ्याच अंशी क्रॉसओव्हर मॉडेलप्रमाणे आहे. याच्या छतावर आणि खिडक्यांवर एकूण 80 वर्गफुटांचे सोलार पॅनल बसवण्यात आले आहे. हे पॅनल सूर्याच्या प्रकाशातून या गाडीत लावण्यात आलेली बॅटरी चार्ज करते. कंपनीने सांगितले आहे की ही एसयूव्ही जर फक्त सोलार पॅनलद्वारे झालेल्या चार्जिंगद्वारे चालण्यात आली तर ही दररोज साधारण 96 किलोमीटरपर्यंतची ड्रायव्हिंग रेंज देते.

उत्तम ड्रायव्हिंग रेंज देणारी हंबल वनची एसयूव्ही

हंबल वनचे वजनही कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे जेणेकरून उत्तम ड्रायव्हिंग रेंज मिळू शकेल. याचे एकूण वजन 1,814 किलो आहे जे Tesla Model Sच्या तुलनेत साधारण 348 किलोंनी कमी आहे. गाडीच्या आतील बॅटरीवर एकाच चार्जिंगमध्ये साधारण 800 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज ही गाडी देते. इतकेच नव्हे, तर याचा पिकअपही टेस्लाच्या तुलनेत खूप चांगला आहे. यात साधारण पाच लोक बसू शकतात. याची लांबी 198 इंच आहे.

जाणून घ्या किती असणार या गाडीची किंमत

हंबल मोटर्सने अद्याप या गाडीबद्दलची तांत्रिक माहिती दिलेली नाही. पण दररोजच्या प्रवासासाठी ही एसयूव्ही एक उत्तम पर्याय ठरेल. ही गाडी बाजारात येण्याच्या आधीच त्याच्या किंमतीबद्दल सांगणे अवघड आहे, पण जाणकारांच्या अंदाजानुसार याची किंमत 1,09,000 अमेरिकन डॉलर्सच्या आसपास असेल. याचे आगाऊ बुकिंग चालू झाले आहे आणि ही कार 2024पर्यंत बुकिंग केलेल्या लोकांकडे पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी