Tata Car Discount: कार विकत घेतांय? मग टियागो ते नेक्सॉन, टाटा मोटर्स देतेय मोठी सूट, पाहा जबरदस्त ऑफर्स...

Discount on Car : टाटा मोटर्स (Tata Motors) जूनमध्ये त्यांच्या काही कारच्या निवडक मॉडेल्स आणि व्हेरियंटवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. सर्व ब्रँडमधील कारच्या किमतींमध्ये वाढ होत असताना टाटा मोटर्स या महिन्यात 45,000 रुपयांपर्यंतची सूट आपल्या काही मॉडेलवर देत आहे. टाटा मोटर्स सध्या भारतातील टॉप 2 कार उत्पादकांपैकी एक आहे.

Tata Car discount in June
जून महिन्यात टाटांच्या कारवर मोठी सूट 
थोडं पण कामाचं
  • टाटा मोटर्सच्या विविध मॉडेलवर मिळतेय मोठी सूट
  • टाटा मोटर्स जून महिन्यात 45,000 रुपयांपर्यंतची सूट देते आहे
  • टाटा मोटर्स सध्या भारतातील टॉप 2 कार उत्पादकांपैकी एक कंपनी आहे

Tata Car Discount in June: नवी दिल्ली : टाटा मोटर्स (Tata Motors) जूनमध्ये त्यांच्या काही कारच्या निवडक मॉडेल्स आणि व्हेरियंटवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. सर्व ब्रँडमधील कारच्या किमतींमध्ये वाढ होत असताना टाटा मोटर्स या महिन्यात 45,000 रुपयांपर्यंतची सूट आपल्या काही मॉडेलवर देत आहे. टाटा मोटर्सने देऊ केलेल्या सवलतींमध्ये टिअॅगो (Tiago), टिगोर (Tigor), नेक्सॉन (Nexon), हॅरियर (Harrier) आणि सफारी (Safari) सारख्या मॉडेल्सचा समावेश आहे. (From Tiago to Nexon, Tata Motors is offering discounts on cars)

अधिक वाचा : Maruti Alto पेक्षा स्वस्त मिळणार ही इलेक्ट्रिक कार, SUV सारखेच असणार फीचर्स

टाटा मोटर्सच्या नेक्सॉनचे यश

टाटा मोटर्स सध्या भारतातील टॉप 2 कार उत्पादकांपैकी एक आहे. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे नेक्सॉन सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही सारख्या मॉडेलचे यश. हे मॉडेल पेट्रोल-डिझेल तसेच इलेक्ट्रिक प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. तसेच, टाटा मोटर्सने अलीकडेच टिगोर आणि टिगोर iCNG मॉडेल्ससह CNG विभागात प्रवेश केला आहे. पंच SUV किंवा Altroz ​​प्रीमियम हॅचबॅक सारखी लोकप्रिय मॉडेल्स या महिन्यात टाटा कारच्या यादीत समाविष्ट नाहीत.

अधिक वाचा : Electric Scooter : ही आहे नवीन इलेक्ट्रिक स्कूटर...देणार Ola, Hero, Okinawa ला टक्कर, रेंज 132Km, इतकी आहे किंमत...

या SUV वर सर्वाधिक सूट

टाटा मोटर्सच्या ऑफरनुसार, सर्वात मोठी सूट टाटा हॅरियर (Tata Harrier) वर उपलब्ध आहे. कंपनी या मॉडेलवर एकूण 45,000 रुपयांची सूट देत आहे. या ऑफरमध्ये 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट आणि उर्वरित एक्सचेंज बोनस समाविष्ट आहे. टाटा सफारी (Tata Safari) हे दुसरे मॉडेल आहे, ज्यावर सर्वाधिक सूट मिळत आहे. Tata Motors या SUV वर एक्स्चेंज बोनस म्हणून 40,000 ची सूट देतs आहे.

अधिक वाचा :  Cheap CNG Cars: अरे बापरे! इतक्या स्वस्त सीएनजी गाड्या, किंमत फक्त दोन लाख रुपये; कशा आणि कुठे मिळतील ते जाणून घ्या

Tiago आणि Tigor वर सूट

इतर मॉडेल्सबद्दल बोलायचे झाल्यास, Tiago हॅचबॅक आणि Tigor सब-कॉम्पॅक्ट सेडानवर  23,000 रुपयांची सूट मिळते आहे. यामध्ये प्रत्येकी 10,000 रुपयांची रोख सूट आणि एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट सवलतीच्या रूपात अतिरिक्त 3,000 रुपये यांसारख्या फायद्यांचा समावेश आहे.

नेक्सॉनवर फक्त 5,000 ची सूट

Nexon वर फक्त 5000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. भारतातील सर्वाधिक विक्री होणारी SUV असलेली Tata Nexon सब-कॉम्पॅक्ट SUV वर फक्त 5,000 रुपयांची सूट मिळते आहे. टाटा अद्याप त्यांच्या कोणत्याही इलेक्ट्रिक वाहनांवर किंवा CNG वाहनांवर अधिकृत सवलत देत नाही. टाटा मोटर्स ही सध्या भारतातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी आहे. मात्र या कार निर्मात्या कंपनीने या मॉडेल्सवर कोणतीही सूट दिलेली नाही. या मॉडेल्समध्ये Nexon EV, Nexon EV Max आणि Tigor EV यांचा समावेश आहे.

सध्या अनेक ऑटोमोबाईल कंपन्या आपल्या कारवर सवलत देऊन अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत.

(टीप: वरील सर्व ऑफर आणि सवलती प्रसार माध्यमांमधून आलेल्या माहितीनसुरा आहेत. तुम्ही ऑफरबद्दल योग्य माहितीसाठी, ग्राहक डीलर किंवा कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी