ग्राहकांसाठी चांगली बातमी, i 20 कार तब्बल २४ व्हेरिएंटमध्ये उपलब्ध; बुकिंग सुरु 

Hyundai i 20 आता नवीन रंगा-रुपात उपलब्ध आहे. ग्राहक आता ही नवीन कार बुक करू शकतात. एकूण 24 व्हेरिएंटमध्ये ही कार खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.

hyundai_i_20_new
ग्राहकांसाठी चांगली बातमी, i 20 कार तब्बल २४ व्हेरिएंटमध्ये उपलब्ध; बुकिंग सुरु   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

 • ह्युंदाई आय २०चे तब्बल २४ व्हेरिएंट बाजारात
 • नव्या लूकमधील ह्युंदाईला ग्राहक देणार पसंती?
 • ह्युंदाईच्या आय २० कारला ग्राहकांकडून सर्वाधिक पसंती

मुंबई: यावर्षी भारतातील बहुप्रतिक्षित कारपैकी एक नवीन ह्युंदाई आय २० आता बुकिंगसाठी उपलब्ध आहे. दक्षिण कोरियन ऑटो मेकर कंपनीने नवीन Hyundai i20 बुकिंग प्रारंभ तारीख, लॉन्च तारीख तसेच इंजिन आणि कोणत्या रंगात उपलब्ध असणार हे सारं काही जाहीर केलं आहे. कंपनीने हे देखील शेअर केलं आहे की, भारतात ह्युंदाई कार ही मॅग्ना, स्पोर्ट्ज, अस्टा आणि अस्टा (ओ) या एकूण चार ट्रिम पातळीवर पेश केल्या जातील. आता ह्युंदाई आय 20 ही एकूण २४ व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असणार आहे.

ह्युंदाई आय 20 व्हेरिएंट 2020 (पेट्रोल)

 1. अस्टा आयवीटी
 2. अस्टा एमटी
 3. अस्टा एमटी (डबल टोन)
 4. अस्टा टर्बो डीसीटी
 5. अस्टा टर्बो डीसीटी (डबल टोन)
 6. अस्टा टर्बो आयएमटी
 7. अस्टा टर्बो आयएमटी (डबल टोन)
 8. अस्टा (ओ) एमटी
 9. अस्टा (ओ) एमटी (डबल टोन)
 10. अस्टा (ओ) टर्बो डीसीटी
 11. अस्टा (ओ) टर्बो डीसीटी (डबल टोन)
 12. अस्टा आयवीटी (डबल टोन)
 13. मॅग्ना एमटी
 14. Sportz आयवीटी
 15. स्पोर्ट्ज आयवीटी (डबल टोन)
 16. स्पोर्ट्ज एमटी
 17. Sportz MT (ड्यूअल टोन)
 18. स्पोर्ट्ज टर्बो आयएमटी
 19. Sportz टर्बो iMT (डबल टोन)

ह्युंदाई i20 वेरिएंट 2020 (डिझेल)

 1. अस्टा (ओ) एमटी
 2. अस्टा (ओ) एमटी (डबल टोन)
 3. मॅग्ना एमटी
 4. स्पोर्ट्ज एमटी
 5. Sportz MT (ड्यूअल टोन)

ह्युंदाई i20 2020 कलर ऑप्शन 

 1. सिंगल टोन रंग विकल्प
 2. पोलर व्हाइट
 3. टाइफून सिल्वर
 4. टाइटन ग्रे
 5. फेअरी रेड 
 6. स्टॅअरी नाइट 
 7. मेटल कॉपर 

सर्व नवीन ह्युंदाई आय २० मध्ये एकूण तीन इंजिन पर्याय दिले जातील. एक एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन, एक टर्बो पेट्रोल आणि डिझेल इंजिन.  119 bhp 1.0-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन, 1.2-लीटर पेट्रोल इंजिन जे 82 एचपी तयार करतं. तर 1.5 लिटर डिझेल इंजिन देखील आहे. जे 240 एनएमच्या पीक टॉर्कसह 99 बीएचपी उत्पन्न करते. ट्रान्समिशनसाठी, कंपनीने पुष्टी केली आहे की नवी आय 20 मॅन्युअल गिअरबॉक्स, आयव्हीटी ऑटोमेटिक, एक ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक आणि आयएमटी गिअरबॉक्स यांच्या निवडीसह उपलब्ध असेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी