New Tyre Rules : वाहनांच्या टायर्सशी संबंधित नियमांमध्ये झाला बदल, आता 'या' प्रकारचे टायर असलेली वाहनेच चालवता येणार

Tyre Standards : वाहन सुरक्षित करण्यासाठी सरकारने ब्रेक, सेन्सर, एअरबॅग असे अनेक नियम केले आहेत. आता रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता वाहनांच्या टायरच्या डिझाइनमध्ये बदलांना मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे 1 ऑक्टोबरपासून नवीन डिझाईननुसार टायर (New Tyre Design)बनवले जातील. पुढील वर्षी 1 एप्रिलपासून नवीन टायरसह वाहनांची विक्री केली जाणार आहे.

New Tyre rules
नवे टायर नियम 
थोडं पण कामाचं
  • रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले
  • वाहनांच्या टायरच्या डिझाइनमध्ये बदलांना मान्यता देण्यात आली
  • टायरच्या डिझाईनचे नवीन नियम 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होणार

New Tyre rules update :नवी दिल्ली : वाहन सुरक्षित करण्यासाठी सरकारने ब्रेक, सेन्सर, एअरबॅग असे अनेक नियम केले आहेत. आता रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता वाहनांच्या टायरच्या डिझाइनमध्ये बदलांना मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे 1 ऑक्टोबरपासून नवीन डिझाईननुसार टायर (New Tyre Design)बनवले जातील. पुढील वर्षी 1 एप्रिलपासून नवीन टायरसह वाहनांची विक्री केली जाणार आहे. टायरच्या डिझाईनचे नवीन नियम (New Tyre rules) 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होतील. नवीन मानके C1, C2 आणि C3 श्रेणीतील टायर्सना लागू होतील. (Government changed the rules for tyre, from 1st octber new rules will be implemented)

अधिक वाचा : New Bike : ही आहे 69.3kmpl मायलेज असलेली परवडणारी मोटारसायकल फक्त 60 हजारांत

काय आहेत नवे टायर नियम-

नवीन टायर डिझाइन नियम 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होतील. AIS-142:2019 टप्पा 2 C1, C2 आणि C3 श्रेणीतील टायरसाठी अनिवार्य आहे. 1 एप्रिल 2023 पासून नवीन वाहनांमध्ये असे टायर ठेवणे बंधनकारक असेल. ऑटोमोटिव्ह इंडियन स्टँडर्ड्स (AIS) नुसार, वाहनाच्या टायर्सची गुणवत्ता आणि डिझाइन आता AIS-142:2019 नुसार असेल.

अधिक वाचा : Tata Car Discount: कार विकत घेतांय? मग टियागो ते नेक्सॉन, टाटा मोटर्स देतेय मोठी सूट, पाहा जबरदस्त ऑफर्स...

C1, C2 आणि C3 म्हणजे काय?

टायर तयार करण्यासाठी सध्या C1, C2 आणि C3 अशा 3 श्रेणी आहेत. प्रवासी कारच्या टायर्सच्या श्रेणीला C1 म्हणतात. C2 म्हणजे लहान व्यावसायिक वाहन आणि C3 म्हणजे अवजड व्यावसायिक वाहन टायर. आतापासून, ऑटोमोटिव्ह इंडियन स्टँडर्ड (AIS) च्या दुसऱ्या टप्प्यातील काही नियम आणि मापदंड या सर्व टायरच्या श्रेणींना अनिवार्यपणे लागू होतील. रोलिंग रेझिस्टन्स, वेट ग्रिप आणि रोलिंग ध्वनी उत्सर्जन यांसारखे पॅरामीटर्स विचारात घेतले जातील.

टायरसाठी स्टार रेटिंग प्रणाली 

वाहन चालवताना निर्माण होणारा आवाज लक्षात घेऊन नवीन टायर्स अधिक सुरक्षित केले जातील, सोबतच रस्त्यावरील चांगली पकड, ओल्या रस्त्यावरील पकड आणि जास्त वेगावर नियंत्रण ठेवता येईल. याद्वारे ग्राहकांना खरेदीच्या वेळी टायर किती सुरक्षित आहे हे कळू शकणार आहे. याशिवाय परिवहन मंत्रालय आणि अवजड उद्योग मंत्रालय लवकरच टायर्ससाठी स्टार रेटिंग सुरू करणार आहेत. रेटिंग ग्राहकाला त्याच्या वापरानुसार सर्वोत्तम आणि सुरक्षित टायर निवडण्यास मदत करेल.

अधिक वाचा : Maruti Alto पेक्षा स्वस्त मिळणार ही इलेक्ट्रिक कार, SUV सारखेच असणार फीचर्स 

आता कारमध्ये 6 एअरबॅग देखील आवश्यक 

प्रवाशांची सुरक्षा वाढवण्यासाठी सरकार आठ प्रवासी वाहनांमध्ये किमान सहा एअरबॅग अनिवार्य करणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, वाहनांमध्ये बसणाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कंपन्यांना वाहनांमधील एअरबॅगची संख्या वाढवावी लागेल. त्यांना आठ प्रवासी क्षमता असलेल्या वाहनांमध्ये किमान सहा एअरबॅग्ज बसविण्यास सांगितले जाईल. गडकरींच्या म्हणण्यानुसार, आठ प्रवासी वाहनांमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य करण्याच्या मसुद्याच्या अधिसूचनेला त्यांनी मान्यता दिली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी