Tata Nexon update : नवी दिल्ली : टाटा नेक्सॉनला (Tata Nexon) आग लागण्याची घटना घडल्यानंतर आता त्या घटनेबाबत सरकारने भूमिका घेतली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले की, मुंबईतील नेक्सॉन इलेक्ट्रिक वाहनाला लागलेल्या आगीच्या घटनेच्या चौकशीचे आदेश सरकारने दिले आहेत. "आम्ही नेक्सॉन ईव्ही आगीच्या घटनेच्या चौकशीसाठी स्वतंत्र चौकशीचे आदेश दिले आहेत," असे अधिकाऱ्याने सांगितले. सेंटर फॉर फायर एक्सप्लोसिव्ह अँड एन्व्हायर्नमेंटल सेफ्टी (CFEES), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc), नेव्हल सायन्स अँड टेक्नॉलॉजी लॅबोरेटरी (NSTL), विशाखापट्टणम यांना घटना घडल्याच्या परिस्थितीचा तपास करण्यास आणि ते होण्यापासून रोखण्यास सांगितले आहे. उपाय देखील करण्यास सांगितले आहे. (Government to action after Tata Nexon catches fire)
टाटा मोटर्सने एका निवेदनात म्हटले आहे की, नुकत्याच झालेल्या वाहनाला लागलेल्या आगीशी संबंधित घटनेचे तथ्य शोधण्यासाठी आम्ही सखोल तपास करत आहोत. आमची कारवाई पूर्ण झाल्यानंतरच आम्ही यासंदर्भात सविस्तर माहिती देऊ. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इलेक्ट्रिक वाहन आगीच्या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर झाल्यानंतर कंपनीने हे विधान जारी केले.
आम्ही आमच्या वाहनांच्या आणि ग्राहकांच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध आहोत, असे कंपनीने म्हटले आहे. सुमारे चार वर्षांतील ही पहिलीच घटना असल्याचे ऑटोमेकरने सांगितले. या कालावधीत, 30,000 हून अधिक इलेक्ट्रिक वाहनांनी एकत्रितपणे देशभरात 10 कोटी किलोमीटरहून अधिक अंतर कापले आहे.
अधिक वाचा : Best Cars : 4 लाखांपेक्षा स्वस्त 3 सर्वोत्तम कार, 31KM पेक्षा जास्त मायलेज
टाटा मोटर्सने (Tata Motors)जून महिन्यात त्यांच्या वाहनांवर सूट जाहीर केली आहे. नवीन आकडेवारीनुसार, टाटा मोटर्सच्या विक्रीच्या दृष्टीने सरलेला महिना खूप चांगला ठरला आहे. आता या महिन्यात सूट जाहीर झाल्याने या महिन्यातही विक्री चांगली होण्याची अपेक्षा आहे. जर तुम्ही या महिन्यात नवीन टाटा कार घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही त्यावर उपलब्ध असलेल्या डिस्काउंटची माहिती जाणून घ्या. टाटांच्या गाड्यांवर बंपर सूट (Tata Motors Offers) दिली जाते आहे.
टाटांची सर्वात किफायतशीर कार असलेल्या टिअॅगोवर (Tiago) 10,000 रुपयांची रोख सूट उपलब्ध आहे. ही ऑफर फक्त XZ ट्रिम आणि त्यावरील व्हेरियंटवर दिली जात आहे. याशिवाय, हॅचबॅकच्या सर्व प्रकारांवर 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देखील उपलब्ध आहे. मात्र त्याच्या i-CNG प्रकारावर कोणतीही ऑफर दिली जात नाही.
अधिक वाचा : Tyre Care Tips : पावसात टायर वारंवार पंक्चर होतात, त्याचे संरक्षण कसे करायचे? सुरक्षा टिप्स जाणून घ्या
टाटा टिगोर (Tata Tigor) बद्दल बोलायचे झाले तर त्याच्या XZ आणि वरील मॉडेल्सवर 10,000 रुपयांची रोख सूट दिली जात आहे. यासोबतच या छोट्या सेडानच्या सर्व प्रकारांवर 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जातो आहे. कंपनी या वाहनावर 3000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देखील देते आहे. मात्र या ऑफर त्याच्या i-CNG प्रकारावर उपलब्ध नाहीत.
टाटा नेक्सॉन (Tata Nexon) ही सध्या भारतीय बाजारपेठेतील सर्वात लोकप्रिय एसयूव्ही (SUV) आहे. या कॉम्पॅक्ट क्रॉसओव्हरच्या पेट्रोल व्हेरियंटवर 3000 रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जाते आहे. तर डिझेल श्रेणीतील व्हेरियंटवर 5,000 रुपयांची सूट दिली जाते आहे.