Electric Scooter | फक्त १५ मिनिटांत पूर्ण चार्ज होणार ही नवी इलेक्ट्रिक स्कूटर

Electric Scooterैwith powerful battery | नवीन स्टार्टअप (Startup)आपल्या दमदार इलेक्ट्रिक स्कूटर्स आणि मोटरसायकल सातत्याने बाजारात लॉंच करत आहेत. एका चार्जिंगमध्ये जास्तीत जास्त अंतर पार करणाऱ्या स्कूटर्स (Electric scooters)बाजारात येत आहेत. हिरो मोटोकॉर्पने (Hero MotoCorp)अशीच एक जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणली आहे. हिरोने बंगळूरूस्थित लॉग ९ मटेरियलशी भागीदारी केली आहे. हे स्टार्टअप हिरोच्या सर्व इलेक्ट्रिक स्कूटर्समध्ये बॅटरी बसवणार आहे.

Hero electric scoter
हिरो इलेक्ट्रिक स्कूटर 
थोडं पण कामाचं
  • इलेक्ट्रिक दुचाकींच्या बाजारपेठेत मोठी स्पर्धा
  • हिरो मोटोकॉर्पने आणली नवीन जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर
  • फक्त १५ मिनिटात पूर्ण चार्जिंग होणार

Hero Electric Scooter | नवी दिल्ली : दुचाकी इलेक्ट्रिक वाहनांच्या (Electric two wheeler) बाजारपेठेतील स्पर्धा तीव्र होताना दिसते आहे. नवीन स्टार्टअप (Startup)आपल्या दमदार इलेक्ट्रिक स्कूटर्स आणि मोटरसायकल सातत्याने बाजारात लॉंच करत आहेत. एका चार्जिंगमध्ये जास्तीत जास्त अंतर पार करणाऱ्या स्कूटर्स (Electric scooters)बाजारात येत आहेत. हिरो मोटोकॉर्पने (Hero Motocorp)अशीच एक जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणली आहे. हिरोने बंगळूरूस्थित लॉग ९ मटेरियलशी भागीदारी केली आहे. हे स्टार्टअप हिरोच्या सर्व इलेक्ट्रिक स्कूटर्समध्ये बॅटरी बसवणार आहे. हिरो इलेक्ट्रिक टू व्हिलर्समध्ये लॉग ९ ची रॅपिडएक्स बॅटरी (Battery) लागल्यानंतर या बॅटरी फक्त १५ मिनिटात पूर्ण चार्ज (Full charge)होणार आहेत. (Hero electric scooter to get fully charged in 15 minutes)

बॅटरीची चार्जिंग ९ पट तेज असणार

कंपनीने म्हटले आहे की बॅटरीची चार्जिंग ९ पट वेगवान असणार आहे. याची कामगिरी ९ पट वेगवान असेल, बॅटरीचा कालावधी देखील ९ पट वाढणार आहे आणि याची क्षमतादेखील ९ पटीने वाढणार आहे. लॉग ९ ने याआधीच रॅपिडेक्स बॅटरीची चाचणी अॅमेझॉन, शेडोफेक्स, डिलिव्हरी, फ्लिपकार्ट आणि बाइकमेनिया यासारख्या फ्लीट ऑपरेटर्ससोबत केली आहे. या बॅटरीचे आयुर्मान १० वर्षे आहे असे सांगण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून देखील ही बॅटरी चांगली आहे. कारण ही बॅटरी आग पकडत नाही. तापमानात खूप जास्त वाढ झाल्यावरदेखील या बॅटरीवर कोणताही परिणाम होत नाही. याशिवाय कंपनीने वेगवेगळ्या ऋतूंच्या दृष्टीकोनातून या बॅटरीची चाचणी केली आहे.

सध्या इलेक्ट्रिक स्कूटर व्यावसायिक वापराकरिता

हिरो इलेक्ट्रिक भारतीय बाजारपेठेत एनवायएक्स इलेक्ट्रिक स्कूटर विकणार आहे. ही स्कूटर सध्या व्यावसायिक वापरासाठी विकण्यात येते आहे. याला एकदा चार्ज केल्यानंतर २१० किमी पर्यत चालवता येते. या ई-स्कूटरचे अनेक व्हेरियंट बाजारात विक्रीसाठी आहेत आणि याला खास करून फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यांना डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आली आहे. हिरो इलेक्ट्रिकचे म्हणणे आहे की कंपन्या आपल्या गरजेनुरुप इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये बदल करू शकतात. यामुळे पुढील भागात बकेट आणि मागील भागात मोठा बॉक्स लावता येतो.

इलेक्ट्रिक मोटरचा पर्याय

या ई-स्कूटरसह ६०० किंवा १३०० वॅटच्या इलेक्ट्रिक मोटरचे पर्याय देण्यात आले आहेत. हे ५१.२ वॅट किंवा ३० एएचच्या तीन लिथियम आयन बॅटरीसोबत येतात. हिरो इलेक्ट्रिकच्या या स्कूटरला स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, ब्ल्यू टूथ कनेक्टिव्हिटी आणि सर्वात चांगल्या रिमोट सर्व्हिलान्सशिवाय स्कूटर डायगनॉस्टिक सोल्यूशन्ससारख्या अनेक सुविधा दिल्या आहेत. ही ई-स्कूटर तीन व्हेरियंटमध्ये येते, एलआय, एलआय ईआर आणि एचएस५०० ईआर हे तीन व्हेरियंट आहेत. यांची दिल्लीमध्ये एक्सशोरुम किंमत ६३,९०० रुपयांपासून सुरू होते. तर टॉप मॉडेल साठी ही किंमत ७९,९०० रुपयांपर्यत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी