Electric vehicle | इलेक्ट्रिक हिरो स्प्लेंडरची धमाल, पाहा जबरदस्त फीचर्स

Electric Hero Splendor : ऑटोमोबाइल क्षेत्राला (Automobile)मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागले आहे. या आव्हानाला तोंड देण्यासाठी सर्व वाहन उत्पादक कंपन्या प्रयत्न करत आहेत. ऑटोमोबाइल कंपन्यांकडून नवनवीन मॉडेल बाजारात आणली जात आहेत. तर दुसरीकडे पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनाच्या दरवाढीमुळे बाजारात इलेक्ट्रिक वाहनांच्या (Electric vehicle) मागणीत सातत्याने वाढ होते आहे.

Electric Hero Splendor
इलेक्ट्रिक हिरो स्पेंडर  |  फोटो सौजन्य: YouTube
थोडं पण कामाचं
  • कोरोना काळात ऑटोमोबाइलसमोर संकट
  • पेट्रोल-डिझेल दरवाढीचा ऑटो सेक्टरला फटका
  • झपाट्याने वाढते आहे इलेक्ट्रिक वाहनांची मागणी

Electric Hero Splendor : नवी दिल्ली : कोरोना संकट काळात ऑटोमोबाइल क्षेत्राला (Automobile)मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागले आहे. या आव्हानाला तोंड देण्यासाठी सर्व वाहन उत्पादक कंपन्या प्रयत्न करत आहेत. ऑटोमोबाइल कंपन्यांकडून नवनवीन मॉडेल बाजारात आणली जात आहेत. तर दुसरीकडे पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनाच्या दरवाढीमुळे बाजारात इलेक्ट्रिक वाहनांच्या (Electric vehicle) मागणीत सातत्याने वाढ होते आहे. (Hero launched the electric Splendor, check the features)

पेट्रोलचे वाहन होते इलेक्ट्रिक

यात महत्त्वाची बाब म्हणजे पेट्रोल-डिझेल वाहनाचे रुपांतर इलेक्ट्रिक वाहनांमध्ये करता येते. यासाठी तुम्हाला इलेक्ट्रिक वाहनाचे किट लावण्याची आवश्यकता असते. यामध्ये पेट्रोल-डिझेल इंधनद्वारे चालणाऱ्या इंजिनाच्या जागी कन्व्हर्जन किट लावला जातो. अलीकडच्या काळात काही स्टार्टअप्सनी कार आणि मोटरसायकलसाठी ईव्ही कन्व्हर्जन किट दिले आहेत. याचदरम्यान ठाण्यातील एका ईव्ही स्टार्टअपने गोगोए१ मोटरसायकलसाठी ईव्ही कन्व्हर्जन किट तयार केला आहे. ३५,००० रुपये अधिक जीएसटी इतकी किंमत मोजून तुम्ही तुमची मोटरसायकल इलेक्ट्रिक करू शकता.

तीन वर्षांची वॉरंटी असलेले किट

आरटीओकडून परवानगी असलेले हे किट ३ वर्षांच्या वॉरंटीसह येते. पूर्ण बॅटरी पॅकसह ९५,००० रुपयांची किंमत मोजून तुम्ही इलेट्रिक स्प्लेंडर घेऊ शकता. बाइक १५१ किमी प्रति चार्जची रेंज देते. गोगोए१ ने देशभरातील ३६ आरटीओवर इन्स्टॉलेशन सेटअप लावले आहेत. यांची संख्या लवकरच वाढवली जाणार आहे. 

या किटला आरटीओकडून मंजूरी मिळाली असल्यामुळे अशा बाइकमध्ये इन्श्युरन्सदेखील होतो. यामध्ये तुम्हाला ग्रीन नंबर प्लेट मिळेल मात्र रजिस्ट्रेशन नंबर बदलणार नाही. या ईव्ही कन्व्हर्जन किटमध्ये २.८ किलोवॅट-आर बॅटरी पॅक लागेल, यामध्ये २ किलोवॅट ब्रशलेस इलेक्ट्रिक मोटर असणार आहे.

दुचाकी इलेक्ट्रिक वाहनांच्या (Electric two wheeler) बाजारपेठेतील स्पर्धा तीव्र होताना दिसते आहे. नवीन स्टार्टअप (Startup)आपल्या दमदार इलेक्ट्रिक स्कूटर्स आणि मोटरसायकल सातत्याने बाजारात लॉंच करत आहेत. एका चार्जिंगमध्ये जास्तीत जास्त अंतर पार करणाऱ्या स्कूटर्स (Electric scooters)बाजारात येत आहेत. हिरो मोटोकॉर्पने (Hero Motocorp)अशीच एक जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणली आहे. हिरोने बंगळूरूस्थित लॉग ९ मटेरियलशी भागीदारी केली आहे. हे स्टार्टअप हिरोच्या सर्व इलेक्ट्रिक स्कूटर्समध्ये बॅटरी बसवणार आहे. हिरो इलेक्ट्रिक टू व्हिलर्समध्ये लॉग ९ ची रॅपिडएक्स बॅटरी (Battery) लागल्यानंतर या बॅटरी फक्त १५ मिनिटात पूर्ण चार्ज (Full charge)होणार आहेत. 

हिरो इलेक्ट्रिक भारतीय बाजारपेठेत एनवायएक्स इलेक्ट्रिक स्कूटर विकणार आहे. ही स्कूटर सध्या व्यावसायिक वापरासाठी विकण्यात येते आहे. याला एकदा चार्ज केल्यानंतर २१० किमी पर्यत चालवता येते. या ई-स्कूटरचे अनेक व्हेरियंट बाजारात विक्रीसाठी आहेत आणि याला खास करून फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यांना डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आली आहे. हिरो इलेक्ट्रिकचे म्हणणे आहे की कंपन्या आपल्या गरजेनुरुप इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये बदल करू शकतात. यामुळे पुढील भागात बकेट आणि मागील भागात मोठा बॉक्स लावता येतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी