नवीन मॉडेल पण किंमत जुनीच, Hero ने लॉन्च केली 2022 Xtreme 160R

Hero MotoCorp ने 2022 Xtreme 160R भारतात लॉन्च केली आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत रु. 1.17 लाख आहे. ही जुनीच किंमत आहे.

hero launches 2022 xtreme 160r bike at old price know how much new bike has changed
नवीन मॉडेल पण किंमत जुनीच, Hero ची भन्नाट बाइक (Image Credit: Hero MotoCorp)  
थोडं पण कामाचं
  • 2022 Hero Xtreme 160R भारतात लाँच
  • एक्स-शोरूम किंमत 1.17 लाख रुपये
  • हिरोची नवीन बाइक पण किंमत जुनीच

2022 Hero Xtreme 160R: Hero MotoCorp ने भारतीय बाजारपेठेत 2022 Xtreme 160R बाईक लाँच केली आहे, जी कंपनीने काही किरकोळ बदलांसह लाँच केली आहे. मात्र, तरीही कंपनीने आपल्या या मोटरसायकलच्या किंमतीत अजिबात वाढ केलेली नाही. अशा परिस्थितीत, नवीन 2022 Xtreme 160R ची एक्स-शोरूम किंमत 1,17,148 रुपये ठेवण्यात आली आहे. Hero ने Xtreme 160R च्या नवीन मॉडेलला गियर पोझिशन इंडिकेटर दिले आहे, याआधी हे फीचर बाइकच्या स्टेल्थ एडिशनमध्ये उपलब्ध होते. Xtreme 160 मधील इतर बदलांमध्ये पुन्हा डिझाइन केलेले सीट आणि वेगळ्या डिझाइनची गॅब रेल समाविष्ट आहे. (hero launches 2022 xtreme 160r bike at old price know how much new bike has changed)

ही बाईक तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध

हीरोची ही मोटरसायकल तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये सिंगल डिस्क, ड्युअल डिस्क आणि स्टेल्थ एडिशन समाविष्ट आहे. सिंगल डिस्क व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 1.17 लाख रुपये आहे, तर त्याच्या ड्युअल डिस्क व्हेरिएंटची किंमत 1.20 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. बाईकच्या स्टेल्थ एडिशनची एक्स-शोरूम किंमत 1.22 लाख रुपये आहे. ब्रेकिंगसाठी सिंगल डिस्कमध्ये 220 मिमी पेटल डिस्क आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेक देण्यात आला आहे.

अधिक वाचा: New 2022 Alto: नवीन अल्टोचा धमाका! ग्राहकांमध्ये लॉंचिंग आधीच प्रचंड क्रेझ...विक्रीचे विक्रम मोडण्याची शक्यता

तांत्रिक बदल नाही

बाइकच्या 2022 मॉडेलमध्ये कोणतेही तांत्रिक बदल झालेले नाहीत आणि ते पूर्वीप्रमाणेच 163 सीसी सिंगल-सिलेंडर इंजिनसह आले आहे. हे एअर-कूल्ड फ्युएल इंजेक्टेड इंजिन 15.2 PS पॉवर आणि 14 Nm पीक टॉर्क बनवते आणि कंपनीने 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडले आहे. 

अधिक वाचा: काय रंग, काय डिझाईन, काय इंजिन… दीड लाखात TVS ची दमदार बाईक

यामध्ये टेलिस्कोपिक सस्पेन्शन आणि मागील बाजूस मोनोशॉक सस्पेन्शन देण्यात आले आहे. Hero Xtreme 160R ला 17-इंच अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. बाईकसोबत यूएसबी चार्जरही देण्यात आला आहे.

जबरदस्त फीचर्स

बाईकमध्ये एलसीडी कन्सोल आहे जो गीअर पोझिशन, फ्युएल गेज, स्पीडोमीटर, टॅकोमीटर आणि ओडोमीटरची माहिती देतो. याशिवाय डिस्प्लेवर वेलकम मेसेज आणि ब्राइटनेस सेटिंग देण्यात आली आहे. हिरोने बाइकसोबत साइड स्टँड कटऑफ सेन्सर आणि पूर्णपणे एलईडी लाइटिंग आणि हजार्ड लाइट्स असलेले एलईडी डीआरएल देखील दिले आहेत. Hero MotoCorp ने ऑटो सेल टेक्नोलॉजी देखील विकसित केले आहे. जे इंजिनला बंपर टू बंपर ट्रॅफिकमध्ये चालू ठेवते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी