नवरात्र ते दिवाळी... हिरोने केली तब्बल 'एवढ्या लाख' बाइकची विक्री

Hero bike sales : बाईक निर्माता हीरो मोटोकॉर्पने सांगितले की, सणांच्या वेळी त्यांनी तब्बल 14 लाखांहून अधिक मोटारसायकल आणि स्कूटर्सची विक्री केली आहे. 

Hero_MotoCorp_-_Pleasure_Platinum
नवरात्र ते दिवाळी... हिरोने केली 'एवढ्या लाख' बाइकची विक्री  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • सणासुदीच्या काळात हिरोची जबरदस्त कामगिरी
  • नवरात्र ते दिवाळी या काळात १४ लाख बाइकची विक्री
  • गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा अधिक बाइकची विक्री

नवी दिल्ली: दुचाकी वाहन निर्माता कंपनी हीरो (Hero) मोटो कॉर्पने काल (बुधवार) एक महत्त्वपूर्ण माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, सणासुदीच्या वेळी त्यांनी तब्बल १४ लाखाहून (14 lakh Bikes and Scooter) अधिक मोटारसायकल आणि स्कूटरची विक्री केली आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की यावर्षी कोविड-१९ चे संकट असूनही, सणासुदीच्या ३२ दिवसांमध्ये (नवरात्र ते दिवाळीपर्यंत) (navratri to diwali) मोठ्या प्रमाणात दुचाकींची विक्री झाली आहे. याच काळात गेल्या वर्षीच्या (२०१९ साली)  तुलनेत जवजवळ ९८ टक्के अधिक गाड्यांची विक्री झाली आहे. तर २०१८ च्या तुलनेत याच कालावधीत यंदा १०३ टक्के विक्री झाली आहे. 

सणांच्या वेळी किरकोळ विक्रीत मोटारसायकल आणि स्कूटर्सच्या १४ लाख युनिटपेक्षा जास्त विक्री केल्याचे हिरो मोटो कॉर्पने सांगितले. कंपनीच्या म्हणण्यानुसार, सणांच्या वेळी चांगली विक्री केल्यामुळे त्याच्या डीलर्सकडे वाहनांचा साठा कमी होण्यास मदत झाली आणि आता ते चार आठवड्यांपेक्षा कमी झाले आहेत. हे सणांनंतर सर्वात कमी स्टोअर आहे.

पुढील दृष्टिकोनाबाबत, कंपनीने म्हटले आहे की, कोविड-१९ लस लवकरच विकसित होत असल्याच्या बातम्यांमुळे येत्या काही महिन्यांत जागतिक अर्थव्यवस्थेत तेजी येण्याची शक्यता आहे. हीरो मोटो कॉर्पच्या मते, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) च्या 2021-22 मधील भारतीय अर्थव्यवस्थेत दुप्पट वाढीचा सकारात्मक अंदाज ग्राहकांच्या दृष्टीकोनातून सुधारेल ज्याचा दुचाकी वाहनांवरही परिणाम होईल. कंपनीच्या म्हणण्यानुसार सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या उपाययोजनांद्वारेही पुनरुज्जीवन वेगवान व्हायला हवे.

अर्थव्यवस्थेसाठी चांगली बातमी... बाइक विक्रीमध्ये मोठी वाढ 

टीव्हीएस (TVS) मोटर कंपनीची विक्री ऑक्टोबरमध्ये २२ टक्क्यांनी वाढून ३,९४,७२४ वाहनांवर गेली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने ३,२३,३६८ वाहनांची विक्री केली. स्टॉक एक्सचेंजला (Share Market) पाठविलेल्या सूचनेत कंपनीने सांगितले की, दुचाकींची (Two Wheeler) विक्री ऑक्टोबरमध्ये २४ टक्क्यांनी वाढून ३,८२,१२१ वाहनांवर गेली, जी गेल्या वर्षी याच महिन्यात ३,०८,१६१ एवढी होती. दुसरीकडे बजाज ऑटो कंपनीच्या दुचाकीची ऑक्टोबर महिन्यात एकूण विक्री ११ टक्क्यांनी वाढून ५,१२,०३८ वाहनांवर गेली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने ४,६३,२०८ वाहनांची विक्री केली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी