होंडाने लॉन्च केली BS6 Amaze,इतकी कमी आहे किंमत 

Honda Amaze BS-6 Launched: होंडाने सेडान Amaze BS-6 ला लॉन्‍च केले आहे.  भारतीय बाजारात Amazeची टक्‍कर ह्युंदाईची ऑरा, मारुतीची डिजायर आणि टाटाची टिगोरशी होणार आहे. 

honda cars india launches bs 6 compliant amaze petrol and diesel auto news in marathi tut
होंडाने लॉन्च केली BS6 Amaze,इतकी कमी आहे किंमत   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • Amaze BS-6ची किंमत 6.09 लाख ते 9.55 लाख रुपयांच्या आत आहे. 
  • Amaze होंडाची पहिली कार आहे. जी  BS-6 डीजल मॉडलमध्ये आली आहे. 
  • Amazeची टक्‍कर ह्युंदाईची ऑरा, मारुतीची डिजायर आणि टाटाची टिगोरशी होणार आहे. 

मुंबई : भारतात प्रीमियम कारची लीडिंग कंपनी होंडा कार्स इंडिया लिमिटेड (HCIL) ने सेडान Amaze BS-6  लॉन्‍च केली आहे. ही पेट्रोल आणि डीजल दोन्ही व्हर्जनमध्ये उपलब्ध असणार आहे.  होंडाची पहिली कार आहे. जी  BS-6 डीजल मॉडलमध्ये विकली जाणार आहे.  भारतीय बाजारात  Amazeची ह्युंदाईची ऑरा, मारुतीची डिजायर आणि टाटाची टिगोरशी होणार आहे. 


दिल्लीच्या शोरूममध्ये Amaze BS-6ची किंमत 6.09 लाख ते 9.55 लाख रुपयांच्या आत आहे. या कारच्या 1.2 लीटर पेट्रोलची किंमत 6.09 लाख ते 8.75 लाख रुपयांच्या आता आहे.  तर 1.5 लीटरच्या डीजल इंजिनची की किंमत 7.55 लाख ते 9.95 लाख रुपये आहे.


HCIL के उपाध्यक्ष आणि निदेशक (विपणन आणि विक्री) राजेश गोयल यांनी लॉन्चिंग दरम्यान सांगितले की,, ‘‘होंडा भारतीय बाजारात नवी आणि आधुनिक पर्यावरण अनुकूल तंत्रज्ञान आणण्यासाठी कटीबद्ध आहे. आम्ही  होंडा अमेजचे बीएस-6 व्हर्जन सादर केले आहे.’’  Honda Amaze च्या  पेट्रोल वेरिएंटमध्ये कंपनीने 1.2 लीटरची क्षमतेचे नॅचरल एस्पायर्ड इंजिनचा उपयोग केला आहे. दुसरीकडे डीजल वेरिएंटमध्ये कंपनीने 1.5 लीटरच्या क्षमतेच्या इंजिन उपयोग केला आहे. पेट्रोल इंजिन 90hpची पावर आणि 110Nmचा टॉर्क जेनरेट करतो. याच प्रमाणे डीजल इंजिन बाबत बोलायचे तर 100hpची पावर आणि 200Nmचा टॉर्क जेनरेट करतो.


Honda Amazeमध्ये एलईडी पोजिशन लँप, फ्रंट फॉग लँप, रियर कॉम्बिनेशन लँप, एलईडी टर्न इंडिकेटर्स सह पावर-फोल्डिंग ओआरवीएम, अलॉय व्हील आणि शार्क फिन एंटिना सारखे फीचर्स आहेत. कॉम्पॅक्ट सेडानमध्ये 7 इंचचे डिजीपॅड टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, मल्टीफंक्शन स्टीयरिंग व्हील, स्वचालित एसी आणि इंजन स्टार्ट / स्टॉप बटन सारख्या सुविधासह काही अनेक सुविधा मिळतात. या शिवाय Amaze BS-6 मध्ये  पहिल्याप्रमाणे ड्यूल एयरबॅग, एबीएस, रियर पार्किंग सेंसर आणि ईबीडी उपलब्‍ध आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी