Honda Amaze: होंडाने लाँच केलं Amazeचं खास व्हर्जन, पाहा किंमत आणि फीचर्स 

Honda Amaze: होंडा कार्स इंडियाने सणाच्या हंगामापूर्वी कॉम्पॅक्ट सेडान अमेझेचं खास व्हर्जन बाजारात आणलं आहे. पाहा या कारचे फीचर्स आणि किंमत. 

होंडाने लाँच केलं Amazeचं खास व्हर्जन, पाहा किंमत आणि फीचर्स
(फोटो सौजन्य: Honda) 

नवी दिल्ली: होंडा (Honda) कार्स इंडियाने सणासुदीच्या दिवसात  आपल्या कॉम्पॅक्ट सेडान Amaze या कारचं स्पेशल व्हर्जन लाँच केलं आहे. दिल्लीच्या शोरूममध्ये त्याची किंमत ७ लाख ते ९.१० लाख रुपये आहे. या मॉडेलचे मॅन्युअल ट्रान्समिशन असलेल्या पेट्रोल व्हेरिएंटची किंमत ७ लाख रुपये आहे. सीव्हीटी (Automatic) व्हेरिएंटची किंमत ७.९० लाख रुपये आहे.

त्याच वेळी, डिझेल मॅन्युअल व्हेरिएंटची किंमत ८.३ लाख रुपये आहे आणि सीव्हीटी (व्हेरिएबल ट्रान्समिशन) ची किंमत ९.१० लाख रुपये आहे. या स्पेशल व्हर्जनमध्ये डिजीपॅड २.० असेल. ही एक १७.७ सेमी टचस्क्रीन प्रगत अॅडव्हान्स डिस्प्ले ऑडिओ सिस्टम आहे. याशिवाय यात नवीन सीट कव्हर्ससुद्धा असतील.

होंडा कार्स इंडियाचे उपाध्यक्ष आणि परदेशी (विपणन व विक्री) राजेश गोयल यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमेझ एस ग्रेडच्या आधारावर स्पेशल व्हर्जनच्या नव्या स्मार्ट फीचरसच्या समावेशाने हे मॉडेल अधिक आकर्षक मूल्यांमध्ये उपलब्ध होणार आहे. कंपनीला आशा आहे की या खास आवृत्तीला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. उत्सवाचा हंगाम नवरात्रीपासून सुरू होईल आणि नोव्हेंबर अखेरपर्यंत चालेल.

Honda Amaze च्या  पेट्रोल वेरिएंटमध्ये कंपनीने 1.2 लीटरची क्षमतेचे नॅचरल एस्पायर्ड इंजिनचा उपयोग केला आहे. दुसरीकडे डीजल वेरिएंटमध्ये कंपनीने 1.5 लीटरच्या क्षमतेच्या इंजिन उपयोग केला आहे. पेट्रोल इंजिन 90hpची पावर आणि 110Nmचा टॉर्क जेनरेट करतो. याच प्रमाणे डीजल इंजिन बाबत बोलायचे तर 100hpची पावर आणि 200Nmचा टॉर्क जेनरेट करतो.

Honda Amazeमध्ये एलईडी पोजिशन लँप, फ्रंट फॉग लँप, रियर कॉम्बिनेशन लँप, एलईडी टर्न इंडिकेटर्स सह पावर-फोल्डिंग ओआरवीएम, अलॉय व्हील आणि शार्क फिन एंटिना सारखे फीचर्स आहेत. कॉम्पॅक्ट सेडानमध्ये 7 इंचचे डिजीपॅड टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, मल्टीफंक्शन स्टीयरिंग व्हील, स्वचालित एसी आणि इंजन स्टार्ट / स्टॉप बटन सारख्या सुविधासह काही अनेक सुविधा मिळतात. या शिवाय Amaze BS-6 मध्ये  पहिल्याप्रमाणे ड्यूल एयरबॅग, एबीएस, रियर पार्किंग सेंसर आणि ईबीडी उपलब्‍ध आहे.होंडाने लाँच केलं Amazeचं खास व्हर्जन, पाहा किंमत आणि फीचर्स

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी