New Honda SUV : नवी दिल्ली : भारतात एसयूव्ही (SUV) श्रेणीतली वाहनांच्या बंपर विक्रीमुळे सर्वच ऑटोमोबाइल कंपन्यांनी यावर लक्ष केंद्रीत केले आहे. जवळजवळ सर्व ऑटोमोबाईल कंपन्या या सेगमेंटमध्ये एकापेक्षा जास्त कार लॉन्च करत आहेत. आता या प्रयत्नात होंडा कंपनी आगामी काळात नवीन एसयूव्ही होंडा एन7एक्स ( Honda N7X) (संभाव्य नाव) लाँच करू शकते. होंडाची नवी एसयूव्ही Hyundai Creta, Kia Seltos, Tata Harrier आणि Mahindra XUV700 सारख्या SUV ला टक्कर देणार आहे. होंडाची नवीन एसयूव्ही उत्तम लुक तसेच दमदार फीचर्सने सुसज्ज असू शकते. (Honda to launch new SUV N7X in Indian market)
प्रसार माध्यमांमधून आलेल्या माहितीनुसार Honda ची आगामी SUV 5 सीटर आणि 7 सीटर पर्यायांमध्ये सादर केली जाऊ शकते. या एसयूव्हीमध्ये 1.5 लीटर पेट्रोल इंजिन असणार आहे. याचबरोबर 6-स्पीड मॅन्युअल किंवा CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्स या उर्वरित SUV मध्ये दिसू शकतात. Honda N7X S, E, Prestige आणि Prestige HS सारख्या ट्रिम पर्यायांसह बाजारात उपलब्ध करून दिली जाऊ शकते.
Honda N7X SUV च्या अपेक्षित लुक आणि वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, यात होंडा सिटी आणि सिविक सारख्या प्रीमियम सेडान सारख्या सरळ नाकाच्या आकाराचे मोठे मल्टी स्लॅट क्रोम ग्रिल मिळतील. यामध्ये एलईडी हेडलॅम्प, एल-आकाराचे एलईडी डीआरएल आणि बंपरमध्ये फॉग लॅम्प मिळतील. Honda च्या आगामी SUV मध्ये ड्युअल टोन डोअर माउंटेड विंग मिरर आणि मल्टी स्पोक अलॉय व्हील्स मिळतील. त्याच वेळी, फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये मोठ्या टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, मल्टीपल एअरबॅग्जसह अनेक मानक आणि सुरक्षा वैशिष्ट्ये पाहता येतील. Honda N7X भारतात 12 लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या श्रेणीसह बाजारात आणली जाऊ शकते.
अधिक वाचा : अफगाणी धर्मगुरू हत्या प्रकरण; पोलिसांची मोठी कारवाई, नगरमध्ये लपून बसलेल्या आरोपींच्या आवळल्या मुसक्या
देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी आणि टाटा समूहातील महत्त्वाची कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने (Tata Motors) आपल्या नव्या टाटा टिअॅगो एनआरजीचा ( Tata Tiago NRG) टीझर रिलीज केला आहे. ही कार XT प्रकार असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. सध्या, Tiago NRG हे फक्त टॉप मॉडेल XZ सह उपलब्ध आहे. आता नवीन व्हेरियंट टॉप मॉडेलपेक्षा कमी असेल आणि स्वस्तात खरेदी करता येईल. टाटा मोटर्स लवकरच Tiago NRG चा नवीन प्रकार लॉन्च करेल. नवीन कार केवळ कॉस्मेटिक बदलांसह बाजारात आणली जाईल आणि स्टॅंडर्ड मॉडेलपेक्षा नव्या कारची लांबी 37 मिमी अधिक असेल.
अधिक वाचा : CCTV: १५ पुरुष घरात घुसले अन् महिलेला उचललं, अपहरणाचा थरार कॅमेऱ्यात कैद
भारतात नवीन कार खरेदी करताना, लूक आणि परफॉर्मन्ससह ती किती मायलेज देते याकडे बरेच लक्ष दिले जाते. सध्या देशात अशी अनेक वाहने आहेत जी चांगल्या मायलेजसाठी ओळखली जातात. चांगल्या ब्रँडची वाहने केवळ कामगिरीतच उत्कृष्ट नाहीत, तर मायलेजच्या बाबतीतही पहिल्या क्रमांकावर आहेत.