Honda New Car : होंडा आणतेय नवीन दमदार SUV, मारुतिच्या ब्रेझ्झाशी होणार जोरदार स्पर्धा, पाहा कधी होणार लॉन्च

New SUV : आघाडीची कार उत्पादक कंपनी असलेली होंडा (Honda) बाजारात आघाडी घेण्यासाठी सज्ज झाली आहे. होंडा लवकरच भारतीय बाजारपेठेत एक नाही तर दोन एसयूव्ही (SUV)लॉंच करते आहे. भारतीय ग्राहकांची पसंत लक्षात घेऊन होंडाकडून अतिशय आक्रमकपणे दोन एसयूव्ही बाजारात आणल्या जाणार आहेत. यावर होंडा वेगाने काम करत आहे. आगामी दोन्ही कार होंडा अमेझच्या (Honda Amaze)अपडेटेड आर्किटेक्चरवर आधारित असतील.

Honda new SUV
होंडाची नवी एसयूव्ही  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • होंडा कंपनी बाजारात आणणार नवीन जबरदस्त एसयूव्ही
  • मारुतिच्या ब्रेझ्झासह बाजारातील इतर एसयूव्हींना देणार मोठी टक्कर
  • पाहा नवीन कारची वैशिष्ट्ये आणि कशी आहे स्पर्धा

Honda Upcoming Car : नवी दिल्ली : आघाडीची कार उत्पादक कंपनी असलेली होंडा (Honda) बाजारात आघाडी घेण्यासाठी सज्ज झाली आहे. होंडा लवकरच भारतीय बाजारपेठेत एक नाही तर दोन एसयूव्ही (SUV)लॉंच करते आहे. भारतीय ग्राहकांची पसंत लक्षात घेऊन होंडाकडून अतिशय आक्रमकपणे दोन एसयूव्ही बाजारात आणल्या जाणार आहेत. यावर होंडा वेगाने काम करत आहे. आगामी दोन्ही कार होंडा अमेझच्या (Honda Amaze)अपडेटेड आर्किटेक्चरवर आधारित असतील. या डिझाइनची अनेक वैशिष्ट्ये पाचव्या पिढीतील होंडा सिटी मिडसाईज सेडानमधून येतात. होंडाच्या भारत आणि जपानमधील मुख्यालयात या गाड्यांच्या इंजिनीअरिंग आणि स्टाइलिंगवर काम केले जाईल. (Honda to launch new SUV to compete Maruti Brezza)

अधिक वाचा : Best Car : ही कार देते अल्टोपेक्षा जास्त मायलेज, किंमत आहे एवढीच...

नव्या एसयूव्हीचे कोडनेम

कंपनीने कॉम्पॅक्ट एसयूव्हीला 3US हे कोडनेम दिले आहे. पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत ही नवी एसयूव्ही भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी लाँच केला जाऊ शकते अशी अपेक्षा आहे. Honda WR-V ची भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये सब-4-मीटर सेगमेंटमध्ये विक्री केली जाते. परंतु ही कार या विभागातील आधुनिक कारशी स्पर्धा करत नाही. होंडाच्या नवीन सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही कारच्या लॉन्चनंतर, WR-V चे उत्पादन थांबेल की पुढे चालू राहील याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

अधिक वाचा : Cheapest CNG Cars : या आहेत जबरदस्त मायलेजच्या सर्वात स्वस्त सीएनजी कार, पेट्रोलचे टेन्शनच नाही!

होंडाची एसयूव्ही करणार मारुती ब्रेझाशी स्पर्धा 

होंडाची आगामी नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही असलेल्या मारुती ब्रेझाशी (Maruti Brezza) स्पर्धा करेल. याशिवाय Tata Nexon, Kia Sonnet, Nissan Magnite, Hyundai Venue facelift सारख्या कारबरोबरदेखील भारतीय बाजारपेठेत स्पर्धा असणार आहे. आगामी SUV मध्ये आधुनिक शैली असणार आहे. ही शैली Honda BR-V सारखी असू शकते. त्याच वेळी, ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही 1.5 लीटर डिझेल इंजिनसह ग्राहकांना उपलब्ध करून दिली जाऊ शकते.

अधिक वाचा : Safest Cars : या आहेत टॉप 5 सुरक्षित कार...भारतातील रस्त्यांनुसार तयार केल्या गेलेल्या, पाहा कोणत्या?

होंडा अमेझ आणि सिटी

होंडा अमेझ (Honda Amaze) आणि होंडा सिटी (Honda City) ही मॉडेल होंडा कंपनीच्या भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कार आहेत. आता बहुतेक कार निर्माते SUV सेगमेंटकडे वाटचाल करत आहेत. Honda देखील या सेगमेंटमध्ये आपले पाऊल मजबूत करण्यासाठी काम करू इच्छित आहे. पण या सेगमेंटमध्ये होंडाच्या गाड्यांना ग्राहकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे रंजक ठरणार आहे.

मारुती (Maruti) ही कंपनीदेखील आपल्या वाहनांमध्ये नवीन तंत्रज्ञान वापरणार आहे. याचा ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. खरं तर, हरित तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी, मारुती सुझुकी इंडिया (MSI) आपल्या मॉडेल्समध्ये मजबूत हायब्रिड तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची योजना आखते आहे. ही माहिती देताना कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, येत्या 5-7 वर्षांत हे लक्ष्य गाठले जाईल. इंधन कार्यक्षमता आणि कमी कार्बन उत्सर्जन साध्य करण्यासाठी कंपनीने आपल्या प्रत्येक मॉडेलमध्ये पर्यावरणास अनुकूल तंत्रज्ञानाचा प्रचार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी