Maruti Alto K10 : तुम्ही मारुती अल्टो K10 विकत घेताना डाउन पेमेंट आणि ईएमआयचे गणित जाणून घ्या

Maruti Alto K10 : देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुतीने 18 ऑगस्टला आपली नवी कार नवीन मारुति अल्टो के10(Maruti Alto K10) लाँच केली. सध्याच्या मॉडेलपेक्षा नवे मॉडेल मोठे, ठळक आणि अधिक सुंदर आहे. हॅचबॅकमध्ये नवीन-जनरल K-सिरीज 1.0L ड्युअल जेट, ड्युअल VVT इंजिन देण्यात आलेले आहे. नवीन Alto K10 ची लांबी 3,530mm, रुंदी 1,490mm, उंची 1,520mm आणि 2,380mm चा व्हीलबेस आहे. याव्यतिरिक्त, हे अनेक सुरक्षा वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे.

Maruti 2022 Alto K10
मारुति अल्टो के 10 
थोडं पण कामाचं
  • मारुतीने 18 ऑगस्टला आपली नवी कार नवीन मारुति अल्टो के10(Maruti Alto K10) लाँच केली.
  • कारची एक्स-शोरूम किंमत 3.99 लाख रुपये आहे.
  • कारच्या टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 5.84 लाख रुपये आहे.

Maruti 2022 Alto K10 EMI :नवी दिल्ली : देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुतीने 18 ऑगस्टला आपली नवी कार नवीन मारुति अल्टो के10(Maruti Alto K10) लाँच केली. सध्याच्या मॉडेलपेक्षा नवे मॉडेल मोठे, ठळक आणि अधिक सुंदर आहे. हॅचबॅकमध्ये नवीन-जनरल K-सिरीज 1.0L ड्युअल जेट, ड्युअल VVT इंजिन देण्यात आलेले आहे. नवीन Alto K10 ची लांबी 3,530mm, रुंदी 1,490mm, उंची 1,520mm आणि 2,380mm चा व्हीलबेस आहे. याव्यतिरिक्त, हे अनेक सुरक्षा वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. या कारला इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD), रिव्हर्स पार्किंग सेन्सरसह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) मिळेल. त्याची एक्स-शोरूम किंमत 3.99 लाख रुपये आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर किती डाउन पेमेंट केल्यास किती ईएमआय भरावा हे गणित जाणून घ्या. (How much down payment & EMI you will have to pay for new Maruti Alto K10, check details)

अधिक वाचा : इलेक्ट्रीक बिलाची तक्रार सोडवा व्हिडिओ कॉलिंगद्वारे, अदानी इलेक्ट्रिसिटीची मुंबईकरांसाठी नवी सेवा 

नवीन मारुति अल्टो के10( Alto K10 )6 प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. त्याच्या टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 5.84 लाख रुपये आहे. अशा परिस्थितीत, त्याच्या कोणत्याही व्हेरियंटच्या एक्स-शोरूम किंमतीवर 20% डाउन पेमेंट भरल्यानंतर तुम्हाला किती कर्ज घ्यावे लागेल. या कर्जावर किती व्याज द्यावे लागेल? कर्जाची परतफेड करताना तुमच्या खिशातून किती अतिरिक्त पैसे येतील या सर्व गोष्टींबद्दल समजून घ्या

वाहन कर्जावरील व्याजदर 7.35% वरून 8.05%

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) वाहन कर्जावर 7.35% ते 8.05% व्याज आकारते आहे. हे व्याजदर 5 वर्षे (60 महिने) ते 7 वर्षे (84 महिने) कालावधीसाठी आहेत. म्हणजेच, तुम्ही कारच्या एक्स-शोरूम किंमतीच्या 20% डाउन पेमेंट करून उर्वरित रकमेचे कर्ज घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही हे कर्ज सुलभ EMI वर परत करू शकाल.

वेगवेगळ्या व्हेरियंटवरील ईएमआय-

1. मारुती अल्टो K10 ची STD (O) किंमत  399,000 रुपये एक्स-शोरूम आहे. त्याच्या 20% डाउन पेमेंटसाठी, तुम्हाला 79,800 रुपये खर्च करावे लागतील. अशा परिस्थितीत तुम्ही 8% व्याजदराने 7 वर्षांसाठी 3,19,200 रुपयांचे कर्ज घेतल्यास, त्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 4,975 रुपये EMI भरावे लागेल. त्याच वेळी, तुम्हाला एकूण 417,910 रुपये व्याजासह द्यावे लागतील. म्हणजेच तुम्हाला एकूण 98,710 रुपये व्याज द्यावे लागेल.

अधिक वाचा : NEET Result : NEET परीक्षेची उत्तरपत्रिका निकालाआधीच जाहीर, अशाप्रकारे करा डाऊनलोड, कुठे पाहता येणार तुमचा निकाल

प्रकार - Alto K10 STD (O)
एक्स-शोरूम किंमत - 399,000 रुपये
20% डाउन पेमेंट -  79,800 रुपये
कर्जाची रक्कम -  319,200 रुपये
EMI (7 वर्षे) - रुपये 4,975 प्रति महिना

याच पद्धतीने मारुति अल्टो के10 च्या विविध व्हेरियंटसाठीचे गणित जाणून घ्या.

2. प्रकार - Alto K10 LXI
एक्स-शोरूम किंमत - 482,000 रु
20% डाउन पेमेंट - 96,400 रुपये
कर्जाची रक्कम -  385,600 रुपये
EMI (7 वर्षे) - 6,010 रुपये प्रति महिना

3. प्रकार - Alto K10 VXI
एक्स-शोरूम किंमत - 499,500 रुपये
20% डाउन पेमेंट - 99,900 रुपये
कर्जाची रक्कम -  399,600 रुपये
EMI (7 वर्षे) - 6,228 रुपये प्रति महिना

अधिक वाचा : Aadhaar Card Latest Update: आता सहजपणे मोबाइल नंबरद्वारे आधार कार्डवर तुमचे नाव, पत्ता बायोमेट्रिक माहिती करा अपडेट, कसे ते पाहा

4. प्रकार - Alto K10 VXI+
एक्स-शोरूम किंमत - 533,500 रुपये
20% डाउन पेमेंट -  106,700 रुपये
कर्जाची रक्कम -  426,800 रुपये
EMI (7 वर्षे) - 6,652 रुपये प्रति महिना

5. प्रकार - Alto K10 VXI AMT
एक्स-शोरूम किंमत - 549,500 रुपये
20% डाउन पेमेंट -  109,900 रुपये
कर्जाची रक्कम -  439,600 रुपये
EMI (7 वर्षे) - 6,852 रुपये प्रति महिना

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी