Car Insurance नवीन कार इन्शुरन्सवर वाचतील पैसे, या 5 टिप्स कमी करतील प्रीमियम

भ्रूममभ्रूमम
Updated Mar 26, 2023 | 18:38 IST | टाइम्स नाऊ मराठी

Vehicle Insurance Policy सध्याच्या काळात जर तुम्ही नवीन गाडी विकत घेतली आहे, तर तुम्हाला त्या गाडीचे इन्शुरन्स काढणे अनिवार्य आहे. वाहनांचे संरक्षण आणि नुकसान टाळण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला तुमच्या नवीन कारसाठी अचूक आणि स्वस्त अशी पॉलिसी कशी मिळवायची याबद्दल सांगणार आहोत. 

कारसाठी योग्य पॉलिसी निवडा
कारसाठी योग्य पॉलिसी निवडा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • नवीन कार घेण्याचा विचार करत आहात? वाहन विमा काढणे अनिवार्य
  • कार इन्शुरन्स चे विविध पर्याय उपलब्ध
  • कोणती सर्वोत्तम आणि योग्य पॉलिसी आहे ?

How To Opt Best Vehicle Insurance Policy: कार खरेदी करणे ही प्रत्येकांच स्वप्न असतं. शिवाय सध्याच्या काळात प्रत्येक घरासमोर कर असणे एक ट्रेंडच झाला आहे. तसेच गाडी ही प्रत्येकांची गरज बनली असून, बाजारापासून ते सहलीपर्यंत कारचा उपयोग होतो. पण त्यासाठी नुसती कार खरेदी करून ठेवणे हा पर्याय नसतो. कारण त्याबरोबर जबाबदारी देखील आलीच.

कारचे संरक्षण तसेच तीची वेळोवेळी सर्विसिंग ची जबाबदारी कार मालकाची असते. यापैकी एक महत्वाची जबाबदारी म्हणजे वाहनाचा योग्य विमा काढणे.

तुमच्या कारसाठी कोणते योग्य आणि स्वस्त कार इन्शुरन्सचे पर्याय आहेत, याबद्दल आम्ही तुम्हाला सांगत आहोत.   

अधिक वाचा : ​IPL 2023 सुरू होण्यापूर्वी RCB ला पहिला झटका

थर्ड पार्टी कव्हर इन्शुरन्स पॉलिसी

नवीन कार खरेदी करण्यासोबतच ग्राहकांना थर्ड पार्टी मोटर इन्शुरन्स पॉलिसी घेणे बंधनकारक आहे. ही पॉलिसी अत्यंत महत्त्वाची आहे, जी पॉलिसीधारकाला थर्ड पार्टीद्वारे झालेल्या नुकसानीची भरपाई देते. नवीन कार ग्राहकांना 3 वर्षांचा थर्ड पार्टी विमा आणि टू-व्हीलरवर 5 वर्षांचा थर्ड पार्टी कव्हर पॉलिसी काढणे आता बंधनकारक झाले आहे. वाहन खरेदी करताना ह्या पॉलिसीशिवाय तुम्ही गाडी रस्त्यावर काढली, तर तुमच्या गाडीला मोठा दंड आकारला जाईल.

अधिक वाचा : ​मलायकाच्या बोल्ड ड्रेसमध्ये दिसला प्रायव्हेट टॅटू!

कारसाठी योग्य पॉलिसी निवडा

नवीन कार खरेदी करताना ग्राहकांसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत, ज्यात अन्य पॉलिसींसह थर्ड पार्टी इन्शुरन्सचा देखील समावेश आहे. नवीन कार मालकांना तज्ञांकडून कॉम्प्रिहेंसिव मोटर इंश्योरेंस पॉलिसी विकत घेण्याचा सल्ला एक्स्पर्ट कडून दिला जातो. थर्ड पार्टी इन्शुरन्स व्यतिरिक्त, ही पॉलिसी पूर, वादळ आणि भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीवर भरपाई देते. तसेच, ही एक सर्वोत्तम आणि स्वस्त पॉलिसी आहे. 

योग्य पॉलिसी निवडा 

कार खरेदी केल्यानंतर, आंधळेपणाने कोणतीही पॉलिसी विकत घेणे, पुढे तोट्याचे ठरू शकते. कार विक्रेते तुम्हाला पॉलिसी चे अगणित पर्याय ऑफर करतील. अशावेळी योग्य पॉलिसीची निवड करण्यासाठी विविध पॉलिसीच्या प्रीमियमची तुलना करून देणारे अनेक वेबसाइट आहेत, ज्या अगदी विनामूल्य तुम्हाला मार्गदर्शन करून देतील. त्यांच्या मदतीने योग्य पॉलिसी निवडा.   

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी