Maruti Suzuki Ertiga Update:नवी दिल्ली : आजही मारुति सुझुकीची वाहने (Maruti Suzuki Car) देशातील बाजारपेठेत लोकप्रिय आहेत. एमपीव्ही (MPV) श्रेणीतील वाहनांची चर्चा झाल्यास मारुति सुझुकी एर्टिगाचे नाव समोर आल्याशिवाय राहत नाही. या कारला त्याच्या विभागात मोठी मागणी आहे आणि विक्रीही चांगली आहे. सध्या बाजारात Kia Carens या कारच्या स्पर्धेत आली आहे पण Ertiga आपली ओळख कायम ठेवली आहे. एर्टिगामध्ये सौम्य हायब्रिड तंत्रज्ञानाने सुसज्ज 1.5L पेट्रोल इंजिन युनिटसह मिळते. याशिवाय, यात CNG चा पर्याय देखील मिळतो. तो त्याच्या दोन ट्रिम स्तरांमध्ये उपलब्ध आहे. एर्टिगा CNG वर 26 किमीपर्यतचा मायलेज देऊ शकते. (Huge demand for Maruti Ertiga which gives mileage of 26 Km, check details)
अधिक वाचा : OMG! कधी पाणी तर कभी आग फेकतोय हा हॅंडपंप, विश्वास बसत नसेल तर हा Video पहा...
मारुति एर्टिगा 7 सीटर कार असल्याने एका कुटुंबासाठी ही एक अतिशय उपयुक्त कार ठरते. मारुति एर्टिगाची किंमत 8,41,000 रुपयांपासून सुरू होते आणि टॉप व्हेरिएंटसाठी 12,79,000 रुपयांपर्यंत जाते.
-- मारुती अर्टिगा स्मार्ट हायब्रिड LXI(O) 1.5L 5MT ची दिल्लीत किंमत- 8,41000 रुपये
-- मारुती टूर M(O) 1.5L 5MT दिल्लीत किंमत- 9,52000 रुपये
-- मारुती अर्टिगा स्मार्ट हायब्रिड VXI(O) 1.5L 5MT दिल्लीत किंमत- 9,55000 रुपये
-- मारुती टूर M(O) CNG 1.5L 5MT दिल्लीत किंमत- 10,47000 रुपये
-- मारुती अर्टिगा VXI(O) CNG 1.5L 5MT ची दिल्लीत किंमत- 10,50000 रुपये
-- मारुती अर्टिगा स्मार्ट हायब्रिड ZXI(O) 1.5L 5MT दिल्लीत किंमत- 10,65000 रुपये
-- मारुती अर्टिगा स्मार्ट हायब्रिड ZXI+ 1.5L 5MT दिल्लीत किंमत- 11,29000 रुपये
-- मारुती अर्टिगा ZXI(O) CNG 1.5L 5MT ची दिल्लीत किंमत- 11,60,000 रुपये
-- मारुती अर्टिगा स्मार्ट हायब्रिड ZXI+ 1.5L 6AT दिल्लीत किंमत- 12,79,000 रुपये
अधिक वाचा : गडकरींना भाजपच्या संसदीय समितीतून वगळले जाण्याची होती कल्पना
हे लक्षात घेण्यासारखे आहे की मारुति एर्टिगामध्ये 1462 cc K15C, BS VI, पेट्रोल इंजिन मिळते. जे पेट्रोलवर 74.0 kW @ 6000 RPM आणि CNG वर 64.6 kW @ 5500 RPM जनरेट करते. त्याची लांबी - 4395 मिमी, रुंदी - 1735 मिमी आणि उंची - 1690 मिमी. याचा व्हीलबेस 2740 मिमी आहे. मारुतिची एर्टिगा ही एक 7 सीटर कार आहे.
अधिक वाचा : Bail Pola 2022 Images in Marathi : बैल पोळा सणाच्या शुभेच्छा images
मारुति कारना सध्या बाजारात प्रचंड मागणी आहे. कंपनीच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. व्याजदर वाढीमुळे सध्या वाहनांच्या मागणीवर कोणताही परिणाम झालेला नाही. परंतु सेमीकंडक्टर टंचाईची समस्या सुटल्यानंतर आणि उत्पादन सामान्य झाल्यावर खरी परिस्थिती स्पष्ट होईल. ग्रँड विटारा (Grand Vitara) आणि ब्रेझा(Brezza) सारख्या नवीन उत्पादनांमुळे, बुकिंग वाढले आहे. मारुतिने अलीकडेच आपली नवी कार बाजारात आणली आहे. मारुती सुझुकीने गुरुवारी नवीन अल्टो के10 लॉन्च (Maruti Suzuki new Alto K10) करण्याची घोषणा केली आहे.