'या' तारखेला लॉन्च होणार Hyundai Kona, एकदा चार्ज केल्यास चालणार 300 किलोमीटर

भ्रूममभ्रूमम
Updated Jul 02, 2019 | 21:00 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Hyundai Kona: ह्युंदाई कंपनीने आपली आगामी कारच्या लॉन्चिंगची तारीख जाहीर केली आहे. ह्युंदाई कोना भारतीय बाजारात 9 जुलै रोजी लॉन्च होणार आहे. ही एक इलेक्ट्रिक कार आहे जी एकदा चार्ज केल्यास 300 किमी चालणार.

Hyundai Kona
'या' तारखेला लॉन्च होणार Hyundai Kona 

मुंबई: ह्युंदाई कंपनीने वेन्यू ही कार लॉन्च केल्यानंतर आता आपली आणखीन एक कार भारतीय बाजारात लॉन्च करण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाईटवर ह्युंदाई कोना लिस्ट केली आहे. ही कार भारतीय बाजारात 9 जुलै रोजी लॉन्च करण्यात येणार आहे. कंपनीने या संबंधितलं लॉन्चिंग इन्विटेशनही पाठवलं आहे. ही कार ह्युंदाई कंपनीची भारतातील पहिली इलेक्ट्रिक कार आहे. ही कार यापूर्वीच आंतरराष्ट्रीय बाजारात लॉन्च करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात ही कार दोन बॅटरी पॅकमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला 39.2 kwh आणि 64 kwh  असे दोन पर्याय मिळतात. लहान बॅटरीमध्ये तुम्ही ही कार 300 किलोमीटरपर्यंत चालवू शकता आणि 6 तासांमध्ये तुम्ही चार्ज करु शकतात. या व्हेरिएंटमध्ये कार 134 पीएस इतकी पावर जनरेट करते. ही कार अवघ्या 9.3 सेकंदांमध्ये 0 ते 100 किलोमीटरचा स्पीड घेऊ शकते.

तर 64 kwh व्हेरिएंट असलेली कार तुम्ही एकदा फूल चार्ज केली तर ही कार 450 किलोमीटर पर्यंत ड्राईव्ह करु शकते. फास्ट चार्जिंगच्या मदतीने ही कार एका तासात 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते. या कारमध्ये तुम्हाला 203 पीएस पावर मिळते. भारतामध्ये लॉन्च होणाऱ्या या कारची डिझाइन आंतरराष्ट्रीय मॉडल प्रमाणेच असणार आहे. कंपनीने या कारमध्ये जास्त बदल केले नाहीयेत.

कारचं डिझाइन हे बहुतांश क्रॉसओवर प्रमाणे असल्याचं दिसत आहे. कारमध्ये प्लास्टिकचा वापर जास्त प्रमाणात केला आहे. व्हील आर्कवर जास्त प्लास्टिकचा वापर गाडीला बोल्ड लूक देतो. कारच्या आंतरराष्ट्रीय मॉडलच्या तुलनेत भारतीय व्हेरिएंटमधील कारच्या सस्पेंशनमध्ये जास्त बदल केले जाण्याची शक्यता आहे. ज्यामुळे कार ग्राऊंड क्लिअरन्स वाढण्यास मदत होईल.

ह्युंदाई कोनाला सीकेडी (कम्प्लिट नॉक्ड डाऊन रूट) च्या माध्यमातून भारतात आणण्यात येणार आहे. ही कार भारतात असेम्बल केली जाईल. भारतीय बाजारातील दुसऱ्या क्रमांकाची ऑटोमोबाइल कंपनी ह्युंदाईने एका वर्षात कोना कारच्या 500 युनिट्सची विक्री करण्याचं ठरवलं आहे. या कारची किंमत 25 लाख रुपयांपासून 30 लाखांच्या दरम्यान असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या कारची स्पर्धा फोक्सवॅगनच्या टिग्वॉन सोबत असणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
'या' तारखेला लॉन्च होणार Hyundai Kona, एकदा चार्ज केल्यास चालणार 300 किलोमीटर Description: Hyundai Kona: ह्युंदाई कंपनीने आपली आगामी कारच्या लॉन्चिंगची तारीख जाहीर केली आहे. ह्युंदाई कोना भारतीय बाजारात 9 जुलै रोजी लॉन्च होणार आहे. ही एक इलेक्ट्रिक कार आहे जी एकदा चार्ज केल्यास 300 किमी चालणार.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola