Hyundai new suv Car: भारतात या दिवशी हुंडईची नवी एसयूव्ही कार होणार लॉन्च 

भ्रूममभ्रूमम
Updated Apr 22, 2019 | 16:07 IST | टाइम्स नाऊ मराठी

वाहन निर्माता कंपनी हुंडईनं आपल्या नव्या एसयूव्ही वेन्यू या कारवरचा पडदा हटवला आहे. या कारची थेट स्पर्धा मारूती सुझुकी विटारा ब्रेजा, फोर्ड इकोस्पोर्ट आणि महिंद्रा एक्सयूव्ही ३०० यांच्याशी होणार आहे.

Hyundai New SUV Car
Hyundai new suv Car: भारतात या दिवशी हुंडईची नवी एसयूव्ही कार होणार लॉन्च   |  फोटो सौजन्य: Times Now

Hyundai new suv Car will launch In India on upcoming may month: हुंडईनं आपल्या नव्या कार वेन्यूवरून पडदा हटवला. भारतासोबत कंपनीनं ही कार न्यूयॉर्कच्या ऑटो शो २०१९ मध्ये सादर केली. हुंडईनं या निमित्तानं कारच्या प्रमुख फिचरबद्दल माहिती दिली आहे. आता या कारची भारतातली लॉन्चिंग डेट समोर आली आहे. हुंडई या कारला भारतात २१ मे रोजी लॉन्च करणार आहे. या कारची बाजारात थेट स्पर्धक मारूती सुझुकी विटारा ब्रेजा, टाटा नेक्सन, महिंद्रा एक्सयूव्ही 300 आणि फोर्ड इकोस्पोर्ट या कारशी होणार आहे. 

हुंडईनं आपल्या या सब ४ मीटर कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये मॉडर्न डिझाइन दिलं आहे. वेन्यूमध्ये तुम्हांला बोल्ड ग्रील मिळेल. ज्यावर हुंडईचा सिग्नेचर लोगो देण्यात आला आहे. कारमध्ये एलईडी डीआरएलसोबत प्रोजेक्टर हेडलॅम्प, प्रोजेक्टर फॉग लॅम्प, एलईडी टेल लॅम्प, क्रोम आऊटसाइट डोर हॅंडल, शार्क फिन एंटिना, रूफ रेल इत्यादी एक्सटिरिअर फिचर देण्यात आले आहेत. 

भारतात सब फोर मीटर सेंगमेंटची स्पर्धक खूप जास्त आहेत. त्यासाठी कंपनीनं या कारमध्ये बरेच चांगले फिचर दिले आहेत. कारमध्ये क्रूझ कंट्रोल, इलेक्ट्रिक सनरूफ, वायरलेस चार्जिंग, अर्कामय साऊंड, रिअर एसव्ही वेंट आणि कॉर्नर लाइटसह बरेच फिचर देण्यात आले आहेत. कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचं झाल्यास नव्या वेन्यूमध्ये हुंडईचं ब्लूलिंक सिस्टम देण्यात आली आहे. 

ब्लूलिंक सिस्टममध्ये लाईव्ह नेव्हिगेशन, ऑटो क्रॅश नोटिफिकेशन, कार चोरी होण्याचं नोटिफिकेशन, कार ट्रॅकिंग, रोडसाईड असिस्टेंड असे अनेक फिचर देण्यात आले आहे. कारमध्ये सुरक्षेवर पूर्ण लक्ष दिलं आहे. यात तुम्हांला ६ एअरबॅग, ईएससी/ ईएसपी आणि व्हिएसएम, हिल असिस्टंट कंट्रोल, ब्रेक असिस्टंट सिस्टम असे फिचर दिले गेले आहेत. 

हुंडई वेन्यूमध्ये १.० लीटरचं टर्बोचार्ज जीडीआय पेट्रोल इंजिन, १.२ लीटरचं कापा पेट्रोल इंजिन आणि १.४ लीटरचं डिझेल इंजिनचा पर्याय देण्यात आला आहे. कारच्या १.० लीटर इंजिनमध्ये ६ स्पीट मॅन्युअल आणि ७ स्पीड डीसीटी ट्रान्समिशन मिळेल. ज्यात १.२ लीटर पेट्रोल इंजिनमध्ये पाच स्पीड मॅन्युअल, ज्यात डिझेल युनिटमध्ये ६ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Hyundai new suv Car: भारतात या दिवशी हुंडईची नवी एसयूव्ही कार होणार लॉन्च  Description: वाहन निर्माता कंपनी हुंडईनं आपल्या नव्या एसयूव्ही वेन्यू या कारवरचा पडदा हटवला आहे. या कारची थेट स्पर्धा मारूती सुझुकी विटारा ब्रेजा, फोर्ड इकोस्पोर्ट आणि महिंद्रा एक्सयूव्ही ३०० यांच्याशी होणार आहे.
Loading...
Loading...
Loading...