Hyundai Venue Price Downpayment Loan emai options : ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडची प्रसिद्ध 4 मीटर कॅम्पॅक्ट एसयूव्ही वेन्यू वेगवेगळ्या व्हेरिएंटमध्ये बाजारात उपलब्ध आहे. E, S, S+, S(O), SX आणि SX (O) सारख्या ट्रिम लेवलच्या 16 व्हेरिएंट्समध्ये लॉन्च करण्यात आली आहे. या गाडीच्या एक्स शोरूमची किंमत 7.72 लाखांपासून ते 13.18 लाखांपर्यंत आहे. पेट्रोल आणि डिझेल इंजिन ऑप्शन्ससह मॅन्युअल आणि ऑटोमेटिक या दोन्ही ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे.
या एसयूव्हीचा मायलेज 17.5 kmpl पासून ते 23.4 kmpl पर्यंत आहे. आज आम्ही तुम्हाला या 5 सीटर एसयूव्हीच्या बेस मॉडेल Hyundai Venue E Petrol आणि दुसरी स्वस्त व्हेरिएंट Hyundai Venue S Petrol च्या फायनान्स संदर्भातील पर्यायांबाबत सांगणार आहोत.
हे पण वाचा : तेल लावल्यानंतरही केस का गळतात? वाचा कारणे आणि उपाय
ह्युंदाई वेन्यूची बेस मॉडेल ई पेट्रोल व्हेरिएंटची एक्स शोरूम किंमत 7.72 लाख रुपये आणि ऑन रोड किंमत 8,66,763 च्या आसपास (ही किंमत प्रत्येक राज्यात, शहरात वेगवेगळी) आहे. जर तुम्ही वेन्यू ई पेट्रोल गाडीसाठी एक लाख रुपये डाऊनपेमेंट करुन फायनान्स कराल तर तुम्हाला 7,66,763 रुपये कर्ज मिळेल. जर तुम्ही 9 टक्के व्याज दराने 5 वर्षांसाठी कर्ज घेतलं तर तुम्हाला प्रत्येक महिन्यासाठी 15,917 रुपये मासिक हप्ता (Monthly EMI) म्हणजे ईएमआय द्यावा लागेल.
हे पण वाचा : काखेतला काळेपणा दूर करण्यासाठी रामबाण उपाय
ह्युंदाई वेन्यू एस पेट्रोल व्हेरिएंटची एक्स शोरूम किंमत 8.94 लाख रुपये आणि ऑन रोड किंमत 10,01,793 रुपये (ही किंमत प्रत्येक राज्यात, शहरात वेगवेगळी) आहे. म्हणजेच तुम्ही जर एक लाख रुपये डाऊनपेमेंट केलं तर तुम्हाला 9,01,793 रुपये कर्ज घ्यावं लागेल. जर तुम्ही 9 टक्के व्याज दराने पाच वर्षांसाठी कर्ज घ्याल तर तुम्हाला पुढील पाच वर्षांसाठी 18,720 रुपये ईएमआय द्यावा लागेल.
(Disclaimer: ह्युंदाई वेन्यूच्या या दोन्ही व्हेरिएंट्सच्या किंमती प्रत्येक राज्यात आणि शहरांत वेगवेगळ्या असतील. त्यामुळे तुम्ही आपल्या जवळील डीलरकडे भेट देऊन सविस्तर माहिती, डाऊनपेमेंट, कर्ज, ईएमआय याच्या संदर्भातील माहिती विचारुन घ्या.)