Hyundai Small Electric Car : ह्युंडाईच्या छोट्या ई-कार लवकर भारतात लॉन्च, कंपनी पाहतेय एकाच गोष्टीची वाट

ह्युंडाई कंपनीनं छोट्या इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारात लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठीची नेमकी तारीख मात्र जाहीर केलेली नाही. कंपनी यासाठी एकाच गोष्टीची वाट पाहत आहे.

Hyundai Small Electric Car
ह्युंडाईच्या छोट्या ई-कार लवकर भारतात लॉन्च  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • ह्युंडाई भारतीय बाजारात आणणार छोट्या इलेक्ट्रिक कार
  • मुबलक चार्जिंग स्टेशन्सची गरज
  • पायाभूत सुविधा तयार होताच ‘बिग लॉन्चिंग’

Hyundai Small Electric Ca | भारतात छोट्या आणि परवडणाऱ्या इलेक्ट्रिकल कार लॉन्च करण्याची पूर्ण तयारी झाली असून लवकरच या गाड्या भारतीय रस्त्यांवर दिसू लागतील, अशी माहिती ह्युंडाई कंपनीकडून देण्यात आली आहे. या कार भारतात लॉन्च होण्याची नेमकी तारीख कंपनीने सांगितली नसली, तरी भविष्यातील आपले व्यावसायिक इरादे कंपनीनं या निमित्तानं जाहीर केले आहेत. भारत सरकारच्या बदलत्या धोरणांच विचार करता पुढील दोन दशकांमध्ये मोठ्या संख्येन इलेक्ट्रिक व्हेईकल्स देशात दाखल झालेली दिसतील, असा अंदाजही कंपनीनं वर्तवला आहे. 

या गोष्टींची प्रतीक्षा

भारतात इलेक्ट्रिक कारसाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांचा आढावा सध्या कंपनीकडून घेतला जात आहे. देशात पुरेशा प्रमाणात चार्जिंंग स्टेशन्स आणि इतर सुविधा आहेत का, याबाबत माहिती संकलित करण्याचं काम सुरू आहे. पायाभूत सुविधांमध्ये वाढ झाल्याशिवाय ई-व्हेईकल्सकडे नागरिकांचा ओढा सुरू होण्याची शक्यता कमी असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. सध्या भारतात पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांचं प्रमाण अधिक आहे. एकूण वाहनांच्या तुलनेत केवळ 1 टक्के ई-व्हेईकल्स भारतात आहेत. 2030 सालापर्यंत हे प्रमाण 30 टक्क्यांवर पोहोचवण्याचं ध्येय केंद्र सरकारनं ठरवलं आहे. त्यामुळे भारतात ई-व्हेईकल्ससाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा उभ्या कऱण्याचा वेग किती आहे आणि भविष्यात तो किती असू शकतो, याचा अंदाज कंपनीकडून घेतला जात आहे. 

आधिक वाचा -  Moto G22 specifications leak : Moto G22 चे स्पेसिफिकेशन्स झाले लीक, लवकरच होणार लॉन्च

Ioniq 5 होतेय लॉन्च

भारतात छोट्या कार लॉन्च व्हायला अजून थोडा अवधी आहे. मात्र सध्या ह्युंडाईकडून Ioniq 5 ही कार भारतीय बाजारात विक्रीसाठी यायला सज्ज झाली आहे. प्रिमियम मॉडेल असणाऱ्या या कारला भारतीय बाजाात चांगला प्रतिसाद मिळेल, अशी कंपनीला आशा आहे. अमेरिकेत या कारची किंमत 44 हजार डॉलर इतकी आहे. भारतीय बाजारात याची किंमत होते साधारण 35 लाख रुपये. 

आधिक वाचा - Fast Internet : वेगवान इंटरनेट, फटाफट होणारे डाउनलोडिंग हवे आहे? मग तुमच्या मोबाइलमध्ये फक्त करा हे काम...

टॉप डाऊन अप्रोच

पेट्रोल डिझेलवरच्या कार बाजारात आणताना आमचा ‘बॉटम डाऊन’ अप्रोच होता, मात्र आता इलेक्ट्रिक कारच्या बाबतीत आम्ही ‘बॉटम अप’ अप्रोच घेतला आहे, अशी प्रतिक्रिया कंपनीचे ह्युंडाईचे भारतातील सेल्स डिरेक्टर तरुण गर्ग यांनी दिली आहे. इलेक्ट्रिक कारचा प्रयोग भारतात यशस्वी व्हायचा असेल, तर अगोदर त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व पायाभूत सुविधांची पूर्तता होणं गरजेचं आहे, असं गर्ग यांनी म्हटलं आहे. चार्जिंग स्टेशन्सची मुबलक संख्या आणि छोट्या बॅटरींचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू होणं गरजेचं आहे, असं गर्ग यांनी म्हटलं आहे. 

यापूर्वी, ह्युंडाई कंपनीनं KONA ही इलेक्ट्रिक कार 2019 साली भारतीय बाजारात आणली होती. मात्र अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद कंपनीला मिळाली. त्यावेळी झालेल्या चुका आणि आवश्यक सुधारणा या दोन्ही गोष्टींचा विचार करून आता नवी कार बाजारात आणल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी