Car Safety: चालकांनो! कारमधील सीट बेल्ट नाही लावणार, मग वार्निंग भोंगा वाजणार; सीट बेल्टसाठी सरकारनं बनवला नियमांचा ड्राफ्ट

टाटा समूहाचे माजी चेअरमन (Former Chairman of Tata Group) सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचा अपघातात (accident) मृत्यू झाल्यानंतर कारच्या सुरक्षेचा मुद्दा बर्‍याच दिवसांपासून चर्चेत आला आहे.

If you don't wear a seat belt in the car, then the warning will sound
चालकांनो! कारमधील सीट बेल्ट नाही लावणार, मग वार्निंग भोंगा वाजणार  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
 • M आणि N कॅटेगरीतील वाहनांमध्ये सीट बेल्ट अलार्म अनिवार्य असेल.
 • सीट बेल्टसाठी सरकारने केलेल्या ड्राफ्टमध्ये जुगाड करता येणार नाही, हे जुगाड थांबविण्यासाठी सरकारने एक विशेष व्यवस्था केली आहे.

Government Draft On Car Safety: टाटा समूहाचे माजी चेअरमन (Former Chairman of Tata Group) सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचा अपघातात (accident) मृत्यू झाल्यानंतर कारच्या सुरक्षेचा मुद्दा बर्‍याच दिवसांपासून चर्चेत आला आहे. वाहन चालक तसेच कारमधील इतर प्रवाशी सीट बेल्ट (seat belt) वापरत नसल्याचं आपण अनेकवेळा पाहिलं आहे. सीट बेल्ट लावणं हे कंटाळवाणं वाटतं. (If you don't wear a seat belt in the car, then the warning will sound; Govt made draft for seat belt)

नागरिकांच्या या वागणुकीवर आळा घालण्यासाठी सरकारने कार सुरक्षेशी संबंधित आणखी काही पावले उचलावीत, अशी मागणी केली जात आहे. या मागणीची दखल घेत केंद्र सरकारने (Central Govt) एक मसुदा तयार केला आहे, ज्यामध्ये सीट बेल्ट अलार्म (Seat Belt Alarm) अनिवार्य करण्याचे म्हटले आहे. यामुळे वाहने आणि प्रवास अधिक सुरक्षित होतील. सीट बेल्ट लावला नाहीतर ऑडिओ आणि व्हिडिओ चेतावणी दिली जाईल. हा मसुदा परिवहन मंत्रालयाने (Ministry of Transport) तयार केला आहे. याबाबत मंत्रालयाने ५ ऑक्टोबरपर्यंत सूचना आणि हरकती मागवल्या आहेत.

Read Also : या गोष्टी आहेत उत्तम नेत्याचे लक्षण, विरोधकही होतात प्रशंसक

काय म्हणतो ड्राफ्ट?

 • M आणि N कॅटेगरीतील वाहनांमध्ये सीट बेल्ट अलार्म अनिवार्य असेल.
 • ओव्हर स्पीड अलार्म देखील अनिवार्य असेल.
 • सेंट्रल लॉकसाठी मॅन्युअल ओव्हर राइड.
 •  M1 कॅटेगरीच्या वाहनांमध्ये चाइल्ड लॉकला परवानगी दिली जाणार नाही.
 • समोरच्या सर्व आसनांसाठी बेल्ट अनिवार्य असेल.
 • अलार्म तीन स्तरांवर वाजवेल.
 • कारचे इंजिन सुरू झाल्यावर व्हिडिओ वॉर्निंग दिली जाईल.
 • बेल्टशिवाय वाहन चालवल्यास ऑडिओ-व्हिडिओ चेतावणी उपलब्ध असेल.
 • प्रवासादरम्यान कोणी बेल्ट उघडला तरी अलार्म वाजत राहील.
 • रिव्हर्स अलार्म अनिवार्य असेल म्हणजे रिव्हर्स करताना अलार्म वाजेल.

M, N श्रेणी म्हणजे काय?

M आणि N कॅटेगरीमध्ये यात सर्व वाहनांचा समावेश आहे, ज्यांना किमान 4 चाके आहेत आणि ज्या वाहनांचा प्रवाशी नेण्यासठी किंवा मालवाहतूक करण्यासाठी वापर केला जातो. यामध्ये बेसिक ते हाय एंड वाहनांपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश असेल. या सर्व श्रेणीतील वाहनांमध्ये समोरासमोरील सीट आहेत.

Read Also : SpiceJet : 80 वैमानिकांना 3 महिन्यांची बिन-पगारी सुट्टी

सीट बेल्ट न लावल्याने अलार्म टाळणे कठीण!

बऱ्याच वेळा वाहन चालक नियमांवर पळवाट शोधत असतात. जुगाड शोधून त्यावर पर्याय शोधत असतात. सीट बेल्टसाठी सरकारने केलेल्या ड्राफ्टमध्ये जुगाड करता येणार नाही, हे जुगाड थांबविण्यासाठी सरकारने एक विशेष व्यवस्था केली आहे. सीट बेल्ट किमान 10 मिमीने ताणणे अनिवार्य असेल, तसेच या वार्निंगपासून वाचण्यासाठी बनू शकणारे अनेक उपकरणांना बंदी घालण्यात येणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी