important things to look for when purchasing second hand two-wheelers नवी दिल्ली: भारतातील रस्त्यांवर २० कोटींपेक्षा जास्त दुचाकी आहेत. आजही देशातील अनेक ग्राहक आर्थिक कारणांमुळे परवडणाऱ्या दरात उपलब्ध असलेल्या सेंकड हँड टू-व्हीलर्स खरेदी करणे पसंत करत आहेत. पण ही खरेदी करताना नेमके कोणत्या बाबींना महत्त्व द्यायचे हे अनेक ग्राहकांना माहिती नसते. यामुळे त्यांची फसवणूक होते. ही फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकाने सेकंड हँड टू-व्हीलर्स खरेदी करताना विशिष्ट बाबींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. एकदा या बाबी समजून घेतल्या की ग्राहकाची फसवणूक टळेल; असे क्रेडआरचे चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर शशीधर नंदिगम म्हणाले.